उन्हाळा ऋतू आणि भारतातील वन्यजीवांचे निरीक्षण – अचूक संगम

Mayank Kumar

Last updated: Jul 13, 2017

Author Recommends

Do

Rajasthan: Camel Safari in Jaisalmer can be done at Sam Sand Dunes or Khuri Sand Dunes. Overnight stay on the dunes is recommended
Ladakh: Trekking and camping in Nubra Valley, known as the 'orchard of Ladakh', Biking at Khardung La, the world's highest motorable road

See

Rajasthan: Sonar Qila and Badabagh Ruins in Jasialmer and Mehrangarh Fort in Jodhpur are must visit places
Ladakh:Pangong Tso, the highest lake in the world and Spituk Gompa, a famous 14th century monastery

Eat

Rajasthan: Daal - Baati - Choorma, Moong Daal Halwa, and Lassi from local restaurants
Ladakh: Pava, a mixture of peas and barley flour, Chalak, made of tea, butter, sugar and Thukpa

Shop

Rajasthan: Shop for traditional handicrafts in Bapu Bazar, Jaipur, Shop for Camel leather in Kote Gare, Bikaner
Ladakh: Paintings, postcard and wooden dragon statues from the Hemis Museum

Filmy

Rajasthan: Bollywood movies like 'Mughal-e-Azam', 'Dor', 'Gadar:Ek Prem Katha' and 'Shakti - The Power' were shot here
Ladakh: The Aamir Khan starrer '3 Idiots' was shot at various locations in and around Leh-Ladakh

Want To Go ? 
   

उन्हाळ्याविषयी विचार करताना आपल्या मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड गर्मी. मात्र वन्यजीव प्रेमींसाठी भारतातील नॅशनल पार्क व अभयारण्यांच्या हिरव्यागार जंगलांकडे प्रयाण करण्याची यापेक्षा चांगली वेळ नसते. जेव्हा सूर्याच्या कडक उन्हामुळे जंगलातील पाण्याचे सर्व किरकोळ स्त्रोत कोरडे पडतात तेव्हा जंगलातील प्राण्यांना आपली तहान भागवण्याकरिता निवडक पाणवठ्यांकडे वळणे भाग पडते. वन्यजीवांचे निरीक्षण करणाऱ्यांकरिता ही आदर्श स्थिती आहे कारण की सर्वच जीवजंतूंना अखेरीस भेट द्यावीच लागते, फक्त पाण्याच्या स्त्रोताच्या आजूबाजूला धैर्यपूर्वक वाट बघण्याचीच गरज असते. यासोबतच उन्हाळ्यामुळे जंगलाच्या मध्यभागी वनस्पती विरळ व कोरड्या झाल्याने निरीक्षण स्पष्टपणे करता येते.

या उन्हाळ्यामध्ये अविस्मरणीय वन्यजीव निरीक्षणाकरिता आपण भारतातील खालील 7 राष्ट्रीय उद्यानांना भेट देऊ शकता.

1. नगरहोल राष्ट्रीय उद्यानामधील काबिनी नदीकाठची जागा

कर्नाटकचे गुप्त रहस्य म्हणजे काबिनी हे नि:संशय देशातील सर्वात मोठ्या अनोख्या वन्यजीव अभयारण्यांपैकी एक आहे. कोरड्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता नगरहोल राष्ट्रीय उद्यानामधील सर्व प्राण्यांना काबिनी नदीच्या किनाऱ्यावर घेऊन येते. या गवताळी मैदानांवर हत्तींचा कळप मदमस्तपणे भटकंती करताना तर त्याचवेळी वाघ डौलदारपणे फिरताना आणि शेकडो हरणांचा कळप गवत चरताना दिसून येणे ही काही असामान्य दृश्य नाहीत. प्रसन्न काबिनी नदीवर बोटीने विहार करताना नदीच्या काठावर या वन्यजीव सोहळ्याचे दर्शन करण्याचा अनुभव सहजासहजी विसरता येण्यासारखा नाही.

2. चांगठांग पठारावरचे वन्यजीवन

जीप सफारीने संरक्षित क्षेत्राच्या आतील वन्यजीवनाचे निरीक्षण करण्याचा आनंद घेण्याच्या अनुभवाची तुलनाच होऊ शकत नाही मात्र राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर खुल्या भागांमध्ये वन्यजीवनाचा सामना करणे सुद्धा काही औरच आहे. लडाखचा विस्तीर्ण भूप्रदेश फक्त विलक्षण निसर्गसौंदर्याचेच घर नाही तर विस्मयकारक वन्यजीवनाचे घर सुद्धा आहे. चांगठांगच्या मार्शलँडमध्ये दुर्मिळ पक्षी जसे काळ्या मानेचा क्रौंच, पातळ मानेची गीझ, काळ्या मानेचा ग्रेब आणि इतर पक्षी दिसून येतात. दुर्मिळ पक्षांव्यतिरिक्त डौलदार आणि चपळ कियांग्ज, लोभस मार्मोट्स आणि ससे व तसेच हिमालयीन निळी मेंढी सुद्धा आसपास दिसून येते. मे महिन्याच्या मध्यापर्यंत रस्ते खुले असताना गर्दी खाली येण्यापूर्वी लडाखच्या पठारावर जा आणि या उन्हाळ्यात उंच पठारावरच्या विलक्षण वन्यजीवनाचे निरीक्षण करा.

3. काली व्याघ्रप्रकल्प

बघीराने कित्येक दशके आपले हृदय काबीज केले आहे मात्र चपळ काळा चित्ता दिसणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. मात्र, कर्नाटकच्या अंशी-दंडेली व्याघ्रप्रकल्पामध्ये ज्याचे अलीकडेच काली व्याघ्रप्रकल्प असे पुन्हा नामकरण करण्यात आले आहे तेथे काळे चित्त्यांची कित्येक दशकांपासून जोमाने वाढ होत आहे. अलीकडील बातम्यांनुसार, काली व्याघ्रप्रकल्पामधील काळा चित्ता आणि व्याघ्र दर्शन हे दोन्ही बंद करण्यात आले आहेत. आता कदाचित आपल्याला दंडेलीच्या हिरव्यागार जंगलाकडे प्रयाण करावे लागेल आणि देशातील सर्वात कमी भेट दिलेल्या व्याघ्रप्रकल्पामध्ये आपले नशीब आजमावे लागेल.

4. हुल्लोंगापार गिब्बन अभयारण्य

आसामचे काझीरंगा आणि तेथील गेंडे सर्व लक्ष वेधून घेतात आणि ते तेवढेच आकर्षकही आहेच मात्र या राज्याची विलक्षण विविधता फक्त येथेच संपत नाही. भारताचे एकमेव एप (बिनशेपटीचे वानर) हुलॉक गिब्बन फक्त येथेच ईशान्य भारताच्या जंगलातील थोड्याशा भागात आढळतात. हुलॉक हे झाडांवर राहणारे प्राणी आहे जे आपले अधिकांश आयुष्य झाडांवर घालवतात आणि त्यामुळे सहसा दिसून येत नाही. मात्र गिब्बनची थोडीफार लोकसंख्या चहाच्या बागांनी वेढलेल्या 20 चौरस किलोमीटरच्या लहानशा जंगलातील सुरक्षित अभयारण्यामध्ये दिसून येते, ज्याला हुल्लोंगापार गिब्बन अभयारण्य म्हणतात. जंगलाच्या गाईडसोबत सकाळी भटकंती करताना गिब्बन एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झुलतानाचे मनोहर दृश्य निश्चितच नजरेस पडू शकते.

5. कान्हा राष्ट्रीय उद्यान

जंगल बुकमधील मोगलीच्या जंगलाची प्रेरणा असलेल्या कान्हा राष्ट्रीय उद्यानामध्ये अद्वितीय पर्यावरण आहे जे आपसूकच आपल्याला प्रेमात पाडते. कधीकाळी गावांची वस्ती असणाऱ्या विशाल गवताळ पठार आणि सपाट भूप्रदेशामध्ये वन्यजीवनाचे निरीक्षण करणे म्हणजे काही लपाछपीचा खेळ नव्हे. कान्हामध्ये आपल्या नजरेच्या टप्प्यात कुठल्याही अडथळ्याशिवाय दलदलीच्या पलिकडे बारसिंगा (दलदलीच्या प्रदेशातील हरीण) बघू शकता किंवा सूर्योदयाच्या वेळी सोनेरी गवताळ मैदानांमध्ये हरणांना बागडताना बघू शकता. तथापि, कान्हाचे सर्वात मोठे आकर्षण आहे वाघ – राजसी पट्टेदार वाघांचे हे घर आहे.

6. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प

वाघाचे दर्शन करण्याकरिता राजस्थानचे रणथंबोर आणि उत्तर प्रदेशचे कॉर्बेट हे कदाचित प्राथमिक निवड असू शकेल, मात्र मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प एका उच्च-दर्जाच्या व्याघ्रप्रकल्पाच्या स्वरुपात कसलाही गाजावाजा न करता प्रसिद्ध होत आहे. इतर बऱ्याच सफारी जीपसोबत जागेकरिता स्पर्धा न करता आपण ताडोबामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचे जवळून दर्शन करू शकता जसे वाघ, बिबटे, अस्वल आणि इतर बरेच प्राणी. दुसरे आकर्षण म्हणजे भारतातील इतर बऱ्याच अभयारण्यांच्या उलट ताडोबा वर्षभर सुरू असते.

7. बक्सा व्याघ्रप्रकल्प

जर आपल्याला गर्दीला पूर्णपणे टाळायचे असेल आणि नवीन भूप्रदेश बघायचा असेल तर आपण पश्चिम बंगालमधील डोअर्स बघू शकता. ईशान्य भारतातील हिमालयाच्या पूर्वेकडील पूरांच्या आणि पायथ्याच्या भागातील डोअर्समधील बक्सा भागात वाघ, बिबटे, ठिपकेदार बिबटे, चित्ते, मासे पकडणाऱ्या मांजरी, विशाल मलयन खारी आणि इतर बऱ्याच वन्यप्राण्यांच्या विविध व अनोख्या प्रजातींची व्यापक श्रृंखला बघायला मिळते. बक्सामध्ये प्राणीदर्शन सहजासहजी होत नाही, ज्यांची येथे वेळ आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल त्यांना दुर्मिळ दर्शन होईल याची मात्र खात्री आहे.

 

अद्यापही उन्हाळा जंगलात घालवण्याकरिता प्रेरणा शोधत आहात? या उन्हाळ्यामध्ये वन्यजीव निरीक्षणाकरिता आमचे अल्टीमेट गाईड येथे पाहा!