संपूर्ण भारतातील 8 लक्झरी स्टर्लिंग हॉलिडेज रिसॉर्ट्स

Devika Khosla

Last updated: Jun 28, 2017

Want To Go ? 
   

सन 2016 सरताना सुट्टी घेण्याची हीच योग्य वेळ आहे ज्यामध्ये आपण रिलॅक्स होऊन, रिचार्ज होऊन ताजेतवाने होत नववर्षामध्ये जोमात पदार्पण करू शकता. स्टर्लिंग हॉलिडेज रिसॉर्टचे संपूर्ण देशभरात कित्येक अत्याधुनिक परंतु किफायतशीर रिसॉर्ट्स आहे जे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी विलक्षण ठिकाणे आहेत. उच्चतम दर्जाच्या सर्व सुखसोई व आणखी बरेच काही प्रदान करणाऱ्या सुविधा व साधनांनी सुसज्जित असलेल्या काही रिसॉर्टची आम्ही येथे शिफारस करीत आहे जे आपल्या सुट्टीच्या अनुभवाला प्रत्येक बाबतीत सरस बनवण्यास प्रतिबद्ध आहेत!

मुन्नार टेरेस ग्रीन्स, मुन्नार

Munnar­Terrace-Greens

हिरव्यागार डोगरांच्या पुढ्यात असलेल्या टवटवीत चहाच्या बागा व सुगंधी मसाला लागवडीच्या निसर्गरम्य परिदृश्यामध्ये वसलेले मुन्नार टेरेस ग्रीन्स हे एक नव्याने नूतनीकरण केलेले रिसॉर्ट आहे जे आपल्या सुसज्जित खोल्या आणि सूट्समध्ये आरामदायक वास्तव्य सादर करीत आहे. पाहुणे इथल्या बहुविध पाककृती प्रस्तुत करणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये केरळच्या स्थानिक मेजवानीसह उत्तर भारतीय, चीनी आणि कॉन्टिनेन्टल खाद्यप्रकारांचा आनंद घेऊ शकतात. मुन्नार टेरेस ग्रीन्समध्ये मनोरंजनात्मक उपक्रमांची रेलचेल आहे, ज्यामध्ये मुलांसाठी प्ले एरिआ, बिलियर्डस्, बॅडमिंटन, कॅरम आणि इतर भरपूर खेळांनी सज्ज असलेले एक क्लब हाऊस, एक व्हिडिओ गेम एरिआ आहे आणि पाहुणे लाइव्ह संगीत ऐकत शेकोटीच्या साक्षीने आपली रात्र घालवू शकतात.

किंमत: रु. 5,399 प्रति रात्रपासून सुरुवात*

ठिकाण: चिन्नाकनाल सूर्यानेल्ली रोड, चिन्नाकनाल, केरळ 685612

Book Your Stay at Munnar Terrace GreensBook Your Stay at Munnar Terrace Greens

कोडाई – बाय द व्हॅली, कोडाईकनाल

Kodai­ByTheValley

कोडाईकनालचे डोंगर हे कोडाई – बाय द व्हॅलीचे घर आहे, एका वेगळ्या संकल्पनेवर आधारलेल्या या रिसॉर्टचा आकार जहाजाप्रमाणे आहे. मात्र रिसॉर्टची वास्तुकला वेगळी आहे जी आसपासच्या परिसरामध्ये बेमालूमपणे मिसळलेली आहे ज्यामुळे पाहुणे निसर्गाशी एकरूप होऊ शकतात. रिसॉर्टमधील खोल्या आणि सूट्स आधुनिक सुविधांनी सजलेले आहेत, ज्यामध्ये फ्लॅट स्क्रीन टीव्ही आणि खोलीमध्येच जेवणाची सेवा उपलब्ध आहे. पाहुणे सायकलवर फेरी मारत किंवा पायी भटकंती करत आसपासच्या समृद्ध निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. कोडाई – बाय द व्हॅलीमधील इतर मनोरंजनात्मक सुविधा आहेत – इनडोअर बोर्ड गेम्सने सज्ज एक क्लब हाऊस व सोबतच बॅडमिंटन, टेनिस आणि क्रिकेटचे मैदानही आहे. खाद्यप्रेमींसाठी बहुविध पाककृतींनी सज्ज रेस्टॉरंट भारतीय, चीनी, तंदूरी आणि कॉन्टिनेन्टल खाद्यपदार्थांचा नजराणा पेश करीत आहे!

किंमत: रु. 4,319 प्रति रात्रपासून सुरुवात*

ठिकाण: पोस्ट बॉक्स नं. 25, पाल्लंगी रोड, अट्टूवमपट्टी, कोडाईकनाल, तामिळनाडू 624101

Book Your Stay at Kodai – By The ValleyBook Your Stay at Kodai – By The Valley

फर्न हिल, उटी

Ooty­FernHill

प्रेक्षणीय निळे निलगिरी डोंगर हे फर्न हिलचे घर आहे, एक सुप्रसिद्ध रिसॉर्ट जे उटीच्या इतिहासामध्ये घेऊन जाते. प्रसन्न वातावरणामध्ये पाहुण्यांचे वास्तव्य अलीकडेच अद्ययावत केलेल्या खोल्यांमध्ये होते ज्या आरामदायक आणि प्रशस्त आहेत. रेस्टॉरंट स्थानिक चवींचा नजराणा पेश करते ज्यामध्ये अवराई उधक, ओट्टाईकुडी उधिक, थुप्पाथीट्टू, एरीगीट्टू, एन्नाट्टू या निलगिरी मधील स्थानिक जमातींच्या खाद्यपदार्थांचा व सोबतच भारतीय, चीनी व कॉन्टिनेन्टल पाककृतींचा समावेश आहे. फर्न हिलमध्ये मनोरंजनाचे विविध उपक्रम देखील आहेत जसे मुलांसाठी प्ले एरिआ, इनडोअर व आउटडोअर खेळांचा समावेश असलेले क्लब, साहसी उपक्रम जसे मंकी क्रॉल, बर्मा ब्रिज आणि वॉल क्लायम्बिंग आणि विकेंडला डिस्कोथेक नाईट्स.

किंमत: रु. 5,309 प्रति रात्रपासून सुरुवात*

ठिकाण: 73, कुंदा हाऊस रोड, फर्न हिल, उटी, तामिळनाडू, 643004

Book Your Stay at Fern HillBook Your Stay at Fern Hill

दार्जिलिंग खुश अलया, दार्जिलिंग

शांतता आणि अध्यात्म अंगावर पांघरलेले दार्जिलिंग खुश अलया हे एक असे रिसॉर्ट आहे जे चहाच्या देशाची शांतता प्रतिबिंबित करते. हे एक आधुनिक रिसॉर्ट आहे ज्याच्या खोल्या आणि सूट्सना डोंगरामध्ये आरामदायक वास्तव्यासाठी सुसज्जित करण्यात आले आहे. सर्व वयाचे पाहुणे जवळच्या मठांमध्ये संस्कृतीचे दर्शन करण्यास जाऊ शकतात किंवा जर पालकांना नगरभ्रमण करायचे असेल तर ते मुलांचा सांभाळ करण्यास पाळणाघराची सेवा घेऊ शकतात. मनोरंजनात्मक सुविधांमध्ये मुलांसाठी प्ले एरिआ, गेम्स आणि व्हिडिओ गेम कंसोलसहित एका क्लब हाऊसचा समावेश आहे. दार्जिलिंग खुश अलयामधील जनरल लॉईड रेस्टॉरंट भारतीय आणि कॉन्टिनेन्टल पाककृतींसोबतच तिबेटी आणि चीनी खाद्यपदार्थही सादर करते.

किंमत: रु. 5,399 प्रति रात्रपासून सुरुवात*

ठिकाण: घूम मॉनेस्ट्री रोड, घूम, दार्जिंलिंग, पश्चिम बंगाल 734102

Book Your Stay at Darjeeling Khush AlayaBook Your Stay at Darjeeling Khush Alaya

लोणावळा अंडर द ओव्हर, लोणावळा

under-the-over-lonavla

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगामध्ये सहलीसाठी उत्कृष्ठ ठिकाण आहे. लोणावळा अंडर द ओव्हर आधुनिक सुविधांनी सुसज्ज खोल्या सादर करीत आहे. रिसॉर्टच्या सुविधा जसे स्विमिंग पूल आणि ट्रॅव्हल डेस्क जे स्थानिक निसर्गभ्रमण फेरीचे आयोजन करू शकते, आसपासच्या डोंगरांवर डे हाईक्स सुद्धा उपलब्ध आहे. लोणावळा अंडर द ओव्हरमध्ये विविध पाककृतींचे रेस्टॉरंट आहे आणि एक हॉलिडे उपक्रम केंद्र आहे जे पाहुण्यांचे वास्तव्य मस्ती आणि गंमतींनी भरलेले असेल याची खात्री देत आहे.

किंमत: रु. 4,319 प्रति रात्रपासून सुरुवात*

ठिकाण: 107, खत्री पार्क, पुणे रोड, मनशक्ती केंद्राजवळ, लोणावळा, महाराष्ट्र 410401

Book Your Stay at Lonavala Under The OverBook Your Stay at Lonavala Under The Over

गोवा क्लब ईस्टाडिया, गोवा

goa-club-estadia-goa

गोवा क्लब ईस्टाडिया स्पॅनिश हॅशिंडा-शैलीच्या वास्तुकलेमध्ये रचलेले आहे. उत्तर गोव्याच्या एका शांत कोपऱ्यात दूर वसलेले तरीही त्या भागातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या सान्निध्यात असलेले हे रिसॉर्ट आधुनिक सुविधांनी सजलेल्या आपल्या प्रशस्त खोल्या आणि सूट्सद्वारे वास्तव्य प्रदान करीत आहे. गोवा क्लब ईस्टाडियामध्ये पूलच्या बाजूला आराम करणे आवडणाऱ्यांसाठी पामच्या झाडांनी झाकलेले स्विमिंग पूल आणि लहान मुलांचे पूल आहे. एकदम ताज्या सीफूडपासून बनवलेल्या लज्जतदार स्थानिक गोवन मेजवानीचा आनंद पाहुणे इथल्या बहुविध पाककृतींच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊ शकतात.

किंमत: रु. 8000 प्रति रात्रपासून सुरुवात*

ठिकाण: पीडीए कॉलनी, अल्टो पोर्व्होरिम, बार्डेझ, गोवा 403521

Book Your Stay at Goa Club EstadiaBook Your Stay at Goa Club Estadia

ट्रीटॉप रिव्हरव्ह्यू, कॉर्बेट                                                                                                                      

treetop-riverview-corbett

बहरदार रामगंगा नदीच्या बाजूला आणि हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले ट्रीपटॉप रिव्हरव्ह्यू हे एक नयनरम्य रिसॉर्ट आहे जे विशाल क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. पाहुण्यांना जंगलाचा अस्सल अनुभव सादर करणारे येथील खोल्या आणि सूट्समधील वास्तव्य अत्याधुनिक आहे. रिसॉर्टच्या सुविधांमध्ये एक स्विमिंग पूल, एक ट्रॅव्हल डेस्क आणि एक बहुविध पाककृतींचे रेस्टॉरंट आहे जे दुर्मिळ शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ व सोबतच संध्याकाळचा बारबेक्यू सुद्धा सादर करीत आहे. जंगलभ्रमणाचा आनंद घेण्यासाठी ट्रीटॉप रिव्हरव्ह्यू जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारीची व्यवस्था करू शकते आणि इथल्या इन-रिसार्ट आकर्षणांमध्ये बोनफायर नाईट्स, निवडक इनडोअर आणि आउटडोअर खेळ आणि एक ट्रेंडी पूलसाईड लाऊंजचा समावेश आहे.

किंमत: रु. 4,499 प्रति रात्रपासून सुरुवात*

ठिकाण: जीम कॉर्बेट नॅशनल पार्क, शंकर, मर्चुला, उत्तराखंड 244715

Book Your Stay at Treetop RiverviewBook Your Stay at Treetop Riverview

मसुरी डान्सिंग लिव्हज्, मसुरी

डून व्हॅलीचे विलोभनीय दृश्य बघत, गढवाल हिमालयामधील मसुरी येथील डोंगरावर मसुरी डान्सिंग लिव्हज् वसलेले आहे. प्रशस्त आणि सुनियोजित खोल्या आणि सूट्स ज्यात प्रत्येकामध्ये संलग्न बाल्कनी आहे, ज्यामधून पाहुणे आपल्या आसपासच्या निसर्गसौंदर्यामध्ये हरखून जाऊ शकतात. रिसॉर्टमध्ये प्रौढ आणि मुलांसाठी बरेच उपक्रम आहेत ज्यामध्ये मुलांसाठीचा एक प्ले एरिआ, इनडोअर खेळांसोबत एक क्लब रूम, एक इन-हाउस लायब्ररी आणि विकेंडला बहारदार संगीताच्या साक्षीने बार्बेक्यू आणि बोनफायर नाईट्सचा समावेश आहे. वूडस्टॉक रेस्टॉरंट बहुविध पाककृतींची लज्जत सादर करते जेथे विनंतीनुसार जैन भोजन सुद्धा उपलब्ध आहे.

किंमत: रु. 4,949 प्रति रात्रपासून सुरुवात*

ठिकाण: राधा भवन इस्टेट, सर्क्युलर रोड, मसुरी, उत्तराखंड 248179

Book Your Stay at Mussoorie Dancing LeavesBook Your Stay at Mussoorie Dancing Leaves

2016च्या शेवटी स्टर्लिंग हॉलिडेज रिसॉर्टमध्ये सुट्टी साजरी करा जेथे सरत्या वर्षाची विशेष व भव्य आठवण मनात जपून ठेवा!

वर उल्लेखित किंमती अंदाजे मूल्य आहे आणि त्या बदलाच्या अधीन आहे.