2017मध्ये भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सादर करणाऱ्या देशांची यादी

MakeMyTrip Blog

Last updated: Sep 24, 2019

Author Recommends

Do

Cambodia: Angkor Wat is a must visit
Jordan: Floating in the Dead Sea

See

Indonesia: Explore the island of Bali
Kenya: Experience the wildlife safari is Masai Mara
Macau: Visit casinos in Macau

Click

Indonesia: Click some selfies in Bali
Maldives: Click your picture while enjoying snorkelling

Filmy

Mauritius: "No Entry", "Main Anari Tu Khiladi"
Nepal: "Gharwali Baharwali", "Baby"

Eat

Seychelles: Coconut curry, Saffron rice
Sri Lanka: Rice and Prawns
Thailand: Red Thai Curry, Green Thai Curry
Turkey: Brasied Turkey Legs, Chipotle Turkey Salad

Want To Go ? 
   

जर आपण भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल (आगमन झाल्यावर व्हिसा) देणाऱ्या देशांची यादी शोधत असाल तर आता इतरत्र कुठेच बघायची गरज नाही! एक काळ होता जेव्हा विदेशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे आधी व्हिसासाठी अर्ज सादर करण्याची झंझट मागे लागायची. त्या लांबच लांब रांगा, कधीच न संपणारे दस्तऐवज, जिज्ञासू प्रश्न आणि मग त्या बहुप्रतिक्षित कागदाची दीर्घकाळ वाट बघणे, म्हणजेच व्हिसा, प्रवासाकरिता आपले लायसन्स. हुश्श! मात्र आपण अजुनही यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे प्लॅनिंग केलेले नाही, असो काहीच हरकत नाही!

भारतीय पासपोर्ट धारकांना आता बरेच देश व्हिसा ऑन अरायव्हल (व्हिओए) सादर करीत आहेत, त्यामुळे विदेशात प्रवास करणे आता दडपण आणणारा अनुभव राहिलेला नाही. त्यामुळे आपल्या बॅगा भरा आणि भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सादर करणाऱ्या खालीलपैकी कुठल्याही देशाला आपल्या कुटुंब आणि मित्रांसमवेत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भेट द्या.

आशिया

आफ्रिका

दक्षिण अमेरिका

उत्तर अमेरिका

ओशनिया

युरोप

थायलंड

मॉरिशस

इक्वाडोर

ब्रिटिश व्हर्जिन बेटे

कूक द्वीपे

सर्व युरोपियन देशांकरिता आधीच मंजूर झालेला व्हिसा आवश्यक आहे.

भूटान

सेशेल्स

डोमिनिका

हैती

एल साल्वाडोर

 

कंबोडिया

टोगो

बोलिव्हिया

सेंट लुसिया

फिजी

 

मालदीव

केनिया

गयाना

जमैका

मायक्रोनेसिया

 

मकाऊ

टांझानिया

 

सेंट किट्स आणि नेविस

वानुआटु

 

इंडोनेशिया

इथिओपिया

 

सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनाडाइन्स

सामोआ

 

इराक

मादागास्कर

 

ग्रेनेडा

टुवालू

 

नेपाळ

मोझांबिक

 

त्रिनिदाद आणि टोबॅगो

निए

 

लाओस

युगांडा

 

मॉन्टसेराट

पलाऊ

 

जॉर्डन

गिनी-बिसाऊ

 

निकारागुआ

 

 

तिमोर लेस्टे

केप व्हर्दे

 

टर्क्स आणि कैकोस

 

 

 

कोमोरोस बेटे

 

 

 

 

 
 
 

कृपया लक्षात घ्या: प्रत्येक देशाच्या व्हिसा आवश्यकता बदलत असतात. हा लेख प्रकाशित करतेवेळी, वर उल्लेखित देश भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल प्रदान करीत होते.

विदेशातील ठिकाणांची लोकप्रियता लक्षात घेता, तेथे प्रवास करणे आपल्याला वाटते तितके कठीण नाही. खाली काही अवश्य भेट देण्यासारख्या विदेशी ठिकाणांची यादी दिलेली आहे. या व्हिसा ऑन अरायव्हल सादर करणाऱ्या देशांचा विचार आपल्या उन्हाळी ट्रीपसाठी आपण नक्कीच करू शकता.

कंबोडिया

visa-on-arrival-for-indians-cambodia

20 डॉलरचे शुल्क भरून 30 दिवसांच्या वास्तव्यासाठी भारतीय पर्यटक कंबोडियाचा व्हिसा ऑन अरायव्हल घेऊ शकतात. आपल्याजवळ पासपोर्टचा फोटो, कंबोडियामधले आपले वास्तव्य पूर्ण करण्याकरिता पुरेसा निधी व पूर्ण भरलेला व्हिसा अर्ज आणि कन्फर्म झालेली विमान तिकीटे हे प्रवासाचे दस्तऐवज असले पाहिजे. आगमनाच्या तारखेपासून कमीत कमी 6 महिनेपर्यंत आपला पासपोर्ट वैध असेल याची खात्री करावी.

टीप: आपण इतिहासप्रेमी असाल किंवा नसाल, अंगकोर वटला भेट देणे अगत्याचेच आहे. या प्रचंड मंदिरामध्ये शिव, विष्णू आणि इतर हिंदू देव-देवतांच्या मूर्त्यांचे क्लिष्ट कोरीवकाम यामुळे बघणारा विस्मयचकित राहतो. कंबोडियाचे पर्यावरण हे अतिशय वेगळे आहे आणि सर्व वन्यजीवप्रेमींनी तेथे अवश्य भेट द्यायला हवी. कंबोडिया हे एक लोकप्रिय उन्हाळी पर्यटन स्थळ आहे ज्याला भेट देणे हे प्रत्येक पर्यटनप्रेमीच्या पर्यटन आकांक्षेचा एक भाग असतोच!

Book Your Flight to Cambodia Here!

इंडोनेशिया

visa-on-arrival-for-indians-bali

भारतीय पर्यटकांना 25 डॉलरचे शुल्क भरून जास्तीत जास्त 30 दिवसांच्या वास्तव्यासाठी इंडोनेशियाचा व्हिसा ऑन अरायव्हल मिळू शकतो! इंडोनेशियामधील आपल्या वास्तव्यासाठी पुरेसा निधी असल्याचा पुरावा आपल्याला दाखवावा लागेल व सोबतच परतीची किंवा पुढील प्रवासाची कन्फर्म तिकीटे आपल्याजवळ आहेत हे सुद्धा दाखवावे लागेल. इंडोनेशियामध्ये आगमनाच्या तारखेपासून कमीत कमी 6 महिनेपर्यंत आपला पासपोर्ट वैध असेल याची खात्री करावी.

टीप: सांस्कृतिक केंद्र उबुडला भेट द्या आणि माउंट बाटुर पाहा, जो एक सक्रिय ज्वालामुखी आहे. पांढऱ्या वाळूवर सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या जो अस्मानी पाण्यामध्ये विरघळून जातो व आपल्याला जीवनभर स्मरणात राहिल अशा सुंदर आठवणींचा आणि मोहक अनुभवांचा खजिना देऊन जातो.

Book Your Flight to Indonesia Here!

जॉर्डन

visa-on-arrival-for-indians-jordan

जॉर्डनमध्ये येणाऱ्या भारतीयांना जवळपास 30 डॉलर शुल्क भरून 2 आठवड्यांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल मिळू शकतो. आपल्या वास्तव्यासाठी त्यांच्याजवळ कमीत कमी 1000 डॉलर (किंवा समतुल्य) असावे आणि पुढील गंतव्याकरिता परतीची किंवा पुढील प्रवासाची तिकीटे असावीत. लाल समुद्रावरील अकाबामधून जॉर्डनमध्ये प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या भारतीयांना 1 महिन्याचा व्हिसा मोफत दिला जातो.

टीप: मृत समुद्रामध्ये तरंगणे हा निश्चितच जॉर्डनमधील सर्वात विलक्षण अनुभवांपैकी एक आहे जो टाळता येत नाही. इतरत्र कुठे आपण लाईफ जॅकेटशिवाय तरंगू शकता जेथे मिठाचे अत्याधिक प्रमाण आपल्याला तरंगत ठेवेल? किंवा आपण पेट्रा येथे भेट देऊ शकता, जे वाळूच्या खडकामध्ये कोरलेले प्राचीन शहर आहे व आता जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. 

Book Your Flight to Jordan Here!

मकाऊ

visa-on-arrival-for-indians-macau

मकाऊला भेट देणाऱ्या भारतीयांना जास्तीत जास्त 30 दिवसांच्या वास्तव्यासाठी नि:शुल्क व्हिसा ऑन अरायव्हल मिळू शकतो. आपल्या वास्तव्यासाठी पुरेसा निधी (60 डॉलर) असल्याचा पुरावा आपल्याला दाखवावा लागेल व सोबतच परतीची किंवा पुढील प्रवासाची कन्फर्म तिकीटे आपल्याजवळ आहेत हे सुद्धा दाखवावे लागेल.

टीप: आशियाचे व्हेगास समजले जाणारे मकाऊ आपल्या असंख्य कॅसिनो आणि जुगार केंद्रांसाठी ओळखले जाते. ड्युटी-फ्री शॉपिंगकरिता लोकप्रिय ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले मकाऊ खरेदीप्रेमींची मक्का आहे.

Book Your Flight to Macau Here!

मालदीव

visa-on-arrival-for-indians-maldives

भारतीयांना जास्तीत जास्त 90 दिवसांच्या वास्तव्यासाठी नि:शुल्क व्हिसा ऑन अरायव्हल मिळू शकतो. त्यांना आपल्या पुढील प्रवासाचे दस्तऐवज जसे परतीचे किंवा पुढील प्रवासाचे तिकीट दाखवावे लागेल. हॉटेलचे रिझर्व्हेशन नसलेल्या प्रवाशांना आपल्या वास्तव्यासाठी प्रति दिन प्रति व्यक्ती कमीत कमी 30 डॉलर त्यांच्याजवळ असल्याचे दाखवावे लागेल.

टीप: मालदीव जगातल्या सर्वोत्तम डायव्हिंग आणि स्नोरकेलिंग अनुभवाने संपन्न आहे आणि प्रवाळ रीफच्या विविधरंगी वसाहतींनी भरलेल्या विलक्षण अंडरवॉटर जीवनाचा अनुभव घेण्याचा हा उत्कृष्ट मार्ग आहे. येथील नितळ समुद्रकिनारे आपल्याला आकर्षित करतात आणि आपल्या चिंता मागे सारून मालदीवचा लोकप्रिय पर्यटन ठिकाणाच्या स्वरूपात आनंद घेण्यासाठी आपल्याला प्रेरित करतात. 

Book Your Flight to Madives Here!

मॉरिशस

visa-on-arrival-for-indians-mauritius

भारतीय जास्तीत जास्त 60 दिवसांच्या वास्तव्यासाठी व्हिसा ऑन अरायव्हल घेऊ शकतात मात्र त्यासाठी मॉरिशसमध्ये वास्तव्याचे कन्फर्म बुकिंग, प्रायोजकतेचे पत्र, परतीच्या विमान प्रवासाचे कन्फर्म बुकिंग आणि आपल्या वास्तव्यादरम्यान खर्चासाठी पुरेसा निधी (प्रति दिन कमीत कमी 100 डॉलर) असणे आवश्यक आहे.

टीप: मॉरिशसमध्ये चामरेल येथे भेट द्या, हे छोटेसे खेडे आपल्या सात रंगाच्या वाळूच्या थरांकरिता प्रसिद्ध आहे. मॉरिशस संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सामिल आहे, तरीसुद्धा येथे आपल्या कधीच गर्दी जाणवणार नाही. पर्यटकाच्या आवडीनुसार, मॉरिशस शांत किंवा धमाल असू शकते!

Book Your Flight to Mauritius Here!

नेपाळ

visa-on-arrival-for-indians-nepal

भारतीयांना जास्तीत जास्त 150 दिवसांच्या वास्तव्यासाठी एक सिंगल एंट्री व्हिसा ऑन अरायव्हल दिला जातो. आपल्याला फक्त राष्ट्रीयतेचे प्रमाणपत्र जसे फोटोसहित पासपोर्ट, वाहन परवाना किंवा रेशन कार्डची प्रत सोबत ठेवणे गरजेचे असते.

टीप: पर्वतरोहींकरिता मक्का असलेले नेपाळ समृद्ध वास्तुकलेचा वारसा आणि जगातील सर्वात छान लोकांचे वास्तव्य लाभलेले ठिकाण आहे. नेपाळ हे खरेदीदारांकरिता स्वर्ग आहे आणि भारताला लागूनच असल्याने विदेशात भेट देण्याकरिता आपण त्याचा प्रथम विचार करायला हवा. लुंबिनी येथे भेट देण्यास विसरू नका, है भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान आहे.

Book Your Flight to Nepal Here!

सेशेल्स

visa-on-arrival-for-indians-seychelles

भारतीयांना जास्तीत जास्त 30 दिवसांच्या वास्तव्यासाठी सेशेल्समध्ये व्हिसा ऑन अरायव्हल मिळू शकतो. व्हिसा मिळवण्यासाठी त्यांच्याजवळ पुढील प्रवासाची किंवा परतीची तिकीटे आणि प्रति दिन प्रति व्यक्ती 150 डॉलरची रक्कम व सोबत वास्तव्याचा दाखला असणे आवश्यक आहे.

टीप: सेशेल्स हा हिंदी महासागरामधला 115 बेटांचा द्वीपसमूह आहे आणि इथल्या अस्पर्श समुद्रकिनारे, नितळ अस्मानी पाणी आणि हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणामुळे नवपरिणित जोडप्यांकरिता लोकप्रिय ठिकाण आहे.

Book Your Flight to Seychelles Here!

थायलंड

visa-on-arrival-for-indians-thailand

इतर विदेशी नागरिकांच्या उलट भारतीयांना थायलंडमध्ये फक्त 35 डॉलरमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो! लक्षात असू द्या की आपले वास्तव्य 15-30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. सोबतच, भारतीयांनी पुढील किंवा परतीच्या प्रवासाची तिकीटे व कमीत कमी प्रति व्यक्ती 10,000 बाह्त (थाई चलन) सोबत ठेवणे आवश्यक आहे.

टीप: थायलंड आपल्या चमकदार मंदिरे किंवा वटकरीता प्रसिद्ध आहे, त्यामुळे आपल्या सहलीमध्ये यापैकी कमीत कमी एकाचा तरी समावेश करण्यास विसरू नका.

Book Your Flight to Thailand Here!

सोबतच आणखी इतर काही...

भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सादर करणाऱ्या इतर देशांमध्ये सेनेगल, उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक, दक्षिण ओसेशिया, स्वालबार्ड, ट्रान्सनिस्ट्रिआ, रियुनियन, किश आयलँड, पॅलेस्टाईन आणि जेजू आयलँड यांचा समावेश होतो.

तर मग आपण कशाची वाट बघताय? आपल्या बॅग भरा आणि बाहेर पडा!

More Travel Inspiration For Bangkok