भारतातील सर्वांत लोकप्रिय 5 जैन मंदिरे

MakeMyTrip Blog

Last updated: Jul 19, 2017

Author Recommends

See

Khajuraho: Temple Complex
Gujarat: The Gir Forest, Somnath Temple and Watson Museum

Do

Rajasthan: Desert safari on camel back in Jaisalmer Karnataka: Relax at the beaches of Gokarna

Eat

Rajasthan: Laal Maas, Ker Sangri and Daal Baati Choorma
Gujarat: Dhokla, Thepla and Aamras

Shop

Madhya Pradesh: Folk paintings, silver jewellery and beaded purses
Karnataka: Silk sarees and sandalwood handicraft items

Events

Madhya Pradesh: The Khajuraho Dance Festival that takes place in February every year
Rajasthan: The colourful Pushkar Camel Fair that takes place in November annually

Want To Go ? 
   

जैन धर्मामध्ये महावीर जयंती हा सर्वात महत्त्वाचा सण आहे, ज्यामध्ये भगवान महावीर यांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. शेवटचे तीर्थंकर किंवा आध्यात्मिक गुरु महावीर यांनी जैन धर्माला पुनर्जीवन प्रदान केले. 2016मध्ये महावीर जयंती 20 एप्रिलला येत आहे व भाविकांद्वारे हा उत्सव आपल्या घरी आणि मंदिरांमध्ये समारंभपूर्वक अभिषेक, ध्यानधारणा, प्रार्थना आणि प्रसाद चढवून मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल. भारत व जगभरात असंख्य जैन मंदिरे आहेत. येथे आम्ही भारतातील सर्वांत प्रसिद्ध अशा 5 मंदिरांची यादी देत आहोत.

#1. दिलवारा मंदिर: अरवली पर्वतरांगा, राजस्थान

jain temple rajasthan

भव्यपणे कोरलेल्या दिलवारा मंदिरांची बांधणी 12व्या शतकात करण्यात आली असे समजले जाते. संगमरवरी दगडामध्ये सूक्ष्म व विलक्षण कोरीवकाम केलेले हे मंदिर अद्यापही बऱ्यापैकी जतन करण्यात आले आहे. राजस्थानच्या अरवली पर्वतरांगांमध्ये स्थित असलेले पाचपैकी प्रत्येक मंदिर वेगवेगळ्या तीर्थंकरांच्या सन्मानार्थ बांधण्यात आले आहे आणि त्यामध्ये जैन साधूंच्या प्रतिमा, सुंदररित्या सजवलेले स्तंभ आणि एक हॉल आहे, ज्यात जैन तीर्थंकरांच्या 360 लहान मूर्त्या आहेत. बरेच लोक या मंदिर परिसराला जगातील जैन मंदिरांपैकी सर्वांत सुंदर असल्याचे मानतात. 

#2. खजुराहो मंदिरे: खजुराहो, मध्य प्रदेश

jain temple rajasthan

हे जागतिक वारसा स्थळ आपल्या उत्तेजक पुतळ्यांमुळे जगप्रसिद्ध आहे, ज्यांनी इथल्या बऱ्याच मंदिरांना सुशोभित केलेले आहे. मात्र, येथे बरीच जैन मंदिरे सुद्धा आहेत ज्यांना हजारो वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. जैन मंदिरे शहराच्या पूर्वेकडील भागात आहेत आणि मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. खजुराहो जरी एक लहानसे शहर असले तरीसुद्धा येथे वेगवेगळ्या मंदिरांची बरीच ठिकाणे आहे आणि सर्वांनाच व्यवस्थितरित्या जतन करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांना योग्यप्रकारे बघण्याकरिता काही दिवस तरी द्यावेच लागतील. 

#3. पालीताना मंदिरे: शत्रुंजय डोंगर, गुजरात

सर्वांत पवित्र जैन मंदिर परिसरांपैकी एक असलेल्या व गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील शत्रुंजय डोंगरावर वसलेल्या पालीताना येथे 3,000 पेक्षाही जास्त सूक्ष्म कोरीवकाम केलेली मंदिरे आहेत. 11व्या शतकापासून पिढ्यानपिढ्या उभारण्यात आलेले हे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. येथील 3,800 पेक्षाही जास्त दगडी पायऱ्या चढणे सोपी गोष्ट नाही, मात्र दरवर्षी हजारो भाविकांना येथे दर्शन घेण्यापासून ही बाधा थांबवू शकत नाही.

#4. गोमटेश्वर मंदिर: कर्नाटक

कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथे वसलेल्या या जैन मंदिरामध्ये प्रथम तीर्थंकर गोमटेश्वराची 18 मीटर उंचीची काळ्या ग्रॅनाइटची प्रचंड मूर्ती आहे. प्रत्येक 12व्या वर्षी भाविक महामस्तकाभिषेक या महत्त्वाच्या जैन उत्सवाकरिता या पर्वतावर प्रचंड संख्येने एकत्र येतात. यावेळी मूर्तीला स्नान घातले जाते आणि दूध, केसराचा लेप व हळद, चंदन व कुंकूने अभिषेक केला जातो.

#5. रणकपूर मंदिर: अरवली पर्वतरांगा, राजस्थान

हे भव्य रणकपूर मंदिर 14 व 15 व्या शतकात अरवली पर्वतरांगांमध्ये बांधण्यात आले होते. हे मंदिर डोंगरांमधून तीन पातळ्यांवर उभारण्यात आले आहे व याला 1,444 पेक्षाही जास्त कलाकुसरीच्या स्तंभांद्वारे आधार देण्यात आला आहे. या सुंदर मंदिराची सर्वच सूक्ष्म कलाकुसर अद्वितीय आहे, ज्यामध्ये एक संगमरवरी दगड सुद्धा आहे ज्यावर सापाची 108 डोके आणि गुंतागुंतीच्या शेपट्या कोरण्यात आल्या आहे. भक्ती आणि कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण समजल्या जाणाऱ्या या मंदिराला जवळच्याच उदयपूरवरून भेट देण्यास अवश्य जावे.

jain temple rajasthan

भारताच्या सर्वांत लोकप्रिय अशा या सुंदर 5 जैन मंदिरांना भेट द्या. आम्ही संपूर्ण भारतात विमान, ट्रेन आणि बसद्वारे सोयिस्कररित्या प्रवास करण्याची सुविधा प्रदान करतो, ज्यामध्ये राजस्थान, गुजरात, कर्नाटक व मध्य प्रदेशचाही समावेश होतो.

More Travel Inspiration For Khajuraho