भारतातील 10 विलक्षण तलाव, ज्यांना बघितल्यावरच आपला विश्वास बसेल!

Pallavi Siddhanta

Last updated: Sep 24, 2019

Author Recommends

Do

Trekking and camping in Nubra Valley, known as the 'orchard of Ladakh'
Biking at Khardung La, the world's highest motorable road

Eat

Ladakh: Pava, a mixture of peas and barley flour
Chalak, made of tea, butter, sugar and Tsampa
Thukpa, noodles served with a flavoured meat sauce
Curd made from yak milk
Moe Moe, steamed Tsampa dough served with meat or vegetables

Trivia

Tso Lhamo Lake, or Cholamoo Lake, the highest lake in India, is in North Sikkim

See

Wayanad: Meenmutty Falls, Banasura Sagar Dam
Sikkim: Khecheopalri Lake, also known as the "wishing lake"

Click

Snow-covered peaks of Kanchenjunga, Phodong and Labrang monasteries from Tashi Viewpoint

Want To Go ? 
   

 

 कदाचित तलावाच्या काठावर फेरफटका मारण्यावर सत्य विसंबून असते.” – वॉलेस स्टिव्हन्स

जर आपल्याला फोटो काढायचा असेल, तर आपण काय निवडाल? हृदयाच्या आकाराचा एक तलाव, किंवा मानवी हाडे असलेला तलाव? किंवा अंशत: भारतीय प्रदेशात असलेला आणि तरीसुद्धा जगातील सर्वात सुंदर अंतर्देशीय तलावांपैकी एक असलेला? डोंगरांनी वेढलेला किंवा जवळच्या महासागर किंवा समुद्राने भरण-पोषण होणारा, तलाव हा नेहमीच शांतता आणि आत्मपरीक्षणाचा स्त्रोत राहिलेला आहे. येथे भारतातील दहा अनोखे आणि नयनरम्य तलाव दिलेले आहेत ज्यांना बघणे हा जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव ठरेल:

1. पॅन्गाँग त्सो, लडाख

Pangong Tso, Amazing Lakes in India

लेहपासून पाच तासांचा डोंगराळ रस्ता पार केल्यानंतर येणारा खाऱ्या पाण्याचा तलाव पॅन्गाँग त्सो हे भारतातील सर्वात नयनरम्य ठिकाणांपैकी एक आहे. मला खात्री आहे की लाल लेहंगा घातलेल्या करीना कपूरला पॅन्गाँग त्सोच्या किनाऱ्यावरून स्कूटर चालवतानाचे दृश्य आपल्या नक्कीच आठवणीत असेल! आपल्याला माहित आहे का की वास्तविक नियंत्रण रेषा अगदी यामधून गेलेली आहे आणि तलावाचा मोठा भाग चीनच्या मुख्यभूमीमध्ये आहे? माझे जीवन यासारखेच रोमांचक बनवण्याची हीच खरी वेळ आहे!

Book Your Flight to Leh Here!

2. पराशर लेक, मंडी

Prashar Lake, Amazing Lakes in India

पराशर लेक, हा ऋषी पराशर यांच्या हिमाचली शैलीच्या मंदिरासमोर असलेला एक हिम तलाव आहे जो मंडीपासून 49 किलोमीटर अंतरावर आहे. हा एक सोपा ट्रेक आहे, ज्यामुळे आपण अगदी मुलांसोबत सुद्धा येथे जाऊ शकता. आपल्या गडद निळ्या पाण्यामुळे हा तलाव उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये सभोवतालच्या भूप्रदेशापासून अगदीच निराळा दिसून येतो. उन्हाळा पराशर तलावामध्ये निळ्या व हिरव्या रंगाच्या अपरिमित छटा विखुरतो तर हिवाळा त्याला अल्पाईन पांढऱ्या व निळ्या रंगाच्या देखाव्यामध्ये रूपांतरित करतो.

Book Your Flight to Kullu Here!

3. लेक पिचोला, उदयपूर

Lake Pichola, Amazing Lakes in India

सिटी पॅलेस, उदयपूरमध्ये बांधलेला कृत्रिम तलाव लेक पिचोला अगदी क्षितिजापर्यंत विस्तारलेला आहे. या सुंदर तलावाची लांबी 4 किलोमीटर आणि रुंदी 3 किलोमीटर आहे. सिटी पॅलेसमधून तलावाचे विलक्षण दृश्य नजरेस पडते आणि आपण रामेश्वर घाटापासून नावेने लांब बोट राईडचा आनंद घेऊ शकता. तसेच आपण सनसेट बोट राईडही घेऊ शकता जी एका अद्भूत रोमँटिक अनुभवाची रचना करते!

Book Your Flight to Udaipur Here!

4. लोकटक लेक, मणिपूर

Loktak Lake, Amazing Lakes in India

वनस्पती व वन्यजीवांचे निवासस्थान आणि ईशान्य भारतामधील ताज्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव म्हणजे लोकटक लेक हा त्यावरच्या तरंगत्या फमडिसकरिता प्रसिद्ध आहे. फमडिस म्हणजे एकत्रित मातीचा ढिगारा, झाडे-झुडपे आणि इतर जैविक पदार्थ जे कुजण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात असतात. या ढिगाऱ्यांमुळे तलावावर लहानशी बेटे तयार झालेली आहेत, ज्यावर प्रत्यक्षात लोक राहतात. लहानशा फमडिसच्या दृश्यांमुळे लोकटक तलाव बघणे हा अविस्मरणीय अनुभव असतो.

Book Your Flight to Imphal Here!

5. चंद्रताल लेक, स्पिती

Chandratal Lake, Amazing Lakes in India

पॅन्गाँग त्सोची नैसर्गिक प्रतिकृती स्पितीमध्ये आहे, 4300 मीटर उंचीवर स्थित चंद्रताल तलावाला हे नाव चंद्रकोरीच्या आकारामुळे मिळाले. चंद्रतालचा शब्दश: अर्थ ‘चंद्राचा तलाव’ असा होतो आणि हा लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील कूंझूम ला पासपासून 7 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तलावाची छटा नीलमणीसदृश निळ्या रंगाची आहे आणि त्याच्या सभोवताली व्यापक गवताळी पठार आहे. आपण आणखी काय हे विचारले का? आकाशगंगा बघण्यासाठी आणि मोबाईलच्या व्यत्ययाशिवाय शांततापूर्वक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी स्पिती हे आदर्श ठिकाण आहे.

6. सोमगो लेक, गंगटोक

Tsomgo Lake, Amazing Lakes in India

नाथू ला पासच्या रस्त्यावर गंगटोकपासून 35 किलोमीटर अंतरावर हा तलाव स्थित आहे. समुद्रसपाटीपासून अतिशय उंचावर असलेल्या सोमगो तलावाला स्थानिक भाषेत चांगू तलाव म्हटले जाते, याचा अर्थ अल्पाईन, हिमतलावाच्या आजूबाजूला असणाऱ्या उंच शिखरांना आपण बघू शकता. आसपासचा बर्फ वितळल्याने तलावामध्ये पाणी भरले जाते. तलावाच्या काठांवर रंगीत प्रार्थना ध्वज आणि घंटा लावलेल्या आहेत, ज्यामुळे पूर्वी हिमालयामध्ये भेट देण्यासाठी हे एक अद्भूत ठिकाण बनलेले आहे.

Book Your Flight to Bagdogra Here!

7. वेम्बनाड लेक, कुमारकम

Vembanad Lake, Amazing Lakes in India

कुमारकम हे वेम्बनाड तलावाचे घर आहे, जो भारतातील सर्वात लांब तलावांपैकी एक असल्याचा आणि केरळमधील सर्वात मोठ्या तलावांपैकी एक असल्याचा दावा केला जातो! तसेच, तलाव जास्त प्रसिद्ध नसल्याने तेथे गर्दीसुद्धा कमी असते, ज्यामुळे आपल्याला शांतचित्ततेचा अनुभव येण्याची खात्री आहे. यापेक्षाही अद्भूत गोष्ट ही आहे की हा तलाव गोड व खाऱ्या पाण्याचे संयोजन आहे ज्याला खाऱ्यापाण्याच्या बांधाने विभागलेले आहे. हाउसबोटमध्ये वास्तव्य करा आणि वेम्बनाडच्या सुंदरतेमध्ये व प्रसन्नतेमध्ये स्वत:ला चिंब भिजवून घ्या.

Book Your Flight to Cochin Here!

8. दल लेक, श्रीनगर

Dal Lake, Amazing Lakes in India

काश्मीरचे अस्सल सौंदर्य त्याच्या संपूर्ण भव्यतेसोबत अनुभवण्याकरिता दल लेक आपल्या पर्यटन स्थळांच्या यादीत असणे आवश्यकच आहे. कश्मीर की कलीच्या दिवसांपासून पर्यटकांनी गजबजलेले दल लेक उन्हाळा व हिवाळा या दोन्ही हंगामामध्ये दोन अतिशय भिन्न भूदृश्यांमुळे विलक्षण सुंदर दिसते. 15 किलोमीटरचा गोल तलाव राज युगापासूनच्या हाउसबोटींनी भरलेला आहे, यांच्यासोबत संपूर्ण लेकमध्ये फिरणारे शिकारे सुद्धा आहेत जे पर्यटकांना रस्त्यापासून त्यांच्या हाउसबोटींपर्यंत घेऊन जातात किंवा बोट राईडवर फिरवतात. शिकाऱ्यांचा वापर सर्व प्रकारच्या काश्मीरी हस्तकलेच्या वस्तू आणि ट्रिंकलेट्स, फळे, फूले आणि भाज्या विकण्याकरिता सुद्धा केला जातो.

Book Your Flight to Srinagar Here!

9. चेम्ब्रा लेक, वायनाड

Chembra Lake, Lakes in India

वायनाडमधील चेम्ब्रा कळसाच्या रस्त्यावर असलेल्या हृदयाच्या आकाराच्या चेम्ब्रा तलावाला प्रेमात बुडालेल्यांकरिता नंदनवन म्हटले जाते. वायनाड जंगलातील चेम्ब्रा कळस हा बांदीपूरजवळील लोकप्रिय ट्रेकिंग ट्रेल आहे. आपल्या सुंदर आकाराचा अपवाद सोडल्यास डोंगराच्या एका बाजूला असलेला चेम्ब्रा तलाव कधीच कोरडा पडलेला नाही असे समजते. आश्चर्यच आहे ना?

Book Your Flight to Calicut Here!

10. रूपकुंड लेक, चामोली जिल्हा, उत्तराखंड

Roopkund Lake, Lakes in India

आपल्या भारतीयांचा भूताखेतांच्या गोष्टींकडे जरा जास्तच कल आहे. त्यामुळे जेव्हा मला असे माहित झाले की असा एक तलाव आहे ज्याला ‘गूढ तलाव’ सुद्धा म्हटले जाते, ज्यामध्ये मानवी हाडे आणि अवशेष आहेत जे इ.स. 850 पासून तिथे आहेत तेव्हा मी लगेच त्याचे नाव या यादीमध्ये जोडले! रूपकुंड तलाव हा समुद्रसपाटीपासून उंचावर असलेला हिम तलाव आहे, जिथपर्यंत 5-6 दिवसांची ट्रेकिंग ट्रेल केल्यानंतरच पोहोचता येते आणि बर्फ वितळल्यावर तेथे मानवी हाडे दिसून येतात. या अवशेषांकरिता वैज्ञानिक आणि परावलौकिक कारणे सांगितली जातात मात्र त्यांचे रहस्य अजूनही तसेच कायम आहे.

Book Your Flight to Dehradun Here!

आपले मन शांततेत काही काळ व्यतित करण्यास आतुर झाले आहे? तर मग आमच्यासोबत आत्ताच यापैकी एखाद्या तलावाकडे चला!