मुलांसाठी अनुकूल असणारी थायलंडमधील 10 हॉटेल्स

Devika Khosla

Last updated: Jun 29, 2017

Want To Go ? 
   

बऱ्याच पालकांसाठी मुलांसोबत सहलीचे प्लॅनिंग करणे जिकरीचे काम असते. बऱ्याच गोष्टींची प्लॅनिंग करावे लागते जसे झोपेची वेळ, खाण्याची वेळ आणि अर्थातच खेळण्याचा वेळ. मुलांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या प्रतिष्ठेच्या उलट थायलंड हे एक उत्तम ठिकाण आहे. काही हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा पालकांची जबाबदारी आपल्यावर घेतात जेणेकरून पालक स्वत: पूर्णपणे सुट्ट्यांचा आनंद उपभोगू शकतात. लहानग्यांसोबत आपल्या पुढील सहलीची प्लॅनिंग करताना मुलांसाठी अनुकूल असणाऱ्या थायलंडमधील पुढील 10 हॉटेल्सचा विचार अवश्य करावा.

ग्रँड सुखूमवित हॉटेल, बँकॉक

Grand-Sukhumvit-Hotel,-Bangkok-hotels-in-thailand

प्रतिष्ठित अॅकोर समूहातर्फे चालवले जाणारे ग्रँड सुखूमवित हॉटेल हे एक पंचतारांकित लक्झरी हॉटेल आहे जे बँकॉकच्या सुखूमवित क्षेत्रामध्ये वसलेले आहे. हॉटेल 386 खोल्या आणि सूट्स सादर करीत आहे आणि 12 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची दोन मुले जर आपल्या पालकांसोबत त्याच खोलीमध्ये राहणार असतील तर त्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क लागत नाही. ग्रँड सुखूमवित हॉटेलमध्ये पालक आणि मुलांसाठी असणाऱ्या सुविधांमध्ये समावेश होतो मोफत वाय-फाय, हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये मुलांचे आवडते खाद्यपदार्थ आणि मुलांच्या पूलसोबत एक स्विमिंग पूल. काहीवेळ स्वत:साठी घालवण्याची इच्छा असणाऱ्या पालकांसाठी हॉटेल बेबीसिटिंग सेवा सुद्धा प्रदान करत आहे. शहरातील मनोरंजनाचे केंद्र असणाऱ्या टर्मिनल 21, सेंट्रल वर्ल्ड आणि इतर शॉपिंग मॉल्सच्या सान्निध्यात असणे हे ग्रँड सुखूमवित हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

किंमत: रु. 3,836 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: 99 सुखूमवित सोई 6 रोड, क्लाँगटोई जिल्हा, बँकॉक 10110

Book Your Stay at Grand SukhumvitBook Your Stay at Grand Sukhumvit

दी अॅम्बेसेडर बँकॉक, बँकॉक

The-Ambassador-Bangkok,-Bangkok-hotels-in-thailand

शहराच्या सुखूमवित भागामध्ये असलेले दी अॅम्बेसेडर बँकॉक हे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे एक आघाडीचे 4-स्टार हॉटेल आहे. संपूर्ण टॉवर आणि मुख्य भागांमधील एकूण 760 खोल्यांमध्ये फ्लॅट स्क्रीन टीव्ही आणि मोफत वाय-फायची सुविधा आहे. दी अॅम्बेसेडर बँकॉकमध्ये विविध उपक्रमांसह असलेला चिल्ड्रन क्लब आणि मुलांसाठी विशेष मेन्यू असलेले रेस्टॉरंट आहे. प्रत्येकासाठी आणि विशेषत: मुलांसाठी मजेदार आकर्षण असणाऱ्या पक्ष्यांच्या विशाल पिंजऱ्यात एक जिंवत झाड आहे आणि त्यावर उष्णकटिबंधीय व दुर्मिळ पक्षी आहेत.

किंमत: रु. 3,774 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: 171 सोई सुखूमवित 11, ख्वाइंग ख्लाँग टोई नोआ, खेत वाथ्थाना, कृंग थेप महा नाखोन 10110

Book Your Stay at The AmbassadorBook Your Stay at The Ambassador

दी सेन्सेस रिसॉर्ट पटोंग बीच, फुकेत

The-Senses-Resort-Patong-Beach,-Phuket-hotels-in-thailand

दी सेन्सेस रिसॉर्ट पटोंग बीच हे वर्दळीच्या पटोंग बीचच्या बाजूला वसलेले आहे. रिसॉर्ट सहा विविध कौटुंबिक श्रेणी सादर करीत आहे, ज्या सर्वांमधून समुद्राचे नेत्रदीपक दृश्य दिसून येते आणि त्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्जित करण्यात आले आहे. दी सेन्सेस रिसॉर्ट पटोंग बीचमधील रूफटॉप स्प्लॅश माउंटन इन्फिनिटी पूल, स्पा आणि फिटनेस सेंटर सारख्या सुविधांचा प्रौढ व्यक्ती आनंद घेऊ शकतात तर मुलांसाठी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये लहान मुले बागडू शकतात आणि चिक्कार उपक्रम आणि खेळांचा समावेश असलेल्या स्मायली फेस क्लबमध्येही धम्माल करू शकतात.

किंमत: रु. 5,792 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: 111/7, थॅनोन नानाई, पटोंग, काथू जिल्हा, 83150

Book Your Stay at The Senses ResortBook Your Stay at The Senses Resort

अमारी फुकेत, फुकेत

बीचच्या समोर असलेला रिसॉर्ट अमारी फुकेत हा फुकेतमधील प्रीमियर पंचतारांकित रिसॉर्ट आहे. रिसॉर्टमध्ये 380 खोल्या आणि सूट्स आहेत जे उत्कृष्ट इन-रूम सुविधा जसे वाय-फाय, एलसीडी टीव्ही आणि डिव्हीडी प्लेअर इत्यादींनी सुसज्जित आहे. मुलांसाठी अनुकूल मेन्यू सादर करणाऱ्या रेस्टॉरंटपासून उपक्रम आणि खेळांनी भरलेल्या किड्स क्लबपर्यंत सुविधा असणाऱ्या अमारी फुकेतमध्ये बेबीसिटिंग सेवा सुद्धा उपलब्ध आहे. रिसॉर्टमध्ये मोठी मुले दोन टेनिस कोर्ट आणि फुटबॉलचे लहान मैदान व तसेच बास्केटबॉल आणि बॅडमिंटनसाठी असणाऱ्या बहु-उद्देशिय कोर्ट यासारख्या क्रीडा सुविधांचा आनंद घेऊ शकतात.

किंमत: रु. 10,300 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: 2 मिऑन एनजर्न रोड, पटोंग बीच, फुकेत, 83150

Book Your Stay at AmariBook Your Stay at Amari

केप दारा, पट्टाया

Cape-Dara,-Pattaya-hotels-in-pattaya

गर्द हिरव्यागार परिसरामध्ये वसलेले कॅपे दारा हे पट्टायामधील बीचफ्रंट रिसॉर्ट आहे. व्यापक 360-डिग्री व्ह्यूद्वारे सर्व 264 खोल्या, सूट्स आणि व्हिलामधून खुल्या आकाशाचे दृश्य दिसून येते आणि वाय-फाय, एक बीच हँपर आणि 42” एलईडी केबल टीव्ही यासारख्या सर्वोत्कृष्ट सुविधांनी सुसज्जित आहे. केप दारामधील मनोरंजनात्मक सुविधांमध्ये एक खासगी समुद्रकिनारा आणि दोन स्विमिंग पूलचा समावेश होतो. येथे उपक्रमांनी भरलेला एक चिल्ड्रन्स क्लब आणि समर्पित प्ले एरिआ सुद्धा आहे. केप दाराद्वारे बेबीसिटिंग सेवा प्रदान केली जाते आणि 3 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ब्रेकफास्ट मोफत आहे.

किंमत: रु. 18,729 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: 256 दारा बीच, सोई 20, पट्टाया-नकलुआ रोड, पट्टाया, चोन बुरी 20150

Book Your Stay at Cape DaraBook Your Stay at Cape Dara

चोलचान पट्टाया रिसॉर्ट, पट्टाया

पट्टायामधील अंडरवॉटर वर्ल्ड पट्टाया या मुलांच्या लोकप्रिय आकर्षणाच्या सान्निध्यात असलेले चोलचान पट्टाया रिसॉर्ट हे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला स्थित आहे. खोल्या वाय-फायने सुसज्जित आहेत आणि खोल्यांमधून समुद्र व उष्णकटिबंधीय डोंगरांचे विहंगम दृश्य नजरेस पडते. तसेच 1 ते 4 वर्षे वयाची मुले मोफत वास्तव्य आणि ब्रेकफास्टचा आनंद घेऊ शकतात. चोलचान पट्टाया रिसॉर्टमधील सुविधांमध्ये लहान मुलांसाठी पूल आणि मोठ्या मुलांसाठी टेनिस व स्कॉश कोर्टचा समावेश आहे.

किंमत: रु. 4,300 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: सोई सुखूमवित पट्टाया 1, मुआंग पट्टाया, अम्फोई बँग लामूंग, चांग वॅट चोन बुरी 20150

Book Your Stay at Choldchan Pattaya ResortBook Your Stay at Choldchan Pattaya Resort

दीवाना प्लाझा क्राबी ओनांग, क्राबी

Deevana-Plaza-Krabi-Aonang,-Krabi-hotels-in-thailand

सुमारे 213 सुंदर खोल्या आणि सूट्सचे दीवाना प्लाझा क्राबी ओनांग हे लहान मुले आणि प्रौढ अशा दोन्हींकरीता व्यापक सुविधा आणि सुखसोयी सादर करीत आहे. हॉटेलचे मोहक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा लगून-शैलीचा स्विमिंग पूल आणि सोबतच लहान मुलांच्या पूलासह दोन अतिरिक्त पूल आहेत. रेस्टॉरंटमध्ये लहान मुलांसाठी मेन्यू उपलब्ध आहे आणि लहान मुले मायना किड्स क्लबमधील इनडोअर प्ले एरिआ, खेळ, खेळणी आणि इतर धम्माल उपक्रमांचा आनंद घेत असताना त्यांच्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष असेल याची खात्री दीवाना प्लाझा क्राबी ओनांगमध्ये घेतली जाते.

किंमत: रु. 5,010 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: 186 मू 3 सोई 8, ओनांग, ओनांग, मुआंग क्राबी जिल्हा, क्राबी 81000

Book Your Stay at Deevana Plaza Krabi AaonangBook Your Stay at Deevana Plaza Krabi Aaonang

सेंटारा ग्रँड बीच रिसॉर्ट अँड व्हिलाज, क्राबी

सर्वदूर विलोभनीय दृश्यांची पाखरण झालेल्या व नीलमणी पाण्याच्या काठावर निसर्गाच्या कुशीत सेंटारा ग्रँड बीच रिसॉर्ट अँड व्हिलाज वसलेले आहे. प्रत्यक्षात या उष्णकटिबंधीय रिट्रीटमध्ये वास्तव्य खोल्या, सूट्स आणि व्हिलाजमध्ये पसरलेले आहे ज्यापैकी काहींमध्ये खासगी पूल सुद्धा आहेत. मुले किड्स क्लब, कँप सफारी, ई-झोन आणि दैनिक उपक्रम कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात तर प्रौढ हॉटेलच्या खासगी बीचवर सूर्य, वाळू आणि फेसाळ लाटांचा आनंद घेऊ शकतात. सेंटारा ग्रँड बीच रिसॉर्ट अँड व्हिलाजच्या इतर तारांकित सुविधांमध्ये दोन टू-टायर स्विमिंग पूल व तसेच मुलांसाठी पूल, एक स्पा, वॉटरस्पोर्ट आणि व्हॉलीबॉल आणि फुटबॉल सारख्या बीचवरील खेळांचा समावेश होतो.

किंमत: रु. 13,662 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: 396-396/1 ओनांग, मू 2 मुआंग क्राबी, क्राबी, 81000

Book Your Stay at Centara Grand Beach Resort & VillasBook Your Stay at Centara Grand Beach Resort & Villas

अमारी कोह सामुई, कोह सामुई

अमारी कोह सामुई हे कोह सामुई येथील चावेंग बीचवर स्थित आहे. या आघाडीच्या पंचतारांकित हॉटेलमधील खोल्यांमध्ये मोठ्या कौटुंबिक सूट्सचा समावेश आहे आणि खासगी बाल्कनी, आधुनिक सुविधा आणि मोफत वाय-फायसारखी वैशिष्ट्येसुद्धा आहे. पालक स्पाचा आनंद घेत असताना मुले किड्स क्लबमध्ये देखरेखीखाली उपक्रमांचा आनंद घेऊ शकतात. अमारी कोह सामुईमधील अतिरिक्त सुविधांमध्ये दोन स्विमिंग पूल, एक मुलांचा पूल, बेबीसिटिंग सेवा आणि मुलांसाठी अनुकूल अशा मेन्यू असलेल्या विविध रेस्टॉरंटचा समावेश आहे.

किंमत: रु. 11,450 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: 14/3, चावेंग बीच कोह सामुई, सुरत थानी 84320

Book Your Stay at Amari Koh SamuiBook Your Stay at Amari Koh Samui

पुताराक्सा हुआ हीन, हुआ हीन

Putahracsa-Hua-Hin,-Hua-Hin-hotels-in-thailand

दी युनिक कलेक्शन ऑफ हॉटेल्स अँड रिसॉर्टद्वारे चालवले जाणारे पुताराक्सा हुआ हीन हे एक प्रीमिअर बुटिक हॉटेल आहे. दोन झोनमध्ये पसरलेल्या 67 प्रशस्त खोल्या, सूट्स आणि व्हिलामधून बगीचा, पूल आणि समुद्राचे विहंगम दृश्य नजरेस पडते. प्रौढांकरीता असलेल्या स्पा आणि फिटनेस सेंटरसारख्या सुविधांसोबतच मुलांसाठी असलेल्या उपक्रमांमध्ये चित्रकला, प्लेग्राउंड आणि मुलांच्या स्विमिंग पूलाचा समावेश आहे. पुताराक्सा हुआ हीनमध्ये प्रस्तुत इतर सुविधांमध्ये मोफत वाय-फाय आणि बेबीसिटिंग सेवेचाही समावेश आहे.

किंमत: रु. 8,000 प्रति रात्रपासून सुरुवात

ठिकाण: हुआ हीन, हुआ हीन जिल्हा, प्राचुप खीरी खान 77110

Book Your Stay at Putahracsa Hua HinBook Your Stay at Putahracsa Hua Hin

More Travel Inspiration For Bangkok