कान्हा राष्ट्रीय उद्यानामधील 5 लक्झरी फॉरेस्ट रिसॉर्ट

Chandana Banerjee

Last updated: Jun 28, 2017

Want To Go ? 
   

जर तुम्हाला तुमच्या सुट्ट्या वाघोबांच्या जंगलात, खूप सार्‍या साहसी उपक्रमांचा आनंद घेत व अतिशय आरामदायी निवासव्यवस्थेचा उपभोग घेत घालवणे आवडत असेल तर आपल्या सर्वांचा लाडका रूडयार्ड किपलिंगचा मोगली जिथे मोठा झाला त्याच कान्हा येथील लक्झरी फॉरेस्ट रिसॉर्टची आमची ही यादी आपल्यासाठी फारच उपयुक्त ठरेल. अधिकांश राष्ट्रीय उद्यानांप्रमाणे याचे दरवाजेसुद्धा पावसाळ्यानंतर लगेच उघडतात आणि ते ऑक्टोबर महिन्यापासून जूनपर्यंत पर्यटकांसाठीच खुले असतात.

सातपुडा पर्वतरांगांमधील मैकल डोंगराच्या पुढ्यात वसलेले हिरवेगार जंगल म्हणजेच कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे जे ‘सेव्ह द टायगर’ कार्यक्रमाचा भाग आहे आणि वाघांच्या नऊ अभयारण्यांपैकी एक आहे, जेथे वाघ आणि त्यांच्यासाठी असलेल्या पूरक पर्यावरणाचे संरक्षण केले जाते. 750 चौरस मैलांवर पसरलेल्या या रमणीय भूप्रदेशामध्ये सालाचे जंगल, बांबूचे घड व रोलिंग मेडोजची रेलचेल आहे. आपण जर हत्तीच्या पाठीवर किंवा खुल्या जिप्सीमध्ये बसून उद्यान पाहात असाल तर आपल्याला हरणे, आळशी अस्वले, बिबटे, अपरिमित पक्षी तर दिसतीलच परंतु कदाचित साक्षात जंगलाचा राजासुद्धा आपल्याला दर्शन देऊ शकेल.

बंजारतोळा

जंगलाच्या केंद्रभागाच्या दृष्टीक्षेपात असलेले बंजारतोळा लॉज हे ताज सफारीज लॉज हॉटेल या श्रृंखलेचा भाग आहे व यामध्ये प्रत्येकी नऊ लक्झरी सूट्सच्या दोन कॅम्पचा समावेश आहे व सोबतच बाहेरच्या भागात दिमाखात कॅम्प आउट करणे आवडणाऱ्या पाहुण्यांसाठी तंबूची कमानही आहे. सुमारे 90 एकरांच्या विशाल जागेत पसरलेले हे फॉरेस्ट लॉज आपल्या पाहुण्यांच्या आवडीप्रमाणे सेवा प्रदान करण्याची खात्री देत आहे, ज्यामध्ये जंगलाने भारलेल्या वातावरणात शेतातील ताज्या ताज्या भाज्यांचे जेवण, नदीकाठी कंदीलाच्या उजेडात रात्रीचे जेवण, त्यांच्या इन-हाउस शेफसोबत परस्पर संवादी पाककला सत्र आणि स्वयंपाकघरातून पाठोपाठ येणाऱ्या बुंदेलखंडी शैलीमधील मेजवान्यांचा अंतर्भाव आहे.

प्रारंभिक किंमत: रु. 12,750 प्रति रात्र

ठिकाण: कान्हा राष्ट्रीय उद्यान, कान्हा, मध्य प्रदेश 481111

Book Your Stay at Banjaar Tola

कान्हा अर्थ लॉज

सुमारे 16 एकर जंगलाच्छादित भागावर पसरलेले आणि कान्हाच्या राखीव क्षेत्रामधील एका लहानशा खेड्यामध्ये स्थित कान्हा अर्थ लॉज हे पार्कच्या गेटपासून फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. हा लॉज स्थानिक शैलीच्या ग्रामीण वैशिष्ट्यांनी, आरामदायक व लक्झरी सोयीसुविधांनी सुसज्जित आहे व यामध्ये स्नानगृह आणि पडव्यांसह 12 बंगल्यांचा समावेश आहे. गोंड शैलीच्या वास्तुकलेमध्ये बांधलेले हे लॉज टाकाऊ लाकूड व स्थानिक दगडांपासून बनवण्यात आले आहे. येथे आल्यानंतर आपण जीप सफारीद्वारे किंवा सायकल / पायी फिरून जंगलभ्रमण करू शकता व स्थानिक परिसर बघू शकता किंवा हत्तीच्या पाठीवर स्वार होऊ शकता जो आपल्याला वाघाच्या शोधात जंगलात घेऊन जाईल. कलाप्रेमींसाठी आधी विनंती केल्यानंतर आदिवासी गोंड कलाकारांसोबत कार्यशाळेचे आयोजनही केले जाऊ शकेल.

प्रारंभिक किंमत: रु. 16,000 प्रति रात्र

ठिकाण: पोस्ट सरेखा गाव – नर्ना कान्हा राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश 481111

Book Your Stay at Kanha Earth Lodge

कोर्टयार्ड हाउस कान्हा

फॉरेस्ट लॉजच्या साहसी वास्तव्यासोबत घरच्या वास्तव्याच्या उबेची सांगड घालणे म्हणजेच कोर्टयार्ड हाउस कान्हा आहे. नीलेश व कीर्ती अगरवाल या कान्हाच्या हॉटेल व्यावसायिकांनी उभारलेले हे एक विलक्षण आणि नेत्रदीपक बुटीक हॉटेल आहे, ज्यामध्ये पाच प्रशस्त व हवेशीर खोल्या आहेत ज्यांच्या मोठ्या खिडक्यांमधून आपण ग्रामीण परिसर न्याहाळू शकता व यामध्ये आपले वास्तव्य उबदार बनवण्यासाठी सुयोग्य उपाययोजना करण्यात आल्या आहे. आपल्याला नदीच्या कडेने पिकनिक साजरी करायची असेल, जंगलामध्ये भ्रमण करायचे असेल, गावकऱ्यांसोबत गप्पागोष्टी करायच्या असतील किंवा शेकोटीसंगे वाघाच्या गोष्टी ऐकायच्या असतील, तर कोर्टयार्ड हाउस कान्हासारखी दुसरी जागा नाही ज्यात आपल्या पाहुण्यांसाठी आदरातिथ्याचा खजिनाच खुला केलेला असतो.

प्रारंभिक किंमत: रु. 6,500 प्रति रात्र

ठिकाण: कान्हापटपरा, मध्य प्रदेश 481768

Book Your Stay at Courtyard House

सोलशिया

ज्यांना आपल्या मांडीवरचे पुस्तक वाचत पडवीमध्ये आराम करायचा असतो किंवा जंगलामध्ये पदयात्रा करीत व गावामध्ये फेरफटका मारत आपले कुतूहल शमवायचे असते त्यांच्याकरीता ही एक आदर्श जागा आहे. ज्या कुटुंबांना तंबूची मजा अनुभवायची आहे त्यांच्याकरीता येथे स्वयंपाकघरासहित दोन-बेडरुमचे अपार्टमेंट व एका रुमचे उबदार कॉटेज उपलब्ध आहेत. तसेच आपल्यामधील कॅम्पप्रेमींसाठी आधुनिक सुविधांनी सज्ज अशा तंबूमध्ये राहण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. एक पूलसाइड रेस्टॉरंट, कॅफे व तसेच एक फिटनेस सेंटर व एका ग्रंथालयाने सोलशियाच्या सोयीसुविधा व आकर्षणामध्ये आणखीनच भर घातलेली आहे.

प्रारंभिक किंमत: रु. 10,000 प्रति रात्र

ठिकाण: गाव कटिया, पोस्ट किसली, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश, भारत 481768

Book Your Stay at Soulacia

चितवन

एक एकांतप्रिय फॉरेस्ट लॉज असलेले हे चितवन ज्याच्या चार सूट्सची नावे निसर्गाच्या चार तत्वांवर आधारित आहे – जल, पृथ्वी, आकाश व महासागर, हे विलक्षण अनुभव घेण्यास इच्छुक असणाऱ्यांकरीता आदर्श ठिकाण आहे. याच्या थीम-आधारित सजावटीमध्ये प्रत्येक सूर्यप्रकाशाने-समृद्ध खोलीमध्ये खोलीच्या नावाप्रमाणेच आरशांची रचना करण्यात आली आहे. इन-हाउस रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेले जेवण पूर्णपणे आरोग्यदायक व शुद्ध सेंद्रीय स्वरूपातील व दुर्मिळ पाककलेचा नमुना असलेले पाचक जेवण असते. चितवन आपल्या दारापर्यंत स्थानिक ग्रामीण अनुभव प्रदान करण्याची ग्वाही देत आहे. पाहुणे सफारी व निसर्ग पदभ्रमणासाठी निसर्गमित्रांसोबत जाऊ शकतात, पक्षांच्या प्रजनन व फुलपाखरांच्या वाढीविषयी जाणून घेऊ शकतात व इतकेच नव्हे तर आपल्या देशातील या भागाच्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी बैलगाड्यांमधून प्रवास करीत स्थानिक बाजाराला भेट देऊ शकतात.

प्रारंभिक किंमत: रु. 8,000 प्रति रात्र

ठिकाण: गाव सामनापूर, पोस्ट मुक्की, कान्हा राष्ट्रीय उद्यान, तहसिल बैहर, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश, पिन: 481111

Book Your Stay at Chitvan

आपल्या खिश्यामध्ये ही यादी टाकल्यानंतर वाघाच्या इलाक्यात सुट्टी साजरी करण्यासाठी आपल्याला फक्त दुर्बिणींची एक जोडी, एक जंगल हॅट आणि प्रचंड उत्साहाचीच मात्र आवश्यकता भासते.