सॉलिड धम्माल: दिल्लीजवळ विकेंडच्या सुट्टीसाठीची आलिशान ठिकाणे

Malavika Mandapati

Last updated: Jun 15, 2017

Want To Go ? 
   

 

नवी दिल्ली हे पाहता पाहता भारतातील सर्वाधिक आलिशान शहरांच्या यादीत टॉपवर येत आहे. काही सर्वोत्कृष्ट आलिशान ठिकाणी दिल्ली आता तुम्हाला राजेशाही थाटाचा अनुभव देते. प्रचंड लोकवस्तीमुळे दिल्ली शहरात होत असलेल्या हलकल्लोळातून निसटण्यासाठी अगदी योग्य अशा स्थळांची अद्भुत श्रेणी सादर केलेली आहे, जेथे तुम्हाला परिपूर्ण आनंद उपभोगता येईल.

ही आहे दिल्लीपासून विकेंडच्या सुट्टीत जाता येण्याजोग्या सर्वोत्तम विलासी ठिकाणांची यादी.

1. नीमराणा फोर्ट, नीमराणा

neemrana-weekend-getaway
                                                                                                                                                                                   Image credits- Archit Ratan Flickr

 

नीमराणा फोर्ट पॅलेस हे भारतातील सर्वोत्कृत्ष्ट लक्झरी रिसॉर्टसपैकी एक आहे आणि दिल्लीहून विकेंडच्या सुट्टीत जाण्यासाठी आदर्श आहे! नीमराणा तुम्हाला ताण-मुक्त होण्याची आणि राजस्थानच्या समृद्ध संस्कृतीच्या वातावरणात शांतचित्ताने विश्राम करण्याची संधी देते. तुम्ही रिसॉर्टमध्येच राहून डोंगरांवरून दिसणारी नयनरम्य दृश्ये, शहरातील रुचकर खाद्यप्रकार आणि स्थानिक लोकांची रंगीबेरंगी नाच-गाणी या सार्‍याचा आस्वाद घेत विकेंड व्यतीत करू शकता.

खर्च: खोल्यांचे भाडे कमीत कमी रु. 6000 प्रति रात्र आहे (खोलीच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: दिल्लीपासून केवळ 130 किमी अंतरावर असलेल्या नीमराणा फोर्ट पॅलेस येथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम पर्याय रोड हा आहे. तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता किंवा टॅक्सी करून येऊ शकता. राष्ट्रीय महामार्ग 8 ने येथे पोहोचण्यास सरासरी 2 तास 40 मिनिटे लागतात.

Book Your Stay at Neemrana Fort PalaceBook Your Stay at Neemrana Fort Palace

2. हिल फोर्ट, केसरोली

हिरव्यागार शेतांनी वेढलेल्या हिल फोर्टमधून टेकड्यांच्या मागून डोकावणार्‍या सूर्याचे नयनरम्य देखावे दिसतात. 14व्या शतकात बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचा जीर्णोद्धार अभिजात लावण्य प्रदान करण्यासाठी करण्यात आलेला आहे; खोल्या पुरातन फर्निचरने सजलेल्या आहेत, बोळीमध्ये गावरान पांढर्‍या कमानी आहेत आणि मध्ययुगीन सूट्समध्ये प्रत्येकात एक स्वतंत्र शाही थीम आहे. हिल फोर्टमधील तुमचा प्रत्येक अनुभव हा असामान्य असेल, मग तुम्ही मोहरीची शेते बघत भटकंती करा किंवा केसरोलीचा जगप्रसिद्ध सूर्यास्त कौतुकाने पाहत उंट सवारी करा.

खर्च: खोल्यांचे भाडे कमीत कमी रु. 6000 प्रति रात्र आहे (खोलीच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: दिल्लीपासून केवळ 175 किमी अंतरावर असेलेल्या या स्थळी अलवर-भिवाडी मार्गाने पोहोचण्यासाठी सरासरी पावणेचार तास लागतील. तुम्ही रेल्वेनेही जाऊ शकता. तीन तासांच्या या प्रवासाचा सरासरी खर्च प्रत्येकी रु. 840 ते रु. 1200 आहे.

Book Your Stay at Hill FortBook Your Stay at Hill Fort 

3. ट्री हाऊस हाइडअवे- बांधवगड राष्ट्रीय उद्यान, बांधवगड     

tree-house-getaway

 

ट्री हाऊस हाइडअवे तुम्हाला तुमच्या घरापासून लांब एका आरामदायक घराचा आनंद मिळविण्याची संधी देते. तुम्ही आधुनिकता आणि पारंपारिकता यांचे मिश्रण असलेल्या ट्री हाऊसच्या खोल्यांमध्ये राहून तुमचा विकेंड व्यतीत करा किंवा रिसॉर्टमध्ये तेथील सरपटणारे प्राणी व पक्ष्यांच्या जातींसमवेत वन्यजीवनाचा आनंद घ्या. रोमॅंटिक अनुभव घेण्यास उत्सुक असल्यास तुम्ही चांदण्या रात्री मचाणावर बसून जवळच्या पाणवठ्यावर येणारे जाणारे असंख्य प्राणी बघू शकता. आरामशीर विकेंडसाठी तुम्ही इतर सांस्कृतिक उपक्रम जसे की सायकलिंग, सहली, गावभेटी आणि स्थानिक कलाकारांसोबत कार्यशाळा यांचा आनंद घेऊ शकता. वन्यजीव प्रेमी जीपमधून दाट जंगलात टायगर सफारीचा रोमांच अनुभवू शकतात. या जीपमध्ये पुढील बाजूस उंच सीट आहेत, ज्याच्यावर बसून तुम्ही वाघ दिसण्याची वाट बघू शकता!

महत्त्वाची टीप: केवळ पाच ट्री हाऊसेस उपलब्ध असल्यामुळे आगाऊ आरक्षण करणे गरजेचे आहे.

खर्च: एक दिवसाचे भोजन आणि जीप सफारी सकट खोलीचे भाडे रु. 27,000 प्रति रात्र पासून सुरू होते. (खोलीच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: दिल्लीपासून 800 किमी अंतरावर असलेल्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानाकडे वेगवेगळ्या मार्गांनी पोहोचता येऊ शकते. तुम्ही दिल्ली ते जबलपूर थेट विमानाने (साडेचार तास) व तेथून पुढे टॅक्सीने हॉटेलपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही रेल्वेनेही प्रवास करू शकता. गोंडवाणा एक्स्प्रेस आणि महाकौशल एक्स्प्रेस या दिल्लीहून नियमित जाणार्‍या गाड्या आहेत.

Book Your Stay at Tree House HideawayBook Your Stay at Tree House Hideaway

4. शेरवानी हिलटॉप, नैनीताल     

हिरव्यागार पर्वतराजीवर पसरलेले शेरवानी हिलटॉप हे एक शांत, 4-स्टार बुटीक रिसॉर्ट आहे, जे हिमालयाच्या वनस्पती व प्राणीजाती यांनी वेढलेले आहे. रिसॉर्टच्या सभोवतालच्या शांततेमुळे तुम्ही हिरव्यागार डोंगरांचे नयनरम्य देखावे पाहण्यात रमू शकता. तुम्ही नैनीतालच्या मध्यातून जाणार्‍या प्रसिद्ध माल रोडला भेट देऊ शकता, जो रिसॉर्टपासून केवळ 2 किमी अंतरावर आहे. थंडगार हवेत माल रोडवर तलावाच्या काठाने भटकंतीची मजा आगळीच आहे.

खर्च: खोल्यांचे भाडे कमीत कमी रु. 19,000 प्रति रात्र आहे (खोलीच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: हे दिल्लीपासून 285 किमी अंतरावर आहे. नैनीतालला पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 9 ने सरासरी पावणे आठ तासांचा रोडचा पर्याय हा सर्वात उत्तम पर्याय आहे. तुम्ही काठगोदामपर्यंत रात्रीच्या गाडीने 7 तासांत पोहोचू शकता आणि तेथून नैनीतालपर्यंत टॅक्सीने जाऊ शकता, ज्याला सुमारे पाऊण तास लागतो.

Book Your Stay at Shervani HilltopBook Your Stay at Shervani Hilltop

5. दी ओबेरॉय उदयविलास, उदयपूर

एका अविस्मरणीय अनुभवासाठी, दी ओबेरॉय उदयविलास हे सर्वोत्तम ठिकाण आहे. समृद्ध वास्तूकला आणि संस्कृतीच्या वैभवाने नटलेली ही वास्तू आपल्या विविध घुमटांसह आणि शामियान्यांसाह 50 एकरपेक्षा अधिक विस्तारात पसरलेली आहे. रोमॅंटिक सुट्टी अनुभवू इच्छिणार्‍यांनी पिचोला तलावाच्या काठी आवारात आणि फरसबंदी अंगणात फेरफटक्याचा आनंद घ्यावा. उदयविलासमध्ये 3 रेस्टोरंट्स, 2 गरम पाण्याचे पूल आणि एक आलिशान स्पा आहे, ज्यांच्यामुळे शहराच्या धकाधकीतून सुटका करून घेऊन ताणमुक्त होण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

खर्च: खोल्यांचे भाडे कमीत कमी रु. 29,000 प्रति रात्र आहे (खोलीच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: उदयपूरच्या सर्वात जवळचे विमानतळ आहे, महाराणा प्रताप विमानतळ, जे शहरापासून 20 किमी अंतरावर आहे. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचे ठरवत असाल तर, मेवाड एक्स्प्रेस आणि ग्वालियर-उदयपूर एक्स्प्रेसह काही गाड्या आहेत, ज्या सुमारे साडे बारा तासात पोहोचवतात.

Book Your Stay at Oberoi UdaivilasBook Your Stay at Oberoi Udaivilas

6. ब्राइझ केव्ह्ज, जिम कॉर्बेट

brys-caves-jim-corbett

गुहांच्या रुपातील मुक्त निसर्ग आणि आधुनिक सौंदर्यशास्त्र यांच्या संगमातून ब्राइझ केव्ह्ज वन्य जंगलाचा अनुभव सादर करतात. वन्यजीवन व सुखसुविधा यांचे हे उत्कृष्ट मिश्रण आहे आणि शहरी जीवनाच्या धामधुमीतून निसटण्यासाठी हे आदर्श स्थान आहे. आराम करण्यासाठी अगदी योग्य असलेल्या अशा ब्राइझ केव्ह्जमधील रेस्टोरंट, किर्र जंगल आणि पक्ष्यांच्या मंजुळ कूजनाच्या सान्निध्यात जागतिक पाककृतींचा आस्वाद घडवते. साहसप्रिय लोकांनी बिजराणी क्षेत्रास अवश्य भेट द्यावी. बिजराणी हे कॉर्बेट नॅशनल पार्कमधील वन्यजीवांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे.

महत्त्वाची टीप: यातील काही सर्वाधिक प्रसिद्ध गुहा आहेत, शिवालिक केव्ह, किंग केव्ह, क्वीन केव्ह आणि ग्रँड ट्री हाऊस, ज्याचे तुम्ही आरक्षण करावे असा आमचा आग्रह आहे!

खर्च: खोल्यांचे भाडे कमीत कमी रु. 18,000 प्रति रात्र आहे (गुहेच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: जर तुम्ही रेल्वेने जाण्याचे ठरविले तर पार्कच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे रामनगर, जे पार्कपासून केवळ 12 किमी अंतरावर आहे. प्रवास सुमारे 6 तास 40 मिनिटांचा आहे.

7. दी रॉयल ऑर्किड फोर्ट रिसॉर्ट, मसूरी

दी रॉयल ऑर्किड रिसॉर्ट हे हिवाळ्यात ऐषोआरामात विकेंड व्यतीत करण्यासाठीचे उत्तम ठिकाण आहे. थंडगार संध्याकाळी एखाद्या गरम पेयाचा कप सोबतीस घेऊन पर्वतराजीच्या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेत-घेत शिकोटीजवळ बसून वेळ घालवा. एखाद्या प्राचीन किल्ल्याप्रमाणे बांधलेले दी रॉयल ऑर्किड हे आपल्या परिवारासह निवांत वेळ घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. हे स्थान सोनेरी कमानी, 6-एकरची तारा हॉल इस्टेट आणि हिरव्यागार बागांनी वेढलेले आहे. केम्प्टी फॉल्सला भेट द्यायला विसरू नका. एका दरीजवळ असलेला हा धबधबा आपल्या विशिष्ट लोकेशनमुळे प्रसिद्ध आहे, जे सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

खर्च: खोल्यांचे भाडे कमीत कमी रु. 8,000 प्रति रात्र आहे (खोलीच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: राष्ट्रीय महामार्ग 1 ने तुम्ही सरासरी 6 तास 50 मिनिटांत पोहोचू शकता. तुम्ही रेल्वेनेही जाऊ शकता. या मार्गावर धावणार्‍या अनेक गाड्या आहेत पण आम्ही शताब्दी एक्स्प्रेसची शिफारस करतो.

Book Your Stay at Royal Orchid Fort ResortBook Your Stay at Royal Orchid Fort Resort

8. अमरविलास, आग्रा

ताज महालच्या भव्य दृश्यांसह अमरविलास नक्कीच तुम्हाला भुरळ घालेल. शहरी गजबजाटामधून सुटका करून घेण्यासाठी सर्वोत्तम असे हे ठिकाण, अमरविलास तुम्हाला राजेशाही थाटात राहण्याचा अनुभव देते. एखाद्या चांगल्या पुस्तकात रमण्यासाठी व सभोवतालच्या वृक्षराजीसह ऊबदार उन्हात न्हाऊन निघण्यासाठी अमरविलास हे आदर्श ठिकाण आहे. पाहुणे खासगी गोल्फ बग्यांमधून ताज महाल बघायला जाऊ शकतात आणि पार्श्वभूमीवर ताजची छायाकृती ठेऊन कँडललाईट डिनरचा आस्वाद घेऊ शकतात. उन्हाळ्यात इथे मोहक असते, शरद ऋतू मंत्रमुग्ध करणारे असतो, जेव्हा शेतांनी लालसर तपकिरी आणि सोनेरी शेला घेतलेला असतो, तर हिवाळ्यात ते स्वर्गासारखे असते.

खर्च: खोल्यांचे भाडे कमीत कमी रु. 25,000 प्रति रात्र आहे (खोलीच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: तेथे पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रेल्वे. येथे घेऊन जाणारी सर्वात जलद गाडी आहे 12050 गतिमान एक्स्प्रेस, जी फक्त 50 मिनिटांत पोहोचते. तुम्ही ताज एक्स्प्रेस हायवे मार्गानेही पावणे चार तासांत पोहोचू शकता.

Book Your Stay at AmarvilasBook Your Stay at Amarvilas 

9. दी टेरेसेस, कानाताल

terraces-weekend-getaway

गूढ अशा पाइन वृक्षांच्या जंगलाच्या मध्ये वसलेल्या दी टेरेसेस येथून हिरव्यागार डोंगरांचा विस्मयकारक देखावा दिसतो. दी टेरेसेस या बुटीक रिसॉर्ट्समध्ये 8 डिलक्स खोल्या, 12 सुपर डिलक्स खोल्या, एक बुटीक स्पा आणि एक लक्झरी सूट आहे. प्रत्येक सूट डोंगराच्या वेगवेगळ्या उंचीवर स्थित असून आपल्या अप्रतिम लोकेशनने तो प्रत्येकास अवाक करतो. आधुनिक सुखसोयी आणि अभिरुचीसंपन्न सजावट यांचे योग्य मिश्रण असलेले दी टेरेसेस अशा सुविधा देते, ज्या इतरत्र मिळणार नाहीत.

खर्च: खोल्यांचे भाडे कमीत कमी रु.14,000 प्रति रात्र आहे (खोलीच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: निसर्ग दृश्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही रेल्वे किंवा रोडने प्रवास करू शकता. कानातालच्या सर्वात जवळची दोन रेल्वे स्टेशन्स आहेत देहरादून आणि ऋषिकेश. त्याच्यापुढे रिसॉर्टपर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी/बस उपलब्ध आहेत. तुम्ही राष्ट्रीय महामार्ग 58 द्वारे रोडनेही सव्वा आठ तासांत येथे पोहोचू शकता.

Book Your Stay at The TerracesBook Your Stay at The Terraces

10. इल्बर्ट मानोर, मसूरी

1840 साली एका इंग्रजाने बांधलेले इल्बर्ट मानोर हे ओक वृक्ष आणि हिरव्यागार जंगलाच्या मध्ये वसलेले एक पर्यावरण अनुकूल बुटीक हॉटेल आहे. यातील सूट्स त्यांच्या अनोख्या नावाबद्दल प्रसिद्ध आहेत. ही नावे मसूरीचा मूळ इतिहास प्रतिबिंबित व्हावा या उद्देशाने गाव स्थापन करण्यास मदत करणार्‍या संस्थापकांच्या नावावरून ठेवली आहेत. हिमालयाची नेत्रदीपक दृश्ये फोटोग्राफरना चित्तथरारक छायाचित्रे घेण्याची संधीही देतात!

खर्च: खोल्यांचे भाडे कमीत कमी रु. 12,000 प्रति रात्र आहे (खोलीच्या प्रकारानुसार दर बदलेल)

तेथे कसे पोहोचाल: राष्ट्रीय महामार्ग 1 द्वारे तुम्ही 6 तास 50 मिनिटांच्या सरासरीने रोडने जाऊ शकता. या मार्गावर धावणार्‍या अनेक ट्रेनपैकी एखाद्या ट्रेनने तुम्ही जाऊ शकता. तथापि, आम्ही शताब्दी एक्स्प्रेसची शिफारस करतो.

Book Your Stay at Lemon Tree Tarudhan ValleyBook Your Stay at Lemon Tree Tarudhan Valley