आपण प्रवास का करता? आपल्या यादीमधील ठिकाणे बघण्यासाठी, रोजच्या वेळापत्रकामधून विश्रांती घेण्यासाठी, नवीन लोकांना भेटण्यासाठी किंवा नवीन पदार्थांची चव चाखण्यासाठी? या सर्व कारणांसहित काहीवेळा त्या ठिकाणाचा सांस्कृतिक वारसा असतो जो आपल्याला तेथे आकर्षित करतो. आपल्या रंगीत विविधतेसोबत भारत अशा आकर्षणांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे आम्ही येथे भारतातील 10 लोकप्रिय सांस्कृतिक ठिकाणांची यादी देत आहोत.
या शहराचे खरे रूप बघण्याकरिता अहमदाबादच्या हेरिटेड नाईट वॉककरिता जा, जेथे आपल्याला विविध हवेल्या आणि स्मारके बघायला मिळतील आणि आपल्या भ्रमंतीची अखेर मानेक चौकात स्थानिक पाककृतींची लज्जत चाखण्यात होईल. कॅलिको म्युझियममध्ये भारताच्या उत्कृष्ट कपड्यांची झलक बघा. शहरापासून सुमारे 100 किमी अंतरावर पुष्पावती नदीच्या काठी मोढेरा येथे इ.स. 1026 मधील प्राचीन सूर्यमंदिर आहे. मंदिराची वास्तुकला आश्चर्यकारक आहे. तसेच आपण पायऱ्यांची प्राचीन विहिर बघण्यासाठी पाटण (108 किमी दूर) येथेही जाऊ शकता. येथे परंपरागत पटोला साडी घेण्यास विसरू नका.
Book Your Flight to Ahmedabad Here!
मंदिरे शहराच्या सांस्कृतिक वारश्याचा आरसा असतात आणि या बाबतीत तमिळनाडू निश्चितच भारतातील 10 लोकप्रिय सांस्कृतिक ठिकाणांपैकी एक आहे. तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराला भेट द्या व सोबतच तंजावर मराठा पॅलेसला अवश्य भेट द्या. तंजोर चित्र खरेदी करा, चित्रकलेची ही शैली वेगाने नष्ट होत आहे. तिरुचिरापल्लीमध्ये 17व्या शतकातल्या दगडी किल्ल्याला भेट द्या, जो शहराच्या क्षितीजावर दिमाखाने उभा आहे आणि यामध्ये दोन दगडातून कोरलेल्या मंदिरांचाही समावेश आहे. आणि अखेरीस मदुराईमध्ये मिनाक्षी अम्मन मंदिर परिसरातील गंगनचुंबी गोपुरममध्ये (गेटवे टॉवर्स) विस्मयचकित होऊन उभे राहा.
Book Your Flight to Madurai Here!
आपल्या प्रभावोत्पादक मंदिरांकरिता प्रसिद्ध असलेले आणखी एक ठिकाण म्हणजे ओडिशा, त्यांच्यापैकी भुवनेश्वरमध्येच 700 पेक्षा जास्त मंदिरे आहेत! 11व्या शतकातल्या लिंगराज मंदिराचा परिसर, उत्कृष्ट कोरीव कमानीचा दरवाजा असलेले 10व्या शतकातले मुक्तेश्वर मंदिर आणि देवच नसलेले अनोखे राजाराणी मंदिर हे त्यापैकीच काही आहे. त्यानंतर पुरीमध्ये समुद्राच्या बाजूला जगन्नाथाचे मंदिर आहे, इथल्या रथ यात्रेला भेट देणे अगत्याचेच आहे. ओडिशामधील सर्व मंदिरांपैकी सर्वात कौशल्याचे कोरीव काम केलेले मंदिर म्हणजे कोनार्कमधील सूर्य मंदिर (पुरीपासून 35 किमी अंतरावर). भव्य रथाचा आकार असलेल्या या युनेस्को जागतिक वारसा स्थळाचे आज अवशेषच उरलेले आहेत मात्र जे काही शिल्लक आहे त्यावरून आपले पूर्वज वास्तुकलेमध्ये किती पुढारलेले होते याचे आदरयुक्त स्मरण होते.
Book Your Flight to Bhubaneshwar Here!
भोपाळच्या जुन्या भागातील गजबजलेले बाजार आणि सुंदर मशिदी मुघलांच्या काळाची आठवण करून देतात. त्यांनी आपला वारसा ताज-उल-मस्जिदच्या स्वरुपात मागे ठेवला आहे, ही आशियातील सर्वात मोठी मशीद आहे. मशिदीची दर्शनी गुलाबी भिंत आणि संगमरवरी घुमटाच्या मिनारामुळे इमारत खूपच सुंदर दिसते. दुसरी प्रमुख मशीद आहे मोती मस्जिद, जी वास्तुकलेनुसार दिल्लीच्या जामा मशिदीसारखी आहे. शहरापासून 40 किमीचा प्रवास केल्यानंतर भिमबेटका या ठिकाणी भेट देता येते – हे पुरातत्व स्थळ आहे ज्यामध्ये प्राचीन दगडी निवारे आणि चित्रांचा समावेश आहे.
Book Your Flight to Bhopal Here!
देवांचा स्वत:चा देश म्हटले जाणारे केरळ नयनरम्य सुंदरतेने नटलेले आहे – मग ते बॅकवॉटर्स असो किंवा नितळ समुद्रकिनारे असो. मात्र, केरळचे माझे आवडते ठिकाण आहे फोर्ट कोची. एर्नाकुलमवरून फेरी घ्या (फक्त रु. 3, एका बाजूचे) आणि पोर्तुगीज शैलीच्या एकांतप्रिय नगराकडे प्रयाण करा. ओळीने चीनी मासेमारी जाळे लावलेल्या समुद्रकिनाऱ्यावरून फेरफटका मारा, जर आपण विनम्रतेने विचारले तर कोळीबांधव आपल्याला त्यांच्या बोटीवर सुद्धा घेतील आणि आपण त्यांना मासे पकडण्यास ‘मदत’ सुद्धा करू शकाल. इथल्या विलक्षण ज्यू भागाला भेट द्या जेथे सिनगॉग दिमाखात उभे आहे, त्याच्या सभोवताली असलेल्या बाजारात प्राचीन वस्तूंपासून तर मसाल्यापर्यंत सर्व काही विकले जाते. संध्याकाळी कथकली आणि कलरीपयट्टूचा कलाविष्कार बघण्याकरिता ग्रीनिक्स गावाला अवश्य भेट द्या.
Book Your Flight to Cochin Here!
राजवाड्यांच्या या शहराजवळ अभिमानाने दाखवण्याकरिता दोन आकर्षणे आहेत – एक म्हणजे भव्यदिव्य म्हैसूरचा राजवाडा, ज्यामध्ये एक विलक्षण संग्रहालय आहे आणि रात्री या राजवाड्याला हजारो दिव्यांनी सजवले जाते, हे दृश्य खूपच नयनमनोहर असते. दुसरे आकर्षण आहे जगनमोहन राजवाडा ज्याला आता कला दालनामध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. या शहरात आणखी 5 राजवाडे व सोबतच बरेच तलाव, बगिचे आणि मंदिर आहेत. रंगनाथस्वामी मंदिर आणि टिपू सुलतानचा उन्हाळी राजवाडा बघण्याकरिता श्रीरंगपटनाची (55 किमी अंतरावर) एक दिवसाची सहल म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव आहे.
जर असे एखादे भारतीय शहर असेल ज्याला ग्रँड डेम म्हणता येईल तर ते कोलकाता आहे. कोलकाताच्या भूतकाळामध्ये डोकावून बघण्याकरिता व्हिक्टोरिया मेमोरियल, सेंट पॉल यांचा भव्य कॅथेड्रल आणि ग्रीक-रोमन शैलीतील रायटर्स बिल्डिंगला भेट द्या. चंदन नगर येथील जुन्या फ्रेंच वसाहतीमध्ये (30 किमी अंतरावरील) बऱ्याच सुंदर इमारती, स्मारके आणि नदीकाठी असलेला स्ट्रँड आहे. नोबेल पारितोषिक विजेते टागोरांचे शांतिनिकेतन 180 किमी दूर आहे आणि इतिहास प्रेमींसाठी एक दिवसाची चिरस्मरणीय सहल होऊ शकते.
Book Your Flight to Kolkata Here!
जयपूर हे गुलाबी शहर प्रेक्षणीय राजवाडे, हवेल्या आणि स्मारकांनी गजबजलेले आहे. शहरापासून 11 किमी अंतरावरचा आमेर (अंबर) किल्ला या शहराचे सर्वात मोठे आकर्षण आहे ज्यामध्ये अत्यंत सुशोभित दरवाजे, सूक्ष्म जाळींचे कोरीव काम आणि मनमोहक शीश महालाचा समावेश आहे. शहरामध्ये पायी भटकंती करा आणि हवा महाल, सिटी पॅलेस आणि विविध बाजारांना भेट द्या. हे शहर त्याच्या ब्लॉक प्रिंटिंग उद्योगाकरिता आणि रंगीत बांधनी कामाकरिता प्रसिद्ध आहे आणि इथल्या उबदार जयपूरी दुलईला आपण विसरूच शकत नाही.
Book Your Flight to Jaipur Here!
लेक पिचोलामध्ये बोट राईड घेऊन आपण उदयपूर या तलावांच्या शहराचे रोमँटिक दर्शन करू शकता. तलावाच्या केंद्रभागी असलेल्या जग मंदिरासहित सिटी पॅलेस परिसराने या अनुभवाला झळाळी प्राप्त होते. गणगौर घाटावरच्या बागोर की हवेलीला भेट द्या, हा एक विशाल राजवाडा आहे ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त खोल्या, बरेच कोर्टयार्ड आणि वैभवशाली भित्तीचित्रे आहेत. येथे प्रत्येक संध्याकाळी लोकनृत्यांचे प्रदर्शन केले जाते. उदयपूरवरून आपण माउंट अबूची एक दिवसाची सहल करू शकता, जेथे आपण दिलवारा मंदिरावरची सूक्ष्म कलाकुसरीची संगमरवरी शिल्पे बघू शकता.
Book Your Flight to Udaipur Here!
वाराणसी हे प्राचीन शहर असंख्य मंदिरे, नदीकाठचे घाट, रंगीत बाजार आणि भगवी वस्त्रे परिधान केलेल्या साधूंचे पवित्र शहर आहे. गंगेच्या विस्तीर्ण पात्रामध्ये बोट राईड घ्या, जुन्या शहराच्या अरूंद गल्ल्यांमध्ये भटकंती करा आणि प्रत्येक गल्लीबोळात असलेल्या हलवायांकडे स्थानिक लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या. संध्याकाळी गंगा आरतीमध्ये सहभागी व्हा आणि सुमधूर नाद करणाऱ्या घंटा, मंत्रोच्चार, अग्नी आणि धूपारतीच्या सुगंधाचा मनमोहक आनंद घ्या. वाराणसीला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे 5-दिवसीय शास्त्रीय संगीत व नृत्याचा गंगा महोत्सव व तसेच दिवाळीमध्ये जेव्हा घाटांवर हजारो दिव्यांची रोषणाई केली जाते.
Book Your Flight to Varanasi Here!
तर 2014मध्ये आपल्या संस्कृतीशी आपली भेट सुनिश्चित करा. आमच्या पॅकेजद्वारे आपल्या सहलीची योजना बनवा आणि आजच आपली तिकीटे बुक करा!
Chase Thrilling Adventure Activities on Yas Island in Abu Dhabi
Surangama Banerjee | Feb 27, 2025
Experience an Arabian Beach Vacay in Abu Dhabi
Surangama Banerjee | Feb 27, 2025
Dive into Saudi’s Ultimate Celebration—Riyadh Season!
Surangama Banerjee | Feb 11, 2025
Eat, Shop & Save—Singapore’s Got it All!
Surangama Banerjee | Feb 10, 2025
Unlock Saudi’s Secrets, One Experience at a Time!
Surangama Banerjee | Jan 29, 2025
Experience Riyadh Season—an Urban Carnival in Saudi!
Surangama Banerjee | Jan 29, 2025
Fan of Adventure? Sign-up for Adrenaline-Packed Activities in Australia!
Surangama Banerjee | Jan 29, 2025
From Souks to Malls: Uncover the A to Z of Shopping Experiences in Saudi!
Anisha Gupta | Jan 28, 2025