भारतातील 5 सर्वोत्तम लक्झरी बीच रिसोर्ट्स

Chandana Banerjee

Last updated: Jun 15, 2017

Want To Go ? 
   

गोवा फिरून झाले आहे आणि आता वेगळ्याच प्रकारच्या बीच हॉलिडेजच्या शोधात आहात का? तर हे पाच बीच रिसोर्ट्स जे बाकीच्या सामान्य बीच रिसोर्ट्सपेक्षा हटके आहेत त्यांचा विचार करा. हे रिसोर्ट्स हिवाळ्यासाठी उत्तम असून ते सूर्यप्रकाशाने उजळलेले समुद्रकिनारे, निळेशार महासागर आणि आरामासह साहसाची हमी देतात.

 

नीमराणाचे दी बंगलो ऑन द बीच, ट्रान्क्यूबार

वैशिष्ट्य: ऐतिहासिक वारसा लाभलेला सुविधांनी सुसज्ज बीच

ही प्रॉपर्टी समुद्रकिनारी असून ते एक ऐतिहासिक रत्न आहे, जे मधुचंद्रासाठी येणारी जोडपी साहसिकांमध्ये सारख्याच प्रमाणात लोकप्रिय आहे. या ठिकाणी पारंपारिक नागपट्टीनम शैलीच्या आठ प्रशस्त हवेशीर खोल्या आहेत ज्यांची नावे डॅनिश जहाजांवरून ठेवली आहेत, जी जगाच्या या भागात नांगरली जायची त्यांच्यावरून. व्हिंटेज फर्नीचर आणि सुंदर वस्तूंनी सजवलेल्या या खोल्या प्रवाशांना आराम आणि इतिहासाचा एकत्रितपणे अनुभव देत ट्रान्क्यूबारच्या कहाणीचा एक भाग सांगतात. इथे राहणारे पाहुणे प्रॉपर्टीजवळ असलेल्या अनेक ऐतिहासिक ठिकाणी सहलीला जाऊ शकतात किंवा गार्डन स्विमिंग पूल वापरू शकतात, ओझोनयुक्त असलेल्या या ठिकाणामुळे फ्रेश होऊ शकतात, स्थानिक कोळ्यांसोबत नौकाविहार करू शकतात किंवा फक्त इकडच्या अक्षत बीचवर सूर्यकिरणांचा आनंद घेत आरामात सुट्टी घालवू शकतात.

खर्च: रु. 6,500 पासून सुरुवात

स्थान: दी बंगलो ऑन द बीच, 24 किंग स्ट्रीट, थरंगमबडी 609313, जिल्हा नागपट्टीनम, तामिळनाडू

 

दी लीला, कोवलम

वैशिष्ट्य: भारतातील एकमेव उंच कड्यावरील बीच रिसॉर्ट

leela-kovalam-beach-resorts-in-india

एका उंच कड्याच्या टोकावर वसलेल्या देखण्या अशा या बीच रिसॉर्ट, दी लीलामधून अरबी समुद्राचा चित्तथरारक देखावा दिसतो तसेच बीचवर पायी जात मनमोकळे फिरण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. या रिसॉर्टमध्ये सुंदर बाग आणि बीचचा देखावा दाखविणार्‍या खोल्या आहेत तसेच बटलर सेवेने सज्ज असे आलिशान सूट्स, विशेष क्लब स्पा आणि जिम आहे. पारंपरिक केरळी पद्धतीने सजविलेल्या आधुनिक सुख सोयींनी सज्ज असलेल्या खोल्या आरामदायक आणि शैलीदार आहेत. रिसॉर्टमधल्या खास आयुर्वेदिक स्पामध्ये जुन्या पारंपरिक उपचार पद्धतीने ताजेतवाने आणि तणावमुक्त होता येते, तर येथील बार, कॅफे व रेस्टोरंट्स स्वादिष्ट, स्थानिक भोजनाचा आस्वाद देतात.

खर्च: रु.11,500 पासून सुरुवात

स्थान: कोवलम बीच रोड, कोवलम बीच, तिरुवनंतपुरम, केरळ 695527

 

दी गोल्ड बीच रिसॉर्ट, दमण

वैशिष्ट्य: निवांत जागी अंतर्मुख करणारी समुद्राची दृश्ये

Gold-Beach-Resort-Beach-resorts-in-india

दी गोल्ड बीच रिसॉर्ट हे बुटीक शैलीचे लक्झरी रिसॉर्ट दमणमध्ये धीरगंभीर देवका बीचफ्रंटवर अरबी समुद्रास सन्मुख उभे आहे. देवका बीचच्या दोन एकर क्षेत्रात पसरलेले हे रिसॉर्ट तेथील तत्पर सेवा व उत्तम भोजनासाठी प्रसिद्ध आहे. यात डिलक्स व सुपर डिलक्स खोल्या आणि लक्झरी सूट्स आहेत. 600 चौ.फू.च्या प्रशस्त सूट्समध्ये एक लिव्हिंग रुम आणि डायनिंग रुम आहे तसेच ते जॅकुझी पद्धतीच्या बाथटबने सज्ज आहेत. मोठ्या, सुखद सुट्ट्यांसाठी अगदी योग्य असे हे रिसॉर्ट आहे.

खर्च: रु. 7,000 पासून सुरुवात

स्थान: प्लॉट नं. 2/1-बी, आणि 2/1-सी, देवका बीच रोड, मारवाड, नानी दमण

 

मेफेअर वेव्ह्ज, पुरी

वैशिष्ट्य: सुखसोयींनी वेढलेला आध्यात्मिक अनुभव

Mayfair Waves Puri, Beach-resorts-in-india

आणखी एक बुटीक रिसॉर्ट, मेफेअर वेव्ह्ज हे पुरीच्या धीरगंभीर बीचवर स्थित आहे. प्रवासी येथे भगवान जगन्नाथाच्या दर्शनार्थ आलेले असोत किंवा एका रोमॅंटिक मधुचंद्रासाठी, हे रिसॉर्ट त्या सर्वांचेच उत्तम प्रकारे आतिथ्य करतो. विविध सुखसोयी, जशा की स्पा, फिटनेस सेंटर व विविध प्रकारचे खाद्यप्रकार प्रस्तुत करणारे हे रिसॉर्ट, जर पाहुण्यांना समुद्रात पोहायचे असेल तर त्यांच्यासाठी लाईफगार्डची सुविधाही प्रदान करते. जर पाहुण्यांना जगन्नाथ मंदिरात जायचे असल्यास रिसॉर्टमधील पुजारी त्यांच्या मार्गदर्शनासाठी हजर असतात.

खर्च: रु. 13,000 पासून सुरुवात

स्थान: प्लॉट नं. 122, 124, 125, चक्र तीर्थ रोड, पुरी, ओडिशा 752002

 

बेअरफुट अॅट हॅवलॉक, अंदमान

वैशिष्ट्य: एक धीरगंभीर समुद्र, घनदाट जंगल आणि रोमांचक साहस सर्व एकाच ठिकाणी

Barefoot at Havelock, Beach-resorts-in-india

घनदाट जंगले, पांढरेशुभ्र समुद्रकिनारे आणि निळा समुद्र तसेच या रमणीय लँडस्केपवर ठिपक्यांसारखी दिसणारी विचित्र गवताळ कॉटेजिस या सार्‍यांच्या एकाच ठिकाणी उपस्थितीची कल्पना करा. हे कल्पनेतले चित्र म्हणजेच बेअरफुट अॅट हॅवलॉक – एक रमणीय बीचसाइड जंगल रिसॉर्ट, जे डिजिटली संपर्कात राहण्याच्या तणावापासून मुक्ती देऊन निसर्गाचा नजराणा देते. येथे 31 गवताळ तंबू, कॉटेज आणि विला आहेत, ज्यांच्यात गावरान डौलासोबत आधुनिक सुखसुविधा आहेत. निसर्गानुकूल असे हे रिसॉर्ट तुम्हाला भरपूर साहस अगदी सहज उपलब्ध करून देण्याची हमी देते. डायव्हिंग असो, स्नॉर्केलिंग असो, कायकिंग असो किंवा निसर्गातील फेरफटका असो, पर्यटकांना येते मजा करण्यासारखे खूप काही असते. शिवाय स्पामध्ये आराम करू शकतात किंवा रेस्टोरंटमध्ये बेटावरील ताज्या भाज्या किंवा ताजी मासळी यांचा आस्वाद घेऊ शकतात.

खर्च: रु. 9,500 पासून सुरुवात

स्थान: बीच नं. 7, राधानगर व्हिलेज, हॅवलॉक बेट, अंदमान बेट, अंदमान आणि निकोबार बेटे 744211

या पाच लक्झरी बीच रिसॉर्टसचे पर्याय विचारात घेऊन आता वेळ झाली आहे सूर्यप्रकाशाने उजळलेली सुट्टी आयोजित करण्याची आणि 2016 या सरत्या वर्षातील यश व आनंद साजरे करण्याची!