भारतातील 10 तीर्थस्थळे जेथे एकवेळा भेट देणे अगत्याचेच आहे

Prachi Joshi

Last updated: Nov 29, 2017

संपूर्ण जगातून आध्यात्मिक चैतन्याच्या शोधात हजारो लोक भारतात येतात. योगायोगाने, यापैकी बहुतांश स्थळे अशा ठिकाणी वसलेली आहेत जी अतुलनीय नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहेत. मंदिरे व तीर्थस्थळांच्या या भूमीमध्ये आम्ही भेट देण्याकरीता भारतातील 10 तीर्थस्थळांची निवड केली आहे.

शिर्डी

shirdi
Image Courtesy: Shri Sai Baba Sansthan Official Website

 

महाराष्ट्रातील पवित्र नगरी शिर्डी ही साई बाबांचे धाम म्हणून ओळखली जाते – साई बाबा ज्यांचे अनुयायी सर्व धर्मातील लोक आहेत आणि ज्यांनी चमत्कार सर्वज्ञात आहेत असे म्हटले जाते. संपूर्ण वर्षभर येथे भाविकांची रांग लागलेली असते आणि येथे रामनवमी, गुरुपौर्णिमा व विजयादशमी हे प्रमुख सण साजरे केले जातात.

Book Your Pilgrimage to Shirdi Here

तिरुपती

तिरुपतीजवळील तिरुमला वेंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. मंदिर हे भगवान वेंकटेश्वराप्रती समर्पित आहे जो भगवान विष्णूंचा एक अवतार आहे. प्रत्येक वर्षी लाखो भक्त या मंदिराला भेट देतात, विशेषत: ऑक्टोबरमध्ये नऊ दिवसांच्या ब्राह्मोत्सवन उत्सवादरम्यान.

Book Your Pilgrimage to Tirupati Here

रामेश्वरम

rameswaram

रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिर हे भगवान शिवच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि सोबतच चार धाम यात्रेचा एक भागही आहे. पाम्बन बेटावर वसलेले आणि मुख्य भारताशी एका पूलाद्वारे जुळलेल्या रामेश्वरमला अवश्य भेट द्यावी मग आपण धार्मिक वृत्तीचे असाल किंवा नसाल. येथे महाशिवरात्री आणि नवरात्री हे विशेषत: प्रसिद्ध असे सण आहेत.

Book Your Pilgrimage to Rameswaram Here

सोमनाथ आणि द्वारका

द्वारका आणि सोमनाथचे समुद्रकिनारी असलेले भव्य मंदिरे हे खरंच विस्मयकारक आहेत. द्वारका हे चार धामच्या चार धार्मिक स्थळांपैकी एक आहे आणि जगत मंदिराचे घर आहे, ज्याला द्वारकाधीश मंदिरही म्हटले जाते जे भगवान कृष्णाला समर्पित आहे. सोमनाथ मंदिर हे भगवान शिवच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

Book Your Pilgrimage to Somnath and Dwarka Here

वैष्णोदेवी

सर्वात महत्त्वाच्या भारतीय तीर्थस्थळांपैकी एक म्हणजे जम्मूमधील कटराजवळचे वैष्णोदेवी मंदिर. हे मंदिर 5,300 फूट उंचीवर आहे आणि कष्टप्रद चढाई केल्यानंतर तेथे पोहोचता येते. हे शक्ती या देवीकरीता समर्पित आहे आणि 51 शक्तीपिठांपैकी एक आहे. येथे साजरा केला जाणारा सर्वात मोठा उत्सव म्हणजे नवरात्री आहे.

Book Your Pilgrimage to Vaishno Devi Here

पुरी

ओडिशामधील समुद्रकिनाऱ्यावरचे पवित्र शहर पुरी हे आपल्या जगन्नाथ मंदिराकरीता प्रसिद्ध आहे. भगवान जगन्नाथाला समर्पित असणाऱ्या या मंदिराच्या रथ यात्रेमध्ये (किंवा रथ उत्सव) संपूर्ण जगातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात व मंदिरापासून समुद्रापर्यंतची देवाची मिरवणूक साजरी करतात.

Book Your Pilgrimage to Puri Here

अमृतसर

amritsar

चकाकणाऱ्या सोनेरी मंदिराचे पाण्यात प्रतिबिंब पडलेले दिसते, ग्रंथ साहिबचे मनाला शांत करणारे उच्चारण कानावर पडत असते, अशा शांतचित्त वातावरणाची अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची (हरमंदिर साहिब) सहल अगत्याचीच आहे. रोज हजारो भाविकांची भूक शांत करणाऱ्या लंगरचा प्रसाद घेणे चुकवू नका. गुरु नानक जयंती आणि बैसाखी हे काही उत्सव आहेत जे येथे मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात.

अजमेर

संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे अजमेर येथील प्रसिद्ध दर्गा शरीफ, हे सुफी प्रार्थनास्थळ बॉलीवूडच्या ताऱ्यांचे आवडते ठिकाण आहे, जे आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी येथे हजेरी लावतात! आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर हजारो भक्त येथे चादर अर्पण करण्याकरीता येतात. वार्षिक उरुस उत्सव सुफी संतांची आठवण म्हणून साजरा केला जातो.

अधिक वाचण्याकरीता: सन 2017-18 मधील राजस्थानच्या सण आणि जत्रा

मथुरा

भगवान कृष्णाचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथुरा आणि जवळच्याच वृंदावनमध्ये हजारो मंदिरे आहेत जे या खोडकर, गव्हाळ वर्णाच्या देवाला समर्पित आहेत. केशव देव मंदिर आणि बांके बिहारी मंदिर हे येथील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहेत. द्वारकेमध्ये जन्माष्टमी आणि होळी हे प्रमुख सण आहेत.

वाराणसी

varanasi

वाराणसी हे प्राचीन शहर सर्वात पवित्र म्हणून समजले जाते आणि येथे गंगा नदीच्या काठी बरीच मंदिरे वसलेली आहेत. या शहरात काशी विश्वनाथ मंदिर आणि संकट मोचन मंदिर या दोन मंदिरांना सर्वात जास्त भाविक भेट देतात. वार्षिक गंगा महोत्सवामध्ये भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा केला जातो.

Here listed are all pilgrimage packages, book now!