गोव्यामध्ये हॉट एअर बलून राईड आणि त्यासारखी अन्य भन्नाट आकर्षणे!

Protima Tiwary

Last updated: Jan 5, 2018

एका मिनिटाकरिता आपले डोळे बंद करा आणि हिरव्यागार मऊ जमिनीवरून आणि खोल निळ्या समुद्रावरून तरंगत असल्याची कल्पना करा, जेथे वारा आपल्या कानाशी गुणगुणत आहे आणि आपण गोव्याची सुंदरता पक्ष्याच्या नजरेतून निहाळत आहात. फारच सुंदर कल्पना आहे ना? मी अलीकडेच गोव्यात ज्या हॉट एअर बलून राईडचा आनंद घेतला आहे त्याचा रोमांच व उत्सुकता शब्दात व्यक्त करण्यासाठी शब्दच तोकडे पडत आहेत.

एक उबदार स्वागत

आम्हाला आमचा हॉलिडे तणाव व थकव्याने सुरू करायचा नव्हता, त्यामुळे आम्ही रस्त्याने प्रवास करण्याचे टाळले व त्याऐवजी मेकमायट्रिपच्या पुणे ते दाबोलिम विमान प्रवासाची तिकीटे बुक केली (आणि काही आकर्षक डीलही मिळवल्या!). हॉटेलने विमानतळापासून वाहतूकीची व्यवस्था केली होती आणि स्वागतपर ड्रिंक व परिचयानंतर आम्ही थेट अस्सल गोवन पद्धतीच्या जेवणासाठी कँडोलिम बीचकडे प्रयाण केले. बीचच्या कडेला या शाही जेवणासोबतच आमच्या सुट्ट्यांची सुरुवातही उत्साहात झाली. आम्ही वामकुक्षीसाठी परत हॉटेलला परतलो. नयनरम्य फोर्ट अगौडाला फेरफटका मारताना संध्याकाळ कशी निघून गेली कळलेच नाही.

Read more: 5 Unique Hotels in Goa You Simply Must Check Into

hot-air-balloon   

बलूनची सैर करण्याची वेळ

हॉट एअर बलून राईड ही विलक्षण आकाशी साहसक्रीडा आहे जी प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी करायलाच हवी. आम्ही उड्डाण भरण्यापूर्वी सुरक्षेविषयी माहिती घेताना आम्ही बलूनची उड्डाणासाठीची तयारी होताना पाहिले. बलून तयार झाल्यावर आम्ही आमच्या आयुष्यातल्या एका विलक्षण राईडवर निघालो! डोक्यावर गुबगुबीत पांढरे ढग होते, खाली खोल समुद्राचे निळशार पाणी होते, दूरवर पसरलेले सोनेरी समुद्रकिनारे होते आणि माझ्या शरिरात उत्साहाचे कारंजे उडत होते, ही आयुष्यात क्वचितच अनुभवायला मिळणारी अनुभूती माझ्या मनात कायमचीच कोरली गेली आहे! आम्ही सुमारे तासभर गोव्याला पक्ष्याच्या नजरेतून बघितले आणि अविस्मरणीय सूर्यास्ताचाही आनंद घेतला. नंतर त्यादिवशी आम्ही बाम्बोलिम बीचवर असलेल्या झोपडीमध्ये कूच केली आणि संपूर्ण संध्याकाळ विश्रांती घेत व गप्पा मारत घालवली.

अवजड निरोप

पुढचा दिवस आम्ही अंजुना बीच आणि वागेटर बीचवर विश्रांती घेत व थंडगार हवेत ताजेतवाने होत घालवला व रात्री उशीरा आम्ही रुमवर परतलो. पुन्हा एकदा विमानतळापर्यंत वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली मात्र या अनुभवाला गुडबाय करणे खरंच कठीण झाले होते. या अनुभवात्मक हॉलिडेला अविस्मरणीय बनवण्याकरीता मेकमायट्रिपला मनापासून धन्यवाद!

Read more: 10 Things to Do in Goa for Free

माझे मेकमायट्रिप पॅकेज: गोवा – हॉट एअर बलून राईड (ऑनलाईन)​

किंमत: रु. 39,676 पासून सुरू*​

Book Your Holiday Packages to Goa Now!

*किंमत बदलूही शकते​

More Travel Inspiration For Goa