खिशाला परवडणारी गोव्यातील 7 हॉटेल्स

Chandana Banerjee

Last updated: Jun 28, 2017

Want To Go ? 
   

हिवाळ्याचा हंगाम, नीलमणी समुद्र आणि फेणींचा हा प्रदेश संपूर्ण जगभरातील प्रवाशांना आपल्याकडे अशा प्रकारे आकर्षित करतो ज्याप्रकारे समुद्रकिनाऱ्यावरील इतर कुठलेच शहर करीत नाही. आपल्या अद्भूत समुद्रकिनाऱ्यांसाठी, समुद्रावरील धम्माल पार्ट्यांसाठी आणि रात्री उशीरापर्यंत सुरू राहणाऱ्या बाजारांसाठी व तसेच आपल्या चर्च, मसालेदार पदार्थ व वामकुक्षी प्रिय जीवनशैलीकरीता सुप्रसिद्ध असणाऱ्या गोव्यामध्ये सर्व प्रकारच्या पर्यटकांसाठी आकर्षणस्थळे आहेत. त्यामुळे जर आपल्याजवळ प्रति रात्र खर्च करण्यासाठी रु. 6,000 पेक्षाही कमी बजेट असेल तरीही निराश होऊ नका. गोव्यामध्ये आपल्या वास्तव्यासाठी तरीही आपल्याला आरामदायक जागा मिळेलच. येथे आम्ही गोव्यामधील सिक्रेट सात बजेट हॉटेलची यादी खास आपल्यासाठी देत आहोत.

अमिगो प्लाझा

आमच्या निवडीचे कारण: समुद्रकिनारी आरामदायक वास्तव्यासाठी

कोलवा बीचपासून फक्त 200 मीटर अंतरावर असलेले हे रिसॉर्ट हाकेच्या अंतरावर असलेल्या शुभ्र, रेताळ समुद्रकिनाऱ्यावर एकांतात दूरवर फेरफटका मारण्याची हमी देत आहे. खोल्या साध्या व स्वच्छ आहेत, कर्मचारी वर्ग मैत्रीपूर्ण आहे व वास्तव्य आरामदायक आहे. अधिक मौजमस्ती करण्यासाठी त्यांच्या आउटडोअर स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारा, हॉट टबच्या उष्णतेने स्वत:ला चिंब भिजवा किंवा टवटवीत होण्यासाठी आयुर्वेदिक मसाज घ्या.

किंमत: रु. 1,500 पासून सुरुवात

ठिकाण: 4था वार्ड, कोलवा बीच, तालुका सालसेट, कोलवा, गोवा 403708

Book Your Stay at Amigo Plaza Goa

दी केमलॉट रिसॉर्ट

आमच्या निवडीचे कारण: बजेटमध्ये वसाहती ऐषारामाचा अनुभव

स्विमिंग पूल किंवा हिरव्यागार मैदानाच्या दिशेने असलेल्या युरोपिअन शैलीच्या खोल्या व लाकडाचे कॉटेज असणारे हे गोवन रिसॉर्ट वसाहतयुगातील ऐषारामाचा अविस्मरणीय अनुभव प्रदान करते ज्याला आधुनिक युगाच्या लक्झरी व आरामदायकतेची जोड देण्यात आलेली आहे. कळंगुट बीचपासून फक्त 1.5 किमी आणि मापूसा फ्रायडे मार्केट व तसेच सिंक्वेरिअम बीचपासून 8 किमी अंतरावर असलेले हे रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्यावरच्या शहराच्या चैतन्यामध्ये नखशिखांत भिजण्याची संधी प्रत्येक पर्यटकाला प्रदान करते. पूलाच्या बाजूला असलेल्या बारमध्ये कॉकटेल्स व ड्रिंक्स, बहुविध पाककृतींनी सज्ज रेस्टॉरंटमधील चमचमीत जेवण आणि विशेष रेस्टॉरंटमधील आनंददायक सीफूडची मेजवानी या ठिकाणाच्या आनंदोत्सवामध्ये आणखीनच भर घालत असते.

किंमत: रु. 3,000 पासून सुरुवात

ठिकाण: बागा-आरपोरा रोड, कोब्रा वेड्डो, कळंगुट, गोवा 403516

Book Your Stay at The Camelot Resort

बॉलीवूड हॉटेल

आमच्या निवडीचे कारण: “पैसा वसूलअसा गोव्याचा अनुभव

bollywood sea queen, budget hotels in goa

शांतताप्रिय कोलवा बीचपासून फक्त मिनिटभराच्या अंतरावर असणारा हा आणखी एक रिसॉर्ट आहे. जर आपल्याला प्रसन्न समुद्रकिनाऱ्यावर रेतीचे किल्ले बांधण्याचा अनुभव घ्यायचा असेल, सूर्यास्ताच्या साक्षीने लांब फेरफटका मारायचा असेल किंवा फेसाळलेल्या लाटांना चंदेरी वाळूचे चुंबन घेताना बघायचे असेल तर बॉलीवूड हॉटेल परिपूर्ण पार्श्वभूमी प्रदान करते. जर समुद्र आणि वाळू बघून आपले मन भरले असेल तर स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स व्हा, पामच्या झाडांनी आच्छादित हिरव्यागार बगिच्याचा आनंद घ्या किंवा या थ्री स्टार रिसॉर्टमध्ये आयुर्वेदिक उपचार घ्या.

किंमत: रु. 1,800 पासून सुरुवात

ठिकाण: कोलवा बीच, सालसेट, कोलवा, गोवा 403708

Book Your Stay at Bollywood HotelBook Your Stay at Bollywood Hotel

कोको हेरिटेज होम

आमच्या निवडीचे कारण: अस्सल गोवेकरांसारखे नारळाच्या बागेत वास्तव्य

प्रसिद्ध बागा बीचपासून थोड्याच अंतरावर असलेल्या ब्लू व्हेल वॉटर पार्क रिसॉर्टमधील कोको हेरिटेज होम हे नाव जे सांगत आहे अगदी त्याप्रमाणे एक पारंपारिक गोवन शैलीचे आधुनिक सुविधांनी युक्त असे रिसॉर्ट आहे. याचे उद्दिष्ट पर्यटकाला अस्सल गोवन जीवनशैलीचा व सोबतच साहसी उपक्रमांचा अनुभव देणे आहे. नारळाच्या बागेत बांधण्यात आलेले हे रिसॉर्ट आपल्या पाहुण्यांना मार्गदर्शक टूरद्वारे नारळाच्या शेतीच्या खाचाखोचा समजून घेण्याची संधी प्रदान करते व सोबतच नारळाच्या झाडांवर चढण्याचे प्रशिक्षणही देते. तसेच आपण बीचवर सूर्यप्रकाशात भिजूही शकता किंवा वॉटर पार्कमध्ये राइड करू शकता. लज्जतदार जेवणाचा आनंद घेण्यासाठी येथील अॅक्वा रेस्टॉरंटचा अनुभव घ्या. डील आकर्षक करणारी विलक्षण बाब म्हणजे: शेवटच्या क्षणी वास्तव्यासाठी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी खोलीभाड्यावर 15% सूट. अतिरिक्त लाभ: हे रिसॉर्ट ब्रिट्टोजपासून फक्त 1 किमी अंतरावर आहे, जे प्रत्येक पर्यटकाच्या अवश्य भेट देण्याच्या यादीमध्ये असलेले अस्सल गोवन रेस्टॉरंट आहे.

किंमत: रु. 3,000 पासून सुरुवात

ठिकाण: ब्लू व्हेल वॉटर पार्क, बागा-आरपोरा रोड, बागा, गोवा 403516

Book Your Stay at Coco Heritage HomeBook Your Stay at Coco Heritage Home

बेल्ले विस्तावाडो – एनव्हीरो ग्रीन रिसॉर्ट

आमच्या निवडीचे कारण: अस्सल गोवन अनुभवाच्या शोधात असणाऱ्या खाद्यप्रेमींसाठी

झोपडीसारखा परिसर असलेले हे आकर्षक, गोवन शैलीचे रिसॉर्ट सांगोल्डा पंचायत आणि कळंगुट बीचपासून 4.5 किमी वर आहे. गोव्यातील समुद्रकिनारे पायथे घालताना गोव्याच्या रंगामध्ये चिंब भिजण्यासाठी परिपूर्ण असलेल्या बेल्ले विस्तावाडोमध्ये वातानुकूलित बंगलो-शैलीतल्या 12 खोल्या व तसेच सूट्स आहेत. अस्सल गोवन शैलीमध्ये बनवलेले सीफूड चाखण्यास इच्छूक असणाऱ्यांसाठी मूनफिश रेस्टॉरंट उत्कृष्ट जेवण सादर करीत आहे. मदिरा हे येथील आणखी एक रेस्टॉरंट कॉन्टिनेन्टल लज्जत सादर करते तर छतावरील बार्बेक्यूचे ठिकाण निराळी चव चाखण्यास इच्छुक असणाऱ्यांना भन्नाट ग्रिल्ड पदार्थांची मेजवानी सादर करते.

किंमत: रु. 2,000 पासून सुरुवात

ठिकाण: नं. 162, चोगम रोड सांगोल्डा, बार्डेझ, सांगोल्डा, गोवा, 403511

Book Your Stay at Belle WistaWadoBook Your Stay at Belle WistaWado

दी क्वीनी

आमच्या निवडीचे कारण: बजेटमध्ये महाराणीसारखे आदरातिथ्य

Hotel Queeny, budget hotels in goa

उबदार, स्टायलिश आणि आधुनिक दी क्वीनी एनएच17बी या राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी बाजूला आहे. जे समुद्र दर्शन व आरामदायक वास्तव्य प्रदान करून आपले वास्तव्य अविस्मरणीय बनवते. नेव्हल एव्हिएशन संग्रहालयापासून फक्त 9 किमी व उतोर्डा बीचपासून 8 किमी अंतरावर असलेले या बाल्कनींच्या रांगेच्या रिसॉर्टमध्ये सर्व आधुनिक सुविधा व मोफत ब्रेकफास्ट बफेट उपलब्ध आहे. नेत्रदीपक स्विमिंग पूल, समुद्राच्या साक्षीने भोजनासाठी केलेली बैठक व्यवस्था आणि छतावरचे ग्रामीण शैलीतील रेस्टॉरंट आपल्याला आपल्या जीवलगांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्याची व एकत्रितपणे शांत वेळ घालवण्याची संधी प्रदान करतात.

किंमत: रु. 3,000 पासून सुरुवात

ठिकाण: क्वीनी नगर, वेलसाओ – पाले, एअरपोर्ट रोड जवळ, वास्को द गामा, गोवा 403712

Book Your Stay at The QueenyBook Your Stay at The Queeny

न्यू इमेज इन

आमच्या निवडीचे कारण: किफायतशीर वास्तव्यासोबत उत्कृष्ट सेवेचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांकरीता

विलक्षण आणि उबदार असलेले हे चमकदार उजळ रिसॉर्ट कळंगुट मार्केट, सेंट अॅलेक्स चर्च आणि कॅसिनो पाम पासून फक्त काही मिनिटांच्या अंतरावर आहे. सर्व आधुनिक सुविधांनीयुक्त वातानुकूलित 20 खोल्या व तपकिरी परिसरामध्ये नीलमणी दागिन्यासम भासणाऱ्या आउटडोअर पूलाने सुसज्जित न्यू इमेज इन हे एका आरामदायक कौटुंबिक सुट्टीसाठी आपल्यासाठी आवश्यक असेच आहे. त्वरित व आनंददायक ग्राहक सेवा प्रदान करण्यामध्ये याचा वरचा क्रमांक आहे. बोनस म्हणजे लज्जतदार कॉन्टिनेन्टल नाष्टा जो मोफत मिळतो बरं का!

किंमत: रु. 4,350 पासून सुरुवात

ठिकाण: डॉ. अफोंसो रोड, कळंगुट, गोवा 403516

बजेटकरीता फायदेशीर टीप: एक दुचाकी भाड्याने घ्या, एक नकाशा विकत घ्या व आपल्या सवडीने वाळू व सीफूडचे हे शहर पालथे घाला!

Book Your Stay at New Image InnBook Your Stay at New Image Inn

More Travel Inspiration For Goa