भारतीयांना उत्कृष्ट प्रवासी समजले जात नाही. सुरक्षितपणे प्रवास करणे, आरामदायक हॉटेल्समध्ये राहणे, वेगळे खाद्यपदार्थ चाखण्याचे टाळणे आणि मळलेल्या वाटेवर चालत राहणे या आपल्या काही नेहमीच्या सवयी आहेत. मला असे वाटते की कधीतरी एकदा आपण सर्वांनी आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडून फारसे प्रसिद्ध नसणाऱ्या ठिकाणांना भेट दिली पाहिजे. आपल्याला आयुष्य एकदाच मिळते! थायलंड, प्रत्येक पावलावर आश्चर्य आणि अद्भुततेने भरलेला हा असा एक देश आहे जो लक्झरी आणि साहस दोन्हींचा आनंद प्रदान करतो. थायलंडचे खरे सौंदर्य त्याच्या फारसे प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणांमध्ये आहे. आम्ही तुमच्यासाठी आठ थाई ठिकाणांची यादी देत आहोत जेथे भारतीय भेट देत नाहीत पण त्यांनी खरंतरं द्यायला हवी.
जर आपल्याला गजबजलेले आणि व्यावसायिक समुद्रकिनारे कंटाळवाणे वाटत असेल, मात्र शहरीकरणाच्या सुविधा सुद्धा पाहिजे असतील तर फुकेतऐवजी खाओ लाकला भेट द्या. येथील समुद्रकिनारे लांब, सुंदर आणि उबदार आहेत व पार्श्वभूमीला हिरव्यागार जंगलांनी नटलेले डोंगर आहेत. दगडांच्या टेकड्या, बेटे आणि जंगलामधील धबधबे खूपच प्रेक्षणीय आहेत. रॅफ्लेशिया हे जगातील सर्वात मोठे फूल खाओ सोक राष्ट्रीय उद्यानात आढळून येते, हा पार्क खाओ लाकपासून फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय उद्यान आपल्या पैशांचा पुरेपूर मोबदला देतो आणि येथील रेन फॉरेस्ट गेस्टहाउसमध्ये आपल्याला रात्री राहण्याची सुविधाही उपलब्ध आहे. खाओ लाकपासून खाओ सोकपर्यंतचा प्रवासही प्रेक्षणीय असा आहे.
कोह लांटा हे क्राबी प्रांतातील सर्वात मोठे बेट आहे. हे बेट तुलनेने सपाट आहे आणि मोटरसायकल भटकंती करण्याकरिता उत्कृष्ट ठिकाण आहे. आपल्याला येथील घनदाट उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये अविस्मरणीय भूप्रदेश, नैसर्गिक खारफूटीचे जंगल, रंगतदार संस्कृती, आतिथ्यशील लोक आणि उत्तम जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. सूर्यप्रकाशात न्हावून निघालेल्या पांढऱ्याशुभ्र वाळूने आणि उबदार खळाळत्या लाटांनी सजलेले येथील समुद्रकिनारे विलक्षण आहेत आणि थायलंडमधील इतर कुठल्याही समुद्रकिनाऱ्यांपेक्षा अधिक सुंदर आहेत. जर आपण साहसी प्रवृत्तीचे असाल तर थाम खाओ मैकाओला अवश्य भेट द्या जे जंगलातील गुहा आणि डोंगरामधील सुरुंगांचे रोमांचक जाळे आहे व यातील चिंचोळ्या वाटा कॅथेड्रलच्या आकाराच्या खोल्यांमध्ये घेऊन जातात ज्या स्टेलेक्टाईट्स आणि स्टॅलाग्माईट्सने भरलेल्या आहेत. कोह लांटा साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे आणि जगातील काही सर्वांत विलक्षण कोरल रीफ्सने नटलेले आहे.
सुरत थानीचा अर्थ आहे “चांगल्या लोकांचे शहर”, ही इंडोनेशियाच्या प्राचीन काळातील शक्तिशाली श्रीविजया साम्राज्याची राजधानी होती आणि याचे नामकरण राजा वजिरावुध यांनी केले होते. हे शहर दक्षिण थायलंडच्या मध्य खाडीच्या समुद्रकिनारी वसलेले आहे, जेथे निसर्गाच्या मोहकतेचा गौरवशाली संस्कृतीच्या इतिहासासोबत संगम झालेला आहे. दुर्दैवाने, आज हे शहर लोकप्रिय गल्फ कोस्ट बेटांकडे जाणारा रस्ता म्हणूनच वापरले जात आहे. जंगलाच्छादित पर्वत आणि पश्चिमेकडील उंच पठार ते खोल दऱ्या यांनी मिळून पूर्वेचा किनारा बनलेला आहे. डोंगराळ ठिकाणांनी कित्येक नद्यांचे खोरे बनलेले आहे. नद्यांचे गडद रंगाचे पाणी पिरोजी रंगाच्या समुद्राच्या पाण्यात मिसळताना विलक्षण रंगछटा निर्माण झालेल्या बघता येतात विशेषत: टापी नदीच्या खोऱ्यामध्ये. सुरत थानी येथे बरेच लहानसे रेस्टॉरंट आहेत जेथे उत्कृष्ट सी फूड मिळते आणि आपल्या किफायतशीर किंमतीमध्ये सुद्धा ते थायलंडच्या सर्वोत्तम रेस्टॉरंटशी स्पर्धा करतात. स्थानिक हस्तकला गावांना आणि लोकसाहित्य संग्रहालयांना भेट द्या आणि काही मौल्यवान भेटवस्तू, कपड्यांची सामग्री आणि ऐतिहासिक वस्तूंची खरेदी करा.
कांचनाबुरीची प्रसिद्ध बाजू म्हणजे डेव्हिड लीनचा 1957चा लोकप्रिय चित्रपट “ब्रिज ओव्हर द रिव्हर क्वाइ”. “डेथ रेल्वे” म्हणून आता स्मरणात असलेल्या या रेल्वेमार्गाची बांधणी कित्येक युद्धकैद्यांना आपल्या प्राणाची आहुती देऊन करावी लागली होती. थरकाप उडवणाऱ्या या गोष्टीमुळेच येथे भेट देण्याची इच्छा सुद्धा होते. थायलंडच्या या प्रांतामध्ये हेच एक गंभीर ठिकाण नाही आहे. कांचनाबुरी हे एक निसर्गसौंदर्याने नटलेले समृद्ध ठिकाण आहे ज्यामध्ये घनदाट जंगले, नितळ स्वच्छ धबधबे आणि डोंगरातील गुहांचा समावेश होतो ज्यामुळे हा निसर्गप्रेमींकरिता स्वर्गच आहे. थायलंडमध्ये असताना पर्यटक प्रामुख्याने ज्याची अपेक्षा करतात अशा समुद्रकिनाऱ्यावरील जीवनशैलीपासून दूर असलेले कांचनाबुरी साहसी प्रवृत्तीच्या पर्यटकांकरिता बरीच आकर्षणे सादर करते. जगामधील दुर्मिळ अस्पर्श जंगलाच्छादित प्रदेश असलेल्या थुंग याई नेरसुआन वन्यजीव अभयारण्यामध्ये भटकंती करा, ईरावान राष्ट्रीय उद्यानामधील सात थरांच्या दुधाळ नितळ पाण्याने भरभरून वाहणाऱ्या धबधब्याचे मनसोक्त फोटो घ्या, हेलफायर पास संग्रहालयामध्ये इतिहासाचा मागोवा घ्या आणि लावा गुहेमध्ये खळाळत्या पाण्यात राफ्टिंगची मजा लुटा. निरस दैनंदिन जीवनामुळे शिथिल झालेल्या मेंदूला विश्रांती देण्यासाठी कांचनाबुरी हे आदर्श ठिकाण आहे. आणि येथे असताना टायगर टेम्पलमधील मुक्त आणि संपूर्ण वाढ झालेल्या वाघांसोबत फोटो काढण्यास विसरू नका.
नाखोन रात्चासिमा आपल्या कृषी पर्यटनाकरिता प्रसिद्ध आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे आणि आपल्या खेमेर संस्कृती व इतिहासाकरिता विख्यात आहे. निसर्गप्रेमींना येथील खाओ याई राष्ट्रीय उद्यानामध्ये सस्तन प्राण्यांच्या 112 प्रजाती आणि 320 पक्ष्यांच्या प्रजाती बघायला मिळतील व सोबतच ट्रेकिंग व कॅम्पिंगचा अविस्मरणीय अनुभवही घेता येईल. फिमाई हिस्टोरिकल पार्क हे भव्य प्राचीन खेमेर ऐतिहासिक स्थळ आहे. या चौकोनी रचनेवर सूक्ष्म कोरीवकाम केलेले आहे व याच्या वास्तुरचनेचे अंगकोर वट सोबत साधर्म्य आहे. नाखोन रात्चासिमा येथे स्थानिक पातळीवर काही अनोख्या व सुंदर हस्तकलेच्या वस्तू बनवल्या जातात जसे प्रसिद्ध डॅन क्वाइन मातीची भांडी आणि मॅट मी रेशमी वस्त्रे. जीम थॉम्पसन फार्मच्या सहलीने आपल्याला रेशीम किड्यांचे संगोपन, मशरूमची लागवड आणि रंगीबेरंगी फूलांनी सजलेल्या विशाल शेतांना भेट देण्याची विलक्षण संधी मिळते.
सुखोथाईचा वैभवशाली भूतकाळ आपल्याला इतिहासामध्ये फार प्राचीन काळापर्यंत घेऊन जातो. याला इ.स.1238मध्ये थायलंडच्या प्रथम राजनाधीच्या स्वरूपात वसवण्यात आले होते, त्यामुळे येथे शेकडो ऐतिहासिक स्थळे नजरेस पडतात. येथेच प्रसिद्ध लोई क्रॅथाँग उत्सवाचा आरंभ झाला. या उत्सवादरम्यान, नदी व ओढ्यांमध्ये लहान मेणबत्त्या आणि फुले अर्पण केली जातात. हा नयनरम्य सोहळा म्हणजे डोळ्यांसाठी पर्वणीच आहे. सुखोथाई हिस्टोरिकल पार्क आणि सी सचनालाई हिस्टोरिकल पार्क ही युनेस्कोची जागतिक वारसा स्थळे आहे, जेथे हिरवेगार पर्वत, शांतपणे वाहणाऱ्या नद्या आणि कमळांच्या तलावांच्या पार्श्वभूमीवर भव्य स्मारकांचे अवशेष नजरेस पडतात. तसेच सुखोथाई हस्तनिर्मित स्वर्णहार, कडे, बांगड्या, अंगठ्या आणि इतर भेटवस्तूंच्या निर्मितीसाठीही प्रसिद्ध आहे.
चिआंग माईपासून 5 किमी अंतरावरील थायलंडमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले चिआंग राई हे तसे बघता फारसे काही प्रसिद्ध नाही. प्राचीन सभ्यता आणि बौद्ध मंदिराचे हे अवशेष हिरव्यागार निसर्गसौंदर्य आणि समृद्ध वन्यजीव प्रदेशांच्या सान्निध्यात आजही तग धरून आहेत. सुवर्ण त्रिकोण जेथे बर्मा, लाओस आणि थायलंड एकत्र येतात ते एकेकाळी अफीमच्या व्यापाराचे केंद्र होते. चिआंग माईसारख्या लोकप्रिय शहरांच्या गर्दीपासून दूर ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी हे आदर्श असे ठिकाण आहे. येथे पर्वतारोहण करा आणि आपण स्वत:ला थायलंडच्या डोंगराळी आदिवासींच्यामध्ये बघाल. आधुनिक सभ्यतेने थाई जीवनशैलीवर स्वत:चा प्रभाव टाकला असला तरी सुद्धा या आदिवासींनी आपली पारंपारिक संस्कृती जतन केलेली आहे.
बँकॉक-चिआंग माई रेल्वेमार्गावर मोक्याच्या जागी वसलेले अयुथ्थया हे एक पडझड झालेले शहर आहे, ज्याला समृद्ध व प्राचीन सियामी इतिहास लाभलेला आहे. येथे काही सुंदर मंदिरे आहेत, ज्यांची वास्तुकला प्राचीन काळाच्या अनुरूप आहे. आपल्या वैभवाच्या कळसावर असताना हे कला व व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सन 1767मध्ये बर्मी लोकांच्या आक्रमणामध्ये या शहराचा पाडाव झाला आणि हे बेचिराख झालेले शहर ओसाड पडले. आज हे शहर थाई कला, संस्कृती, इतिहास आणि दैवी निसर्गाचा संगम आहे. चाओ फार्या नदीच्या काठी वसलेल्या या गतकाळच्या वैभवशाली नगराला असंख्य ऐतिहासिक मंदिरे आणि विलक्षण वास्तुकलेच्या राजवाड्यांचा वारसा लाभलेला आहे. अयुथ्थयाचे प्राचीन शहर, बँग पा-इन समर पॅलेस आणि वट चाई वाट्टनरम ही त्यापैकीच काही वानगीदाखल उदाहरणे आहे. या प्रदेशात चाओ फार्या नदी व्यापारीमार्गाचे काम करते व तसेच अयुथ्थयाला बघण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नदीतून आरामदायक क्रूझचा आनंद घेणे आहे.
यापैकी प्रत्येक आडवळणाच्या ठिकाणांना बँकाकवरून सहजपणे भेट देता येते. तुलनेने दुर्लक्षित असलेली ही ठिकाणे अशा सर्व पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात ज्यांना थायलंडच्या लोकप्रिय ठिकाणांच्या गर्दीपासून दूर राहायचे आहे. आपण एकट्यानेच प्रवास करीत असाल किंवा कौटुंबिक सहलीवर आला असाल, यावेळी आमच्या या दुर्लक्षित ठिकाणांना भेट द्या आणि काहीतरी वेगळे केल्याचे समाधान मिळवा. आपला हॉलिडे अविस्मरणीय होण्यासाठी आमच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेतच!
Book Your Flight to Thailand Here!
5 Reasons Why Phuket Always Impresses All Kinds of Travellers
Bhavya Bhatia | Oct 19, 2021
Top Exotic Resorts for the Perfect Thailand Experience!
Shubhra Kochar | Nov 24, 2022
Escape the Touristy Crowd at Thailand’s Most Secluded Islands!
Shubhra Kochar | Feb 2, 2023
SHA is Going the Extra Mile to Make Tourism in Thailand Safer!
Shubhra Kochar | Oct 15, 2020
I Chose Thailand for My First International Holiday!
Shivanand Tyagi | Feb 2, 2023
I Met a Tiger on My First Solo Trip to Thailand!
Garima Pant | Jun 5, 2020
My First International Trip Was Special For More Than One Reason!
Surangama Banerjee | May 1, 2020
Places to Visit in Thailand for Couples
MakeMyTrip Holidays | Mar 9, 2020
Discovering the Beauty of Meghalaya During the Monsoons!
Ryan Jhamb | Mar 18, 2021
Escape into the Offbeat Wilderness of Goa!
Pooja Akula | Mar 10, 2021
How We Beat the COVID-19 Blues with a Trip to Jim Corbett!
Ritvik Arora | Oct 27, 2020
The 6 Egypt Landmarks You Must Visit If You Are a History Buff
MakeMyTrip Holidays | May 8, 2020
11 Incredible Things to Do in Jerusalem
MakeMyTrip Holidays | May 5, 2020
10 Places That You Must See on Your Israel Holiday
Lateeka Sabharwal | Apr 28, 2020
Met a Naga Family with a Pet Black Bear! Can You Believe That?
Shubhra Kochar | May 8, 2020
The Treasures I Found on the Ghats of Varanasi!
Shuchi Singh | Apr 7, 2022