आम्ही एका मिशनवर आहोत. मिशन आहे त्या कारणाला हद्दपार करणे जे सहलींची योजना आखताना प्रत्येकजण सांगत असतात आणि आपल्या पाळीव प्राण्यांना मागे ठेऊन सहलीवर जात असतात. आपल्या बाजूला भिरभिरणारे यंत्र असताना आपण नवीन शहरे बघण्याची, सोबत ट्रेक करताना आपण आपल्या डॉगीसोबत गोष्टी शेअर करण्याची किंवा संपूर्ण देशभरातील सर्वात सुंदर अशा ठिकाणांपैकी काहींवर आपण त्याच्या/तिच्यासोबत सेल्फी काढतानाची कल्पना करून बघा.
आपल्या संपूर्ण कुटुंबासहित लहानशा केसाळ प्राण्यासोबत त्या परफेक्ट हॉलिडेचे प्लॅनिंग करण्यास मदत म्हणून आम्ही भारतातील सर्वोत्तम निवडक पेट-फ्रेंडली हॉटेल्सची यादी येथे देत आहोत.
आग्रा रोडवर शहरापासून 5 किमी अंतरावर असलेले हे रिसॉर्ट उत्तमरित्या डॉगीजची काळजी घेते आणि त्यांची सर्वोत्तमरित्या देखभाल घेतली जाईल याची खात्री करते. कूक आपल्या डॉगीचे आवडते खाद्यपदार्थ तयार करतील आणि आपल्या डॉगीसोबत खेळण्यास व बागडण्यास हॉटेलचे लॉन उत्कृष्ट संधी प्रदान करेल. येथे राहण्याची सर्वात उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे आपल्याला व आपल्या पाळीव प्राण्याला शेरीची कंपनी मिळेल जी 3 वर्षांची बॉक्सर गर्ल आहे. तिला लोकांना आणि डॉगीजना भेटायला आवडते आणि हॉटेलच्या पाहुण्यांचे ती उत्साहाने स्वागत करते.
आपल्या डॉगीकरीता बेडिंग सोबत ठेवण्यास विसरू नका जे रूममध्ये आपल्या बेडच्या बाजूलाच ठेवता येईल.
डॉगीकरिता शुल्क: आपल्या प्रेमळ डॉगीकरिता काहीच अतिरिक्त शुल्क नाही!
Book Your Stay at Woods Villa Resort
आपल्या डॉगीला ऋषिकेशमधील या हॉटेलचे सुंदर, हिरवेगार लॉन नक्कीच पसंत पडेल. बुल्स रिट्रीटमधील कर्मचारी वर्गाला पाळीव प्राण्यांचा खूपच लळा आहे आणि ते त्यांचे स्वागत खुल्या दिलाने करतात. हॉटेल आपल्या स्वादिष्ट भोजन, उत्कृष्ट सेवा आणि सुंदर खोल्यांद्वारे आपले लाड पुरवेल. हॉटेलच्या खोल्या एका मोठ्या लॉनमध्ये उघडतात जेथे आपण संध्याकाळी विश्रांती घेऊ शकता आणि आपल्या डॉगीसोबत मनसोक्त वेळ घालवू शकता. आपल्या डॉगीसह जवळच्या ओढ्यात पोहण्याकरिता किंवा मनसोक्त भटकंती करण्याकरिता जाण्याची कल्पना अतिशय उत्साहवर्धक आहे.
आपल्यासाठी किंवा आपल्या डॉगीकरिता आरामदायक निवासाची खात्री प्रदान करण्याइतपत बुल्स रिट्रीटच्या खोल्या मोठ्या आहेत मात्र आपल्यासोबत त्याचा/तिचा बेड ठेवण्यास विसरू नका.
डॉगीकरिता शुल्क: प्रेमाची किंमत लावता येत नाही त्यामुळे आपल्या डॉगीचे वास्तव्य नि:शुल्क असेल!
Book Your Stay at Bull’s Retreat
हे हॉटेल सर्व मुंबईकरांकरिता आहे, आपल्या कंटाळवाण्या दैनंदिन वेळापत्रकातून विश्रांतीकरिता सवड घ्या. पुढील विकेंडमध्ये आपण हे करावे: आपल्या बॅग पॅक करा, आपल्या डॉगीकरिता एक सुंदर हार्नेस घ्या आणि थेट फोर सीझन्स हॉटेलकडे प्रयाण करा. आपल्या डॉगीकरिता आपल्या रुममध्ये आरामदायक बेड सुसज्ज असेल आणि त्याच्या मनोरंजनाकरिता बरीच खेळणी व ट्रीटचा पर्याय उपलब्ध असेल. हॉटेलचे शेफ आनंदाने आपल्या डॉगीच्या विशेष आहाराची व्यवस्था करतील. हॉटेलच्या प्रशस्त लॉन आणि वॉकवेचा आनंद घेण्यास विसरू नका जे आपल्या डॉगीसोबत सकाळी फेरफटका मारण्यास उत्तम आहे.
आपल्यापैकी ज्यांना मुंबईला कामाकरिता किंवा मौजमजेकरिता भेट द्यायची असेल त्यांनी आपल्या डॉगीला अवश्य सोबत न्यावे आणि आतापर्यंतच्या अविस्मरणीय सहलीचा आनंद घ्यावा.
डॉगीकरिता शुल्क: 30 किलोपेक्षा कमी वजनाच्या डॉगीकरिता प्रति दिन रु.1500 + कर
Book Your Stay at Four Seasons
पाळीव प्राण्यांच्या पालकांकरिता व त्यांच्या या विशिष्ट केसाळ पाल्यांकरिता ताज एक्झोटिका, गोवा हे आदर्श स्थान आहे. येथील सर्वच रुम अतिशय विलासपूर्ण असल्या तरीसुद्धा आम्ही समुद्राचे दृश्य दिसणाऱ्या रुम निवडण्याची शिफारस करीत आहोत जेणेकरून आपण स्वत:शी चिंतन करू शकाल आणि आपल्या डॉगीसोबत काही काळ शांतपणे व्यतित करू शकाल. हॉटेल आपल्या डॉगीकरिता बेड, डॉग फूड आणि खेळण्यांची व्यवस्था करेल जेणेकरून आपल्या डॉगीचे पूर्ण लाड पुरवले जातील. जर आपल्या डॉगीला विशिष्ट आहारच पाहिजे असेल तर शेफ आनंदाने आपल्या पाककृतींमध्ये बदल करून निवड प्रदान करतील!
हॉटेलच्या सुंदर वातावरणाच्या संगतीने सकाळ घालवा आणि आपल्या या लहानशा जीवलगासोबत संध्याकाळी मौजमजा करण्याकरिता गोव्यातील बऱ्याच समुद्रकिनाऱ्यांपैकी एकाकडे प्रयाण करा. समुद्रकिनारी मस्ती करताना सेल्फी घेण्यास मात्र विसरू नका!
डॉगीकरिता शुल्क: आपल्या डॉगीचे वास्तव्य अगदीच मोफत असेल!
बंगळुरूच्या उच्चभ्रू वसाहतींपैकी एक असलेल्या एम जी रोडवर स्थित विवांता बाय ताज हे पाळीव प्राण्यांकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्याकरिता प्रसिद्ध आहे. आपण येथे असताना त्यांच्या लॉनकडे उघडणारी रुम निवडण्याची शिफारस आम्ही करीत आहोत जेणेकरून आपल्या डॉगीला खेळण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध असेल. आपला डॉगी खेळण्याचा मनमुराद आनंद घेत असताना आपण रुम सर्व्हिसला ऑर्डर देऊन लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची कल्पना कशी आहे?
या पेट-फ्रेंडली हॉटेलमध्ये 45 किलोपेक्षा कमी वजनाच्या डॉगींसाठी परवानगी आहे, मात्र त्यापेक्षा जास्त वजनाच्या ब्रीडकरिता आपल्याला पूर्व-परवानगी घेणे आवश्यक असेल. सोबतच आपल्याला हॉटेलमध्ये आपल्या डॉगीकरिता बेड नेणेसुद्धा आवश्यक असेल.
डॉगीकरिता शुल्क: प्रति दिन रु.3000 + कर
Book Your Stay at Vivanta by Taj
आपल्या डॉगीसोबत कधी हॉटेलमध्ये वास्तव्य केले आहे का? आता तुम्ही करू शकता! भारतातील या हॉटेलपैकी एक हॉटेल निवडा आणि आपल्या कुटुंबातील या चार पायांच्या सदस्यासोबत आनंदाने काही काळ व्यतित करा.
Mayank Kumar Follow
Prefers Bukowski and Gulzar over Shakespeare and Tagore. And nights over daytime. Possesses wit that offends more than it impresses. Anti-social and friendly in the same breath. Miniature souvenir and stationery hoarder. Desperately trying to bring being nice in vogue.
Escape into the Offbeat Wilderness of Goa!
Pooja Akula | Mar 10, 2021
7 Breathtaking Pool Villas to Book Near Goa!
Sudip Dey | Nov 20, 2020
A Goa Trip Gone Crazy- Water Sports Edition!
Renita Sharel Pereira | Sep 11, 2020
Our Celebratory Town Hall in Goa Right before the Lockdown!
Amrita Tripathi | May 29, 2020
Missing Our Romantic Moments in Goa!
Namita Dave | Jan 20, 2023
College Trip to Goa through My Camera Lens!
Amlan Ghosh | Jan 20, 2023
A List of Must-visit Locales in North Goa for Couples
MakeMyTrip Holidays | Jan 20, 2023
Top Places to Visit in Goa Other than Beaches
MakeMyTrip Holidays | Mar 30, 2022
Encounter MP’s Wildlife Wonders at These Wow Jungle Resorts!
Surangama Banerjee | Mar 3, 2020
Experience Seekers Alert! These 7 Dreamy CGH Earth Resorts Are for You
Surangama Banerjee | Dec 26, 2019
Luxury Hotels in New South Wales that Offer the Best Window Views
Namrata Dhingra | Oct 17, 2019
Your Guide to Enjoying the Best Daycation in Delhi NCR!
Devika Khosla | Mar 17, 2020
Live the Luxe Life with an Experiential Stay at the Postcard Hotels!
Tabassum Varma | Aug 9, 2019
Pick These Unconventional Properties, to Holiday in Goa the Postcard Way!
Sunny Mishra | Aug 21, 2019
Whispering Palms Beach Resort Goa: A Dreamy Beachfront Stay
Surangama Banerjee | May 6, 2019
Top Hotels in Navi Mumbai for a Splendid Stay
Tabassum Varma | Apr 30, 2019