‘पैसा वसूल’ असलेली उदयपुरमधील 5 बजेट हॉटेल्स

Mikhil Rialch

Last updated: Jun 28, 2017

Want To Go ? 
   

उदयपुर हे निर्विवाद सर्वात प्रगतीशील आणि तत्कालीन राजपूत राजेशाहीचा थाट असलेले शहर आहे. प्राचीन तलाव असलेली भूमी, संपन्न राजवाडे आणि निडरता दर्शविणारे किल्ले असणारे उदयपुर, राजस्थानी राजपूत वारशाच्या समृद्ध आणि उत्साही सांस्कृतिक पर्वात सामील होण्यासाठी तुम्हाला खुणावते.

उदयपुर शहराचा दौरा हा कदाचित महागडा प्रस्ताव होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या खिशावर ताण पडू नये यासाठी आम्ही सादर करीत आहोत 5 बजेट हॉटेल्सची यादी जे आरामदायक निवास उपलब्ध करून देतात. निवडलेले हे हॉटेल्स अभिरुची, कौटुंबिक अनुरूपता आणि शहरातील प्रमुख आकर्षणाच्या सानिध्यात असलेले आहेत.

आणखी वेळ न घालविता, त्याबाबत जाणून घेऊ.

गोल्डन ट्युलिप उदयपुर 

golden-tulip-udaipur

खरं सांगायचे म्हणजे हे काही बजेट हॉटेल नाही. पण, कुटुंबासाठी अतिशय अनुकूल वातावरण असल्याने उदयपुरमध्ये एक शालीन हॉटेल पाहायचे झाल्यास गोल्डन ट्युलिप निश्चितच फारसे खर्चिक वाटणार नाही. पिचोला तलाव आणि सिटी पॅलेसपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले गोल्डन ट्युलिप उदयपुर मुख्य वाहतूक केंद्रे आणि सांस्कृतिक वारशांचा तात्काळ संपर्क करवू शकते. तसेच, हे हॉटेल खोल्यांमधील उत्कृष्ट सुविधांसह ज्यांना आराम करणे पसंत आहे अशांसाठी हॉटेलमधील इतर सुविधाही उपलब्ध करून देते. बिजनेस सेंटर, पोहण्याचा तलाव, विविध खाद्यप्रकारांचे रेस्टॉरंट, फिटनेस सेंटर, स्पा, चलनाची अदलाबदल, वॅलेट पार्किंग, कॅफे आणि बार यांच्यासह गोल्डन ट्युलिप उदयपुर, जे लोक मूल्य आणि आराम यांच्यात योग्य संतुलन शोधत असतील त्यांच्यासाठी उदयपुरमधील इतर हॉटेल्सदरम्यान एक उत्कृष्ट निवड ठरू शकेल. 

प्रति रात्र मूल्य: रु. 3400/- पासून सुरुवात

स्थान: 63 अव्हेन्यू, सरदारपुरा, सुखडिया सर्कलनजीक, उदयपुर, राजस्थान, 313001 

Book Your Stay at Golden TulipBook Your Stay at Golden Tulip

श्री नारायण उदयपुर 

shree narayana udaipur

श्री नारायण उदयपुर हे शहरातील सर्वात महत्त्वाच्या आकर्षण केंद्रांच्या सानिध्यात असून यात फतेह सागर तलाव, सिटी पॅलेस, पिचोला तलाव आणि जगदीश मंदिर यांचा समावेश होतो. उदयपुरमधील हॉटेल्समध्ये श्री नारायण उदयपुर हे निश्चितच एक किफायतशीर हॉटेल आहे, ज्यात कुटुंब आणि व्यावसायिक प्रवाश्यांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. येथे असलेल्या बिजनेस सेंटर, मिटिंग रूम, विविध खाद्यप्रकारांचे रेस्टॉरंट आणि विविध हॉटेल सेवा एका आरामदायक निवासाची सुनिश्चिती करतात. जोडप्यांना निश्चितच हे किफायतशीर वाटेल आणि हॉटेल समुहक साईट्सवरील सर्वोच्च रेटिंग असलेले, म्हणजेच उदयपुर शहरातील हॉटेल्सच्या बाबतीत सर्वात विश्वसनीय असल्याचे द्योतक असेल. 

प्रति रात्र मूल्य: रु. 2700/- प्रति रात्र

स्थान: नं.2-बी, हॉटेल स्ट्रीट, आयसीआयसीआय बँकेसमोर, उडियापोल, उदयपुर, राजस्थान 313001 

Book Your Stay at Shree NarayanaBook Your Stay at Shree Narayana

हॉटेल अॅर्डेन्सी इन 

ardency-inn-udaipur

सुरेख निवासव्यवस्था, फतेह सागर तलाव आणि महाराणा प्रताप विमानतळ अशा महत्त्वाच्या स्थानांच्या अतिशय निकट असलेले हॉटेल अॅर्डेन्सी इन निरंतरपणे कुटुंबांसाठी आणि समूह प्रवाशांसाठी उदयपुर शहरातील हॉटेल्समध्ये सर्वोच्च रेटिंग राखत आले आहे. हे हॉटेल कॉन्फरन्स हॉल, इन-हाऊस बार, विविध खाद्यप्रकारांचे रेस्टॉरंट आणि पोहण्याचा तलाव यांच्यासह वातानुकूलित खोल्या, सेफ्टी डिपोझिट बॉक्स, वाय-फाय, मिनिबार, प्रसाधन सामग्री आणि बऱ्याच गोष्टींसह उदयपुरमधील शीर्ष हॉटेल्सच्या समकक्ष सुखसुविधा प्रस्तुत करते. तलावांच्या या शहरात राहण्यासाठी जे हॉटेल अॅर्डेन्सी इनला आपले घर बनवतील, त्या सर्व प्रवाशांसाठी आरामदायक निवासाच्या अनुभवासाठी टूर आयोजक, वॅलेट सेवा आणि डॉक्टर यांच्या सेवा कॉलवर उपलब्ध असतील. 

प्रति रात्र मूल्य: रु. 2200/- प्रति रात्र

स्थान: 3-4-5, पोलीस लाईन रोड, टेकरी चौराहा, गायरीआवास, सेन्ट्रल एरिया, उदयपुर, राजस्थान 313001

Book Your Stay at Ardency InnBook Your Stay at Ardency Inn

ट्रीबो पार्क क्लासिक 

उदयपुरमधील हॉटेल्सच्या यादीतील सर्वात कमी मूल्य असलेले हे ट्रीबो पार्क क्लासिक एका समाधानकारक निवासासाठी त्याच्या पाहुण्यांना शहरातील सर्व प्रमुख स्थानांचे सानिध्य पुरविते. राहण्यासाठी एकदम साफ, प्रशस्त खोल्या पुरवितानाच ट्रीबो पार्क क्लासिक वाय-फाय, पार्किंग सुविधा, रोजची साफसफाई आणि तुम्हाला ‘पैसा वसूल’ अशा अनेक विशेष सोयीसुविधा सादर करते. उदयपुरमध्ये आपली सुट्टी घालवायची असेल व आपल्या खिशाला फारसा ताण द्यावयाचा नसेल, तर उदयपुर शहरातील सर्वोत्कृष्ट हॉटेल्समध्ये ट्रीबो पार्क क्लासिक निश्चितच आपल्याला संतुष्टी देईल.

प्रति रात्र मूल्य: रु. 1890/- प्रति रात्र

स्थान: 12, दुर्गा नर्सरी रोड, शक्ती नगर, उदयपुर, राजस्थान 313001

मग, तुम्हाला शानदार वास्तव्य आणि ते पण किफायतशीर बजेटमध्ये हवे आहे की फक्त बॅगा ठेवण्यासाठी जागा हवी म्हणून फिरायला जाणार आहात? तुम्हीच निवडा आणि उदयपुर शहराचा तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा.