‘शांत राहा आणि गोव्याला प्रयाण करा!’
-निनावी
मोफत सूर्यप्रकाश. मोफत वाळू. मोफत सर्फिंग. ‘जीवनातील सर्वात सुंदर गोष्टी नि:शुल्क आहेत’ असे म्हणण्याऱ्याच्या कल्पनेत तेव्हा गोवाच असेल! भारताचे सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्याचे ठिकाण म्हणजे गोवा वर्षभर स्थानिक व तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करीत असते. गोव्यामध्ये सुट्टी साजरी करण्याची आपली मनापासून इच्छा असेल मात्र बजेट कमी असेल तर आम्ही गोव्यामध्ये करण्यासारख्या 10 गोष्टींची यादी आपल्यासमोर सादर करीत आहोत, ज्या अगदीच नि:शुल्क आहेतः
गोव्यातील समुद्रकिनारे आपले क्रीडांगण आहे! उत्तरेकडील अरम्बोल बीचपासून तर दक्षिणेकडील कॅनाकोना बीचपर्यंत संपूर्ण दिवसभर सूर्यप्रकाशात मनसोक्त भटकंती करा आणि मग विश्रांती घेण्यासाठी समुद्रामध्ये चिंब भिजून जलक्रीडा करा. आठवणींच्या स्वरूपात घरी नेण्यासाठी काही शिंपले गोळा करा आणि सूर्यास्त बघत आपला दिवस मावळू द्या. काहीच खर्च न करता ही सर्व मजा आपण उपभोगू शकता!
गोवा हे भारतातील काही सर्वात जुन्या चर्चचे घर आहे, ज्यामध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणजे चर्च ऑफ बोम जीससचा समावेश होतो. गोव्याच्या संरक्षक संतांपैकी एक असणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेविअर यांना हे चर्च समर्पित आहे. गोव्यामधील इतर ऐतिहासिक आणि वास्तुशैलीसंपन्न चर्चही पाहा ज्यामध्ये सेंट कॅथेरीन यांना समर्पित असणारे आशियातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक सेंट कॅथेड्रल, 1600मधील सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी चर्च व मदर मेरीचा सुंदर पुतळा असलेले चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द इमॅकुलेट कन्सेप्शन यांचा समावेश होतो.
गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना त्यालाही काही परत द्या. उत्तरेकडील मोर्जिम आणि मांड्रेम व दक्षिणेकडील अगोंडा आणि गलगीबागा हे बीच ऑलिव्ह रिडले कासवांचे नेस्टिंग ग्राउंड आहे. कासवांना त्यांच्या नैसर्गिक आवासात बघा आणि विविध जागरूकता आणि कासव संवर्धन उपक्रमांमध्ये स्थानिक एनजीओंसोबत सहभागी व्हा.
सूर्यास्त झाल्यावर काळोख पसरताना गोवा जिवंत होऊन उठते. गोव्याचा रात्रीचा बाजार आपल्या उत्साहाकरिता प्रसिद्ध आहे आणि येथे खरेदी करण्याची मुळीच सक्ती नाही. कला सादर करणाऱ्यांचे कार्यक्रम बघा, संगीताच्या तालावर नृत्य करा आणि येथील वातावरणामध्ये स्वत:ला हरवून द्या! आरपोरा येथील सॅटर्डे नाईट मार्केट आणि बागा येथील मॅकीज नाईट बाजाराला अवश्य भेट द्या.
दुधसागर धबधबा हा गोवा व कर्नाटकच्या अगदीच सीमारेषेवर आहे, जेथे आपण डुबकी घेऊन ताजेतवाने होऊ शकता आणि येथील प्रेक्षणीय परिसरामध्ये फेरफटका मारू शकता. सुमारे 310 मीटर उंचीवरील दुधासारख्या पाण्याचे चित्रीकरण दीपिका पदुकोण आणि शाहरूख खान यांच्या प्रसिद्ध चित्रपट चेन्नई एक्स्प्रेस मध्ये करण्यात आलेले आहे.
गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे नाही, येथील संस्कृतीचा मागोवा घेण्यासारखेही बरेच काही आहे. इतिहासामध्ये मागे जा आणि फाँटेन्हासचा शोध घ्या, जे गोव्याचे जुने लॅटिन क्वार्टर आहेत. पिवळ्या व निळ्या रंगात न्हालेल्या चमकदार इमारती आणि जुन्या काळातील आकर्षक बंगल्यांनी सजलेले शांत रस्ते समृद्ध पोर्तुगीज वारशाला प्रतिबिंबीत करतात. हा एक नयनमनोहर नजारा आहे, यात काहीच शंका नाही!
फेब्रुवारीमध्ये वार्षिक स्वरुपात साजरा केला जाणारा गोवा कार्निव्हल हा गोव्याच्या संस्कृती आणि परंपरेचा विविधरंगी उत्सव आहे आणि गोव्यामध्ये अवश्य करण्यासारख्या गोष्टींमध्ये याचा समावेश होतो. भडक व दिखाऊ पोशाखांतील गायक, नर्तक व कलाकारांचा समावेश असलेल्या रंगीबेरंगी मिरवणुका रस्त्यांवरून चालल्या असतानाच्या उत्सवी वातावरणाचा आनंद घ्या. हा तीन दिवसांचा उत्सव म्हणजे आनंदोत्सवच आहे!
गोवा हे बऱ्याच किल्ल्यांचे घर आहे, ज्यापैकी अधिकांश किल्ल्यांना व्यवस्थितरित्या जतन करण्यात आले आहे. फोर्ट अगौडा सन 1612मध्ये डच आणि मराठा आक्रमण रोखण्याकरिता बांधण्यात आला होता. काही शतकानंतर तेथे 13 मीटर उंचीचे दीपगृह बांधण्यात आले. बॉलीवूडची आठवण देणारे ठिकाण म्हणजे चापोरा किल्ल्याच्या भिंतीवर बसा आणि चापोरा नदीकडे बघा... दिल चाहता है मधील हे प्रसिद्ध दृश्य आहे.
गोव्यामध्ये निसर्गाची आणखी एक बाजू बघण्याकरिता निसर्गाच्या पुढ्यात पदभ्रमण आणि ट्रेकिंग करा. दुधसागर धबधब्याच्या आजूबाजूला वसलेल्या मोल्लेम राष्ट्रीय उद्यानाचे जंगल बघा किंवा भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यामधून कृष्णपूर घाटाकडे वाटचाल करा.
गोव्यामध्ये कदाचित मौजमस्ती ही सर्वात ‘मोफत’ गोष्ट आपण करू शकता! मग आपण कुठे असता किंवा काय करता याला महत्त्व नाही, गोव्यामध्ये असताना मौजमस्ती करणे ही वृत्तीच असते. त्यांनी यासाठी नावही ठेवले आहे – सुसेगादो!
त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा आपण बजेटमध्ये सुट्टीचे ठिकाण बघत असाल, तेव्हा गोव्यामध्ये भन्नाट सुट्टी साजरी करण्यासाठी आपल्याला फार काही खर्च करावा लागणार नाही!
Escape into the Offbeat Wilderness of Goa!
Pooja Akula | Mar 10, 2021
7 Breathtaking Pool Villas to Book Near Goa!
Sudip Dey | Nov 20, 2020
A Goa Trip Gone Crazy- Water Sports Edition!
Renita Sharel Pereira | Sep 11, 2020
Our Celebratory Town Hall in Goa Right before the Lockdown!
Amrita Tripathi | May 29, 2020
Missing Our Romantic Moments in Goa!
Namita Dave | Jan 20, 2023
College Trip to Goa through My Camera Lens!
Amlan Ghosh | Jan 20, 2023
A List of Must-visit Locales in North Goa for Couples
MakeMyTrip Holidays | Jan 20, 2023
Top Places to Visit in Goa Other than Beaches
MakeMyTrip Holidays | Mar 30, 2022
Discover What Awaits You at the Mighty 5® National Parks of Utah!
Niharika Mathur | Jul 18, 2022
Experience The Thrill At Resorts World Sentosa™ In Singapore!
Niharika Mathur | Jun 28, 2022
7 Incredible Hidden Gems to Explore in Australia
Niharika Mathur | May 25, 2022
6 Red Sea Diving Experiences in Saudi to Add to Your Bucket List
MakeMyTrip Blog | Dec 3, 2021
A Long Weekend at Syaat to Celebrate the October Vibes!
Sayani Chawla | Nov 17, 2020
My Hiking Experience at Mount Batur, an Active Volcano in Indonesia!
Souvik Mandal | Jun 18, 2020
I Went to the Tranquil Himalayas!
Rizza Alee | May 12, 2020
Our Closest Encounter with Wildlife & a Road Trip to Remember for Life!
Drishty Goel | May 20, 2020