लाईव्ह नाऊ: 4 अस्सल विदेशी अनुभव अगदी येथे भारतामध्ये

Pallavi Siddhanta

Last updated: Sep 24, 2019

Want To Go ? 
   

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत 16व्या शतकापासून विदेशी साम्राज्यांचे घर राहिलेला आहे. आजसुद्धा आपल्या देशात वास्तव्य करून गेलेल्यांच्या मूल्यांचा, चवींचा आणि संस्कृतीचा त्या विशिष्ट भागांमध्ये वेगळा ठसा उमटलेला दिसून येतो. त्यामुळे जर आपल्याला अस्सल पोर्तुगीज किंवा फ्रेंच अनुभव घ्यायचा असेल परंतु त्या देशात जायचा वेळ नसेल तर भारतामधील त्यांच्या एकेकाळच्या वसाहतींना भेट द्या. आपण निराश होणार नाहीत याची खात्री आहे!

कुठे जावे: पाँडिचेरी

कशासाठी: फ्रेंच अनुभव घेण्यासाठी

Pondicherry, Foreign Experiences in India

 

अगदी अलीकडे 1954 पर्यंत पाँडिचेरी एक फ्रेंच वसाहत होती आणि आजपर्यंत तिथे वसाहती फ्रान्सचा वेगळा प्रभाव जपला गेला आहे. फ्रेंच वास्तुकला, फ्रेंच खाद्यपदार्थ, फ्रेंच वस्तूंची खरेदी इत्यादींचा येथे अनुभव घ्या. चमकदार तपकिरी रंगाच्या बाह्य भिंती, सर्वबाजूंनी बोगनवेलनी लगडलेले पांढरेशुभ्र बंगले ही पाँडिचेरीतील फ्रेंच क्वार्टर्सची हमखास वैशिष्ट्ये आहेत, जे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला वसलेले आहेत. पाँडिचेरीच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे ऑरोविले ज्याला सिटी ऑफ डॉन सुद्धा म्हटले जाते, याचे डिझाइन एका फ्रेंच आर्किटेक्टने केले होते आणि ते पाँडिचेरीतील एका लहान शहरासारखेच आहे. दी चर्च ऑफ सॅक्रेड हार्ट ऑफ जीझसची बांधणी गॉथिक शैलीमध्ये रंगीत काचांच्या खिडक्यांसोबत करण्यात आली होती आणि यातील म्युरल्स ख्रिस्ताच्या जन्माची गोष्ट सांगत आहे. पाँडिचेरीमधील बेकरींना अजूनही बोलेंजेरीज म्हटले जाते जेथील सॉफ्ट क्रेप्सने आपले मन हरखून जाईल.

पाँडिचेरीच्या वैभवामध्ये चिंब भिजण्यासाठी येथे काही आठवडे व्यतीत करा, अंत:करणातील जिव्हाळ्याने शहराची ओळख करून घ्या. फ्रेंचांनी प्रेरित केलेल्या पाँडिचेरी प्रोमेनेडला पायी फेरफटका मारल्यावर आणि एकमेकात गुंतलेल्या गल्ल्यांमध्ये सायकलने भटकंती केल्यावर फ्रान्सचा विलक्षण अनुभव मिळेल जो विसरताच येणार नाही.

Book Your Flight to Chennai Now!

कुठे जावे: गोवा

कशासाठी: पोर्तुगीज जीवनशैली अनुभवण्यासाठी

se-cathedral-goa

व्वा, गोवा. येथे 1510-1961 पर्यंत पोर्तुगीजांची वसाहत होती, देखणीय गोव्यावर तब्बल 450 वर्षे पोर्तुगीजांचे राज्य होते. गोव्यामधील पोर्तुगीजांचा इतिहास व त्यामुळे त्यांचा प्रभाव हा भारतामध्ये इंग्रजांसारखाच आहे. विलक्षण रस्ते, जुने पोर्तुगीज विला आणि क्लिष्ट चर्च गोव्यामध्ये मागे राहिलेल्या पोर्तुगीजांच्या एका समुजतीची आठवण करून देतात. सेंट कॅजेटन चर्च आणि आता वापरात नसलेला सेंट ऑगस्टीन चर्च पोर्तुगीजांनी बांधलेल्या अवाढव्य चर्चची आठवण करून देतात. पोर्तुगीज व्हाईबची अनुभूती घेण्यासाठी सेंट कॅथेरीन चॅपेल बघणे अगत्याचेच आहे, येथे पोर्तुगीजांनी बांधलेले हे पहिले चॅपेल आहे. पोर्तुगीज वास्तुशैलीच्या ठळक तत्त्वांचा समावेश असलेले विशेषत: दरवाजे आणि खिडक्यांच्या गोव्यातील घरांचे निरीक्षण करणे हा न विसरता येणारा अनुभव आहे. तपकिरी ते फिक्का जांभळा आणि गुलाबी ते पिवळसर हिरवा या रंगानी नटलेली रंगीबेरंगी बाह्य सजावट आपल्याला थेट पोर्तुगीजांच्या देशातच घेऊन जाते. इतकेच नव्हे तर फाउंटेन्हस गावामध्ये आपण काही विलक्षण जुने पोर्तुगीज घरेसुद्धा बघू शकतो.

विशेष सूचना: लूटोलिम जा, पोंडा शहराच्या जवळ, येथे आपल्याला 250 वर्षे जुना पोर्तुगीज शैलीतला विला दिसेल, ज्याला कॅसा अराउजो अल्व्हारेस म्हटले जाते. पोर्तुगीजांच्या राज्यात कुटुंबे कशी रहात होती हे आपल्याला येथे बघता येईल. पर्यटकांसाठी खुला असलेला हा विला फर्निचर, भांडी, सजावट आणि इतर बऱ्याच गोष्टींची झलक दाखवतो.

Book Your Flight to Goa Now!

कुठे जावे: ट्रान्क्यूबार

कशासाठी: योरच्या प्राचीन डॅनिश वसाहतीचा अनुभव घेण्यासाठी

Tranquebar, Danish Experience

 

ट्रान्क्यूबारला 1620च्या दरम्यान डॅनिश राजवटीने आपली वसाहत बनवले होते, ज्यावर नंतर डच ईस्ट इंडिया कंपनीने आपले नियंत्रण स्थापित केले. डॅनिश मोहकतेने दोनशे वर्षांपूर्वी बांधलेले ओल्ड टाऊन गेट बघताक्षणी शहरामध्ये प्रवेश केल्याबरोबर या शहराचा प्राचीन इतिहास आपल्या नजरेसमोर येतो. मुख्य रस्ते ज्यांना किंग्ज स्ट्रीट, क्विन स्ट्रीट आणि अॅडमिरल स्ट्रीट म्हटले जाते ते ट्रान्क्यूबारच्या जुन्या काळाच्या आठवणी सांगत असतात. तसेच डॅनिश किल्ला, जो डॅनिश कलावस्तूंचे आणि वसाहतीच्या जुन्या घरांचे संग्रहालय आहे. या शहरात डॅनिश पेस्ट्री मिळणे कदाचित काहीसे कठीण असेल मात्र ट्रान्क्यूबारमधील सीफूडची मेजवानी लज्जतदार आहे. ट्रान्क्यूबारला ‘थरंगमबाडी’ सुद्धा म्हटले जाते, ज्याचा अर्थ तामिळमध्ये गाणाऱ्या लाटांचा प्रदेश असा आहे. या आनंददायक दुर्लक्षित जुन्या वसाहतीच्या शहरामध्ये आपण नदीच्या काठावर बसून आपल्या केसांशी खेळणाऱ्या हवेचा आनंद घेऊ शकता.

Book Your Flight to Chennai Now!

कुठे जावे: दमण

कशासाठी: रोमांचक पोर्तुगीज स्वप्नामध्ये राहण्यासाठी

The Old Portuguese Colony, Daman

सन 1961मध्ये पोर्तुगीजांकडून भारतीय भूमीच्या स्वरूपात परत मिळवण्यात आलेल्या दमणच्या संस्कृतीमध्ये पोर्तुगीज प्रभाव कायम आहे. दमण दोन भागांमध्ये विभागलेले आहे – मोती दमण आणि नानी दमण. नानी दमण किंवा दमणचा लहान भाग जेथे पर्यटन या केंद्रशासित प्रदेशामध्ये बहरलेले आहे व येथे रेस्टॉरंट व वास्तव्यासाठी ठिकाणांची रेलचेल आहे. मोती दमण किंवा मोठे दमण हे मोती दमण तटबंदीमधील एक लहानसे शहर आहे. सेंट पॉलचे चर्च आणि बॉन जिससच्या कॅथेड्रलची रचना पोर्तुगीज वास्तुकला शैलीमध्ये करण्यात आली आहे ज्यामध्ये आत जाण्यासाठी गहन कोरीवकाम केलेल्या कमानी आहेत व आतील भागांना रंगीत काचाने सजवण्यात आले आहे. चंद्राच्या मंद प्रकाशात समुद्र किनार्‍यावर वेळ घालवणे आवडत असेल तर दमन लाइटहाऊसच्या सौंदर्य बघितल्याशिवाय राहणार नाही. येथील काही रेस्टॉरंट पोर्तुगीज खाद्यपदार्थसुद्धा सादर करतात, ज्यांचा आस्वाद घेतल्याशिवाय आपण राहूच शकणार नाही!

Book Your Flight to Mumbai Now!

More Travel Inspiration For Pondicherry