फुकेत हे फन, फॅब्युलस आणि सोबतच फ्री सुद्धा आहे! अर्थातच काही गोष्टींसाठी!
आता, जर आपल्याला सुट्ट्यांमध्ये काही मोफत भेटवस्तू मिळाल्या ज्यासाठी कदाचित आपल्याला बरेच पैसे खर्च करावे लागले असते, तर आपल्याला आवडणार नाही का? अर्थातच आवडेल, त्यामुळेच फुकेतला भेट देताना करण्यासारख्या शीर्ष 5 नि:शुल्क गोष्टींची ही यादी आम्ही आपल्याकरिता बनवलेली आहे. सर्व पर्याय खुले ठेवून, आपल्याला या ठिकाणी भेट देण्याकरिता लागणारा वाहतूक खर्च करायचा आहे, मात्र कदाचित आपल्या खिशावर भार पडण्याची ती एकमेव वेळ असेल!
फुकेतचे समुद्रकिनारे थायलंडमधील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी आहेत आणि या बेटावरील कोणत्याही सहलीचा तो सर्वांत महत्वाचा आणि आकर्षक भाग आहे. फुकेतमध्ये करण्यासारख्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे बीच हम्पिंग. शांत सूरीन बीचपासून तर लोकप्रिय पातोंग बीचपर्यंत आपण कशाचीही निवड करू शकता आणि कसलाही खर्च न करता धमाल मस्ती करू शकता. कमाला, कलिम, काटा नोई आणि नाई हान यासारख्या काही शांत समुद्रकिनाऱ्यांवर विश्रांती घेत आपण आपला दिवस घालवू शकता. फुकेतच्या आग्नेय दिशेला 3 किमी अंतरावरील कोरल बेटावर स्थित अज्ञात बनाना बीच हा आणखी एक समुद्रकिनारा आहे जो निःशब्द वातावरणाचा आनंद घेण्यास आणि सूर्यप्रकाशात स्नान करण्यास आदर्श असा प्रेक्षणीय समुद्रकिनारा आहे.
विविधरंगी, भन्नाट नाईटलाईफ, पर्यटकांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्नशील असलेले बार व ग्राहकांचे आपल्याकडे लक्ष वळवण्याकरिता स्पर्धा करीत असलेल्या महिला नर्तिकांनी सजलेला बांगला रोड कदाचित काही लोकांना अस्वस्थ करणारा असू शकतो मात्र तरीही तो उत्साहाने भरलेला आहे आणि फुकेतच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. फुकेतच्या पातोंग बीच भागामध्ये असलेला बांगला रोड हा बऱ्याच रेस्टॉरंट, बार, डिस्कोथेक, नाईटक्लब आणि गो-गो बारचे घर आहे. इतर काहीच नाही तर फुकेतचे सौंदर्य बघण्यासाठी रात्री या भागात फक्त फेरफटका मारण्यासही आपण जाऊ शकता.
उंच कळसाची कल्पना करा जेथून आपण नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि समुद्राचे दृश्य बघू शकता आणि ते सुद्धा अगदी मोफत! फुकेतच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेले फ्रोमथेप केप ही डोळ्यांसाठी पर्वणी आहे आणि विशेषत: हौशी फोटोग्राफर्सकरिता तर नंदनवनच आहे. कळसावर एक दीपगृहही आहे, जेथे बऱ्याच ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन मांडलेले आहे आणि बाह्य स्थळदर्शनाची व्यवस्था सुद्धा आहे. दीपगृहामध्ये प्रवेश अगदीच नि:शुल्क आहे. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी भेट देण्याचा प्रयत्न करा, थोडक्यात सांगायचे तर दृश्ये अगदीच नाट्यमय आहेत (फुकेत पर्यटनाकरिता अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा).
फुकेतमधील नाक्केर्ड डोंगरावर विराजमान असलेल्या बुद्धाच्या मोठ्या पुतळ्याकडे मार्गक्रमण करताना विस्मयचकित होण्यास तयार राहा (पुतळा कित्येक मैल दूरवरून सुद्धा नजरेस पडतो). सुमारे 45 मीटर उंचीचा हा पुतळा कदाचित थायलंडमधील सर्वात मोठा बुद्ध पुतळा असेल आणि फुकेतमध्ये या ठिकाणाला भेट देण्याची शिफारस अगत्याने केली जाते. येथील वैभव आणि भव्यतेसोबतच, डोंगराच्या कळसावरून दिसणारे विलक्षण प्रेक्षणीय दृश्य आपल्याला भारावून टाकते आणि हे सर्व अगदी नि:शुल्क आहे!
सामान्य पर्यटन स्थळाच्या पलिकडे जाऊन विचार करा आणि युरोपिअन प्रभावाखालील जुन्या काळाचे आकर्षण टिकवून ठेवलेल्या फुकेत टाऊनला भेट द्या. फुकेतचा किनारपट्टी व्यतिरिक्त भाग जर आपल्याला बघायचा असेल जुन्या शहराला भेट देणे आपल्याकरिता आवश्यकच आहे. येथे पदभ्रमण करा, ऐतिहासिक स्थळे बघा आणि जुन्या शहराला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास विसरू नका!
फुकेतमध्ये करण्यासारख्या या सर्व नि:शुल्क गोष्टी फक्त काही पावलांच्या अंतरावरच आहे. तर मग फुकेतसाठीची फ्लाईट्स, हॉटेल्स आणि पॅकेजेसची बुकिंग फक्त आमच्याकडेच करा!
Book Your Flight from New Delhi To Phuket
5 Reasons Why Phuket Always Impresses All Kinds of Travellers
Bhavya Bhatia | Oct 19, 2021
Places to Visit in Thailand for Couples
MakeMyTrip Holidays | Mar 9, 2020
Devour This: Long Weekend Planner for a Fab April '17 Holiday
Mayank Kumar | Apr 6, 2017
Top 5 Hotels to Look Out For in India and Thailand
Ankita Sharma Sukhwani | Apr 3, 2017
5 Most Fascinating Cities Around the World
Rakhee Ghelani | Apr 3, 2017
5 Best Luxury Hotels in Phuket
Surabhi Shikha | Oct 10, 2018
Top 6 Things to Experience on Your Thailand Trip
Smita Jha | Feb 2, 2023
Have You Been to the James Bond Island Yet?
Ragini Mehra | Dec 21, 2017
6 Rich Experiences to Try on Saudi's Coasts
MakeMyTrip Blog | Dec 3, 2021
After Months of Probing, We Finally Decided to Take the Risk!
Harsh Manalel | Dec 5, 2020
Off-Beat Balinese Resorts for a Safe Vacay! #FromIndonesiaWithLove
Garima Jalali | Nov 19, 2020
#WonderfulIndonesia: Explore These 5 Hidden Islands!
Shubhra Kochar | Nov 19, 2020
#FromIndonesiaWithLove: 5 Balinese Experiences You Can’t Miss!
Shubhra Kochar | Nov 19, 2020
After 6 Months of Boredom, Our Trip to Pondicherry Was a Lifesaver!
Rajat Katiyar | Oct 27, 2020
Top Exotic Resorts for the Perfect Thailand Experience!
Shubhra Kochar | Nov 24, 2022
Escape the Touristy Crowd at Thailand’s Most Secluded Islands!
Shubhra Kochar | Feb 2, 2023