दक्षिण भारत: एक जलद आणि सुलभ प्रवास मार्गदर्शिका

Mayank Kumar

Last updated: Jul 13, 2017

Author Recommends

Events

Kerala: Onam (August), Kerala Boat Race (August) and Pongal (January)
Bengaluru: Karaga (March - April), Ganesh Chaturthi (September) and Diwali (October - November)
Pondicherry: Pongal (January) and Masi Magam (February)

Click

Shots of the Kerala backwaters from a houseboat
Wildlife photography at one of the many national parks in South India

Greetings

Kerala: How are you? - How are you? - Sukhamalle?
Bengaluru: How are you? - Hegiddeera?
Tirupati: How are you? - Meeru elaa unnaru

Filmy

"Guru", "Chennai Express" and "Raavan" are some popular Bollywood movies shot in Kerala

Safety

Police: 100
Ambulance: 101

Want To Go ? 
   

गर्द हिरवेगार बॅकवॉटर्स, सुंदर समुद्रकिनारे आणि वास्तुशास्त्रीय चमत्कारांनी दक्षिण भारताला भारतीय पर्यटन उद्योगात अग्रणी बनवले आहे. पाच मुख्य राज्यांसोबतच अरबी समुद्रातील लक्षद्वीप आणि बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार बेटे या दोन द्वीपसमूहांसोबत दक्षिण भारत हौशी पर्यटकांना पर्यायांची व्यापक श्रृंखला सादर करीत आहे.

खालील ठिकाणे बघितल्याशिवाय दक्षिण भारत सोडू नका: 

काय पाहालः

hampi south india quick travel guide

  1. उपासनेची मंदिरे: धार्मिक प्रासंगिकतेचा दक्षिण भारताचा दीर्घ इतिहास आहे. हे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम, जैन, बौद्ध आणि ज्यू या धर्मांशी संबंधित विविध पुरातत्व व स्थापत्य आश्चर्यांचे घर आहे. बहुतांश दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये द्रविडी स्थापत्यकला प्रामुख्याने आढळून येते. हम्पी, तंजावर आणि मामल्लापूरम येथे बरीच ऐतिहासिक हिंदू मंदिरे वसलेली आहेत. या प्रदेशातील तिरुपती हे सर्वात गजबजलेले तीर्थस्थान आहे. कोचीमधील ज्यू धर्मियांचे सिनगॉग, हैद्राबादमधील मक्का मस्जिद आणि कर्नाटकमधील नामड्रोलिंग निंगमापा तिबेटी मठ ही ठिकाणे सुद्धा आपल्या ऐतिहासिक महत्त्वाकरिता प्रसिद्ध आहेत.
  2. नैसर्गिक आश्चर्ये: दक्षिण भारत प्राणी व वनस्पतींच्या विविध प्रजातींनी नटलेल्या विशाल उष्णकटिबंधीय जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातील जंगलांमध्ये अजूनही हत्ती व वाघांची संख्या भारतामध्ये सर्वांत जास्त आहे. जर आपल्याला वन्यजीव निरीक्षण आवडत असेल तर बांदीपूर, मुदुमलाई आणि पेरियार राष्ट्रीय उद्यानला भेट द्या. कोवलम, मंगळुरू आणि गोकर्ण येथे भारतातील काही सर्वात सुंदर समुद्रकिनारे आहेत.

काय करावे:

kerala houseboat south india quick travel guide

  1. केरळच्या बॅकवॉटर्समध्ये क्रूज: जर आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आवडत असेल तर आपल्या जीवलगासोबत केरळमधील अलेप्पीच्या बॅकवॉटर्समधील हाउसबोटमध्ये एक दिवस घालवा. रात्रभर बोट चांदण्या रात्रीच्या निरभ्र आकाशाखाली स्थिर उभी राहते. या भागात बजेट हाउसबोट सुद्धा सहजपणे उपलब्ध आहे.
  2. मुदुमलाई आणि बांदीपुर राष्ट्रीय उद्यानमध्ये वन्यजीव सफारीचा आनंद घ्या: दक्षिण भारताची सहल या दोन राष्ट्रीय उद्यानांना भेट दिल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ऊटीला परतताना हत्ती, हरण, मोर, डुक्कर आणि मुंगूस इ. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्यासाठी आपण या उद्यानांमधून भटकंती करू शकता. या रस्त्यावरच्या प्रवासाची संधी आपण मुळीच दवडू नये.
  3. पाँडिचेरी येथे आध्यात्मिक विकेंड व्यतित करा: जर आपण फ्रान्सला कधीच भेट दिलेली नसेल तरीसुद्धा काहीच हरकत नाही. आपण फ्रेंच संस्कृतीची झलक अगदी येथेच पाँडिचेरीमध्ये बघू शकता, जे आता पुद्दुचेरी झालेले आहे. पाँडिचेरी एकेकाळी फ्रेंच वसाहत होती आणि येथील प्रसिद्ध फ्रेंच क्वार्टरमध्ये आपल्याला अजूनही फ्रेंच स्थापत्याची वैशिष्ट्ये बघायला मिळतात. ले कॅफेमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एका रात्रीची सर्वांत रोमँटिक डेट ही तिच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. आपण येथे असताना ओरोव्हिलेला एक निवांत, आध्यात्मिक भेट देण्यास विसरू नका.

काय खावे:

food south india quick travel guide

  1. इडली आणि डोसा: इडली हे दक्षिण भारताच्या प्रमुख खाद्यपदार्थांपैकी एक आहे. मूलत: तांदूळ व डाळीपासून बनवलेला हा वाफाळलेला व गुबगुबीत पदार्थ नारळाच्या खमंग चटणीसोबत वाढला जातो. डोसा हा तांदूळ व डाळीपासून बनलेला कुरकुरीत, पातळ पदार्थ आहे. याचा लोकप्रिय प्रकार म्हणजे मसाला डोसा जो कुस्करलेल्या बटाट्याने भरला जातो आणि मसालेदार नारळी चटणीसोबत वाढला जातो. आपल्याला संपूर्ण दक्षिण भारतात डोशाचे विविध प्रकार बघायला मिळतील. दक्षिण भारतातील जवळपास प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये इडली व डोसा उपलब्ध असतो.
  2. उत्तपम आणि वडा: उत्तपम हा तळलेला पॅनकेक आहे जो तांदळाचे पीठ व डाळ व ताज्या बारीक कापलेल्या भाज्यांनी बनवला जातो. दुसरीकडे वडा हा तळलेला भारतीय डोनट आहे, मात्र तो मसालेदार आणि तिखट असतो.
  3. भात आणि शेवया: भातामध्ये विविध मिश्रणापासून बनवलेल्या तांदळाच्या पदार्थांचा समावेश होतो. बहुतांश प्रकारांसोबत दही वाढले जाते. शेवया म्हणजे तांदळाचे नूडल्स असतात जे रश्यासोबत खातात. फिश करी सोबत भात किंवा शेवयांचा आनंद घ्या. या पाककृतीने निश्चितच आपले मन तृप्त होईल.
  4. चेट्टीनाड पाककृती: ही पाककृती भारतामधील सर्वात मसालेदार आणि सर्वात सुंगधित पाककृतींपैकी एक समजली जाते. खारट भाज्या, उन्हात वाळवलेले मांस आणि विविध प्रकारचे मसाले आपल्याला पोट तुडुंब भरेपर्यंत जेवायला लावतील. या पाककृतीचे वेल्लाई पनियारम, कंधरप्पम, मसाला सीयम आणि करुपट्टी पनियारम हे काही सर्वांत लोकप्रिय प्रकार आहेत.

केव्हा जावे:

south india quick travel guide

डिसेंबर – फेब्रुवारी: दक्षिण भारताला भेट देण्याचा हा सर्वोत्तम हंगाम आहे. हवामान कमी दमट असते आणि तापमान 22-30 डिग्री सेल्सियसच्या दरम्यान असते. काही हिल स्टेशन्स जसे केरळमधील मुन्नार तुलनेने थंड असते, त्यामुळे पातळ जॅकेट किंवा एखादे स्वेटर सोबत ठेवणे फायद्याचेच असते.

मे - ऑक्टोबर: या भागामध्ये पर्यटनाला चालना देण्यामध्ये आयुर्वेदाची भूमिका महत्वाची आहे. पावसाळ्यामध्ये याची चिकित्सा सर्वात प्रभावी समजली जाते, जो मे ते ऑक्टोबर पर्यंत असतो. ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतातील जवळपास सर्वच राज्यांत दसरा आणि दिवाळी सुद्धा साजरी केली जाते.

कसे जावे:

south india quick travell guide

विमानाने: उर्वरित भारतापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे दक्षिणी राज्ये देशातील प्रत्येक भागाशी आणि संपूर्ण जगाशी उत्तमरित्या जोडलेले आहेत. चेन्नई हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार समजले जाते. इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळे हैद्राबाद, बंगळुरू, कोईम्बतूर, कोची, कोळीकोड, तिरुचिरापल्ली आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत. या विमानतळांसोबत, देशांतर्गत विमानप्रवासची व्यवस्था सुद्धा दक्षिण भारतातील जवळपास प्रत्येक शहरात उपलब्ध आहे.

कारद्वारे: दक्षिण भारतात राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचे उत्कृष्ट जाळे पसरलेले आहे. नवीन महामार्गांवर टोल आकारला जात असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना आपल्या सोबत सुटे पैसे अवश्य ठेवावे.

बसद्वारे: दक्षिण भारतात राज्य शासनाच्या मालकीचे बरेचशे बस ऑपरेटर्स वाहतूक सेवा प्रदान करीत आहेत. काही ऑपरेटर दक्षिणी राज्यांना गोवा व महाराष्ट्रासोबतही जोडतात. सरकारी मालकीच्या बस ऑपरेटर्सचे स्मार्टफोन अॅप व समर्पित वेबसाईट्स सुद्धा आहेत जे आपल्याला बसचे मार्ग आणि वेळापत्रकांविषयी अद्ययावत माहिती देतात. जर आपल्याला आरामदायक प्रवास हवा असेल आणि थोडे जास्त पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर खासगी बस ऑपरेटर सुद्धा चांगली निवड आहे.

ट्रेनद्वारे: दक्षिण रेल्वे, दक्षिण-पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वेने दक्षिण भारत उर्वरित भारतासोबत जोडलेला आहे. पूर्ण वातानुकूलित राजधानी ट्रेन काही तासातच शेकडो किलोमीटरचे अंतर कापते. शताब्दी ट्रेन शहरांदरम्यान धावते आणि राज्यांच्या राजधान्यांना जोडते. काही राज्यांमध्ये तर कमी अंतरांसाठी लोकल ट्रेन्स सुद्धा आहेत.

कसे फिरावे:

south india quick travel guide

स्थानिक वाहतूक: सायकलरिक्षा, ऑटोरिक्षा, बोट, टॅक्सी, बस आणि ट्रेन ही दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमधील वाहतुकीची साधने आहेत. तिकीटांची किंमत प्रत्येक शहरात वेगवेगळी असू शकते. वाहतूकीच्या साधनांचे बुकिंग करण्यापूर्वी चांगली किंमत मिळवण्याकरिता घासाघीस करा. काही चालक मीटर वापरण्यास नकार देऊ शकतात. आपण सामानाचा खर्च आणि रात्रीचे शुल्क आधीच ठरवून घ्यावे.

सायकलरिक्षा ही तीन चाकांची पॅडलने चालणारी सायकल आहे तर ऑटोरिक्षा तीन चाकांचे मोटरने चालणारे वाहन आहे ज्यावर कॅनव्हास किंवा टीनचे छत असते. यामध्ये जास्तीत जास्त तीन प्रवाशांकरिता जागा असते. भारतीय ऑटोमध्ये प्रवास करणे खूपच मजेशीर आहे. विक्रम किंवा टेम्पो हे मोठ्या आकाराचे ऑटोरिक्षा आहेत ज्यामध्ये जास्त जागा असते. ते बहुधा ठरवलेल्या मार्गांवरच वाहतूक करतात.

टॅक्सी: टॅक्सी बहुधा मीटरने धावते. मात्र, बहुतांश चालक मीटर वापरत नाही आणि पर्यटकांकडून जास्त भाडे घेतात. त्यामुळे प्रीपेड टॅक्सी वापरणे चांगला पर्याय आहे. मोठ्या शहरांमध्ये आपण रेडिओ टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. बसने प्रवास करणे हा सर्वात किफायतशीर मार्ग आहे. जर आपल्याला आरामदायक प्रवास पाहिजे असेल तर आपण खासगी सर्व्हिस ऑपरेटर निवडावा.

बोट: दक्षिण भारतातील बऱ्याचशा नद्यांवर ये-जा करण्याकरिता स्थानिक पातळीवर बोट आणि फेरींचा पर्याय उपलब्ध आहे. नदीपल्याड जाण्यासाठी किंवा बॅकवॉटर्सचा आनंद घेण्यासाठी लाकडी नावेपासून तर मोठ्या फेरीपर्यंतचे पर्याय सहजपणे निवडता येतात. अधिकांश मोठ्या बोटी मोटरसायकली, सायकली आणि कारसुद्धा नाममात्र शुल्कामध्ये घेऊन जातात.

काय न्यावे:

  1. ट्रेकिंग शूज, सनग्लासेस, कॅप किंवा हॅट आणि सनस्क्रीन आवश्यकच आहे.
  2. जर आपण उन्हाळ्यामध्ये भेट देत असाल तर सुती कपडे, जर समुद्रकिनाऱ्यांवर फिरणार असाल तर बीचचे कपडे आणि पावसाळ्यामध्ये छत्री आणि/किंवा रेनकोट सोबत बाळगावा.
  3. जर आपण पारंपारिक पोशाखात नसाल तर दक्षिण भारतातील काही मंदिरांमध्ये आपल्याला प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे स्थानिक पोशाखाचा एक संच तरी किमान आपल्यासोबत बाळगावा.

गर्द हिरव्यागार किनारपट्टी, संथ बॅकवॉटर्स आणि असंख्य स्थापत्य आणि ऐतिहासिक आश्चर्यांनी दक्षिण भारताला आधुनिक आणि पारंपारिकतेचा अनोखा संगम बनवलेले आहे. एका अविस्मरणीय अशा अनुभवासाठी येथे अवश्य भेट द्या. 

More Travel Inspiration For Allepey