सान्निध्य आणि पर्यटनाच्या आकर्षक सुविधांमुळे भारतीय पर्यटकांसाठी दुबई हे सर्वात लोकप्रिय परदेशी ठिकाणांपैकी एक बनले आहे. अतिशय मोहक स्कायलाईन, पारंपारिकता व आधुनिकतेचा एक विलक्षण संगम आणि प्रत्येक कोपऱ्यातून डोकावणारी सांस्कृतिक विविधता इत्यादी वैशिष्ट्यांमुळे दुबईने समृद्धीचा एक नवीन आदर्श सर्वांसमोर ठेवलेला आहे.
त्यामुळे यात काहीच आश्चर्य नाही की ते कौटुंबिक पर्यटकांमध्ये इतके लोकप्रिय आहे. म्हणूनच जर आपण आपल्या मुलांना सुट्ट्यांमध्ये ग्रेट हॉलिडेवर घेऊन जाण्याचे वचन दिले असेल तर आपल्या यादीमध्ये दुबईचा समावेश करण्यास विसरू नका. दुबईमध्ये खास मुलांसाठी असलेली 7 हॉटेल्स आहेत जेथे आपण सहलीचा अद्भूत आनंद घेऊ शकता. त्यामुळे आत्ताच बुक करा!
अॅटलांटिस रिसॉर्टबाबत बरेच काही बोलले गेले आहे, ज्याने आपल्या पौराणिक अंडरवॉटर किंगडमविषयी आभासी आकर्षण निर्माण करण्यात काहीच कसर ठेवलेली नाही, ज्यामध्ये एक वॉटर पार्क व एक पाण्याखालील मत्स्यालयसुद्धा आहे. स्वत:चा खासगी 800 मीटर लांब समुद्रकिनारा असलेल्या अॅटलांटिस द पाम हॉटेल अँड रिसॉर्टमध्ये लहानग्यांसाठी चिक्कार उपक्रमांची सुविधा आहे. टेनिस कोर्ट व मनोरंजनाच्या साधनांपासून ते बहुविध खाद्यप्रकारांच्या रेस्टॉरंटपर्यंत, फिटनेस सेंटर, व्हर्लपूल, लगून्स आणि इतर बरेच काही उपलब्ध आहे. अर्थात अॅटलांटिसमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. मग ते डॉल्फिनसोबत पोहणे असेल किंवा अॅक्वाव्हेंचर पार्कमध्ये थ्रिल राइड असेल किंवा विविध टीन्स क्लबमध्ये मित्र बनवणे असेल, अॅटलांटिस दुबई मनोरंजनाच्या व्याख्येला एका नवीनच उंचीवर नेऊन ठेवते.
किंमत: रु. 30,508 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: क्रीसेन्ट रोड - दुबई
Book Your Stay at Atlantis Palms, DubaiBook Your Stay at Atlantis Palms, Dubai
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रॅडिस्सन ब्लू हॉटेल दुबई डेरा क्रीकजवळ शहराच्या व्यावसायिक केंद्रामध्येच असण्याचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे ते व्यावसायिक प्रवाशांसाठी व कुटुंबांसाठी योग्य निवड ठरते. स्कॉश कोर्ट, पूल, धावणे, चालणे व सायकलिंगचे ट्रॅक हे इतर काही उपक्रम आहेत जे आपल्या मुलांना व्यस्त ठेवतात व आपल्याला सुंदर डेरा क्रीकची मजा उपभोगण्याची संधी देतात. हॉटेल जागतिक पाककृती सादर करणाऱ्या रेस्टॉरंटनी जरी भरले असले तरीही मुलांना यम रेस्टॉरंटमधील नूडल फ्यूजन मिल्स आवडतीलच या आमच्या विधानावर आपला विश्वास नक्कीच बसेल. सोबतच हॉटेलमध्ये एक ऑर्केड व गिफ्ट शॉपही आहे, जेथे कुटुंबातील प्रत्येकास भेटवस्तू खरेदी करण्यासाठी निवड करताना नक्कीच आपली तारांबळ उडेल.
किंमत: रु. 7000 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: बेनियाज रोड, दुबई
Book Your Stay at Radisson Blu Hotel Deira Creek DubaiBook Your Stay at Radisson Blu Hotel Deira Creek Dubai
जुमेराह बीच या महत्वाच्या ठिकाणी असलेले दी वेस्टीन दुबई मिना सेयाही बीच रिसॉर्ट अँड मरीना अथांग अरेबियन खाडीकडे बघत आरामदायक वास्तव्य करण्याची संधी प्रदान करीत आहे. सहलीचा आनंद उपभोगून नवचैतन्य प्राप्त करण्यासाठी कुटुंब व मुलांना परिपूर्ण वातावरण प्रदान करण्यावर रिसॉर्टने आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे, जेव्हा लहानगे दैनिक स्थळदर्शन व इतर उपक्रम पार पडल्यानंतर हॉटेलमध्ये परत येतात तेव्हा हॉटेलमध्येच करण्यासारखे बरेच काही असते. समुद्रकिनाऱ्यावरील खेळ ज्यामध्ये वाळूचा किल्ला बांधणे, स्विमिंग पूलवरच्या उपक्रमांचा समावेश आहे त्यापासून तर चिल्ड्रन्स क्लब, बेबीसिटिंग सेवा आणि भोजन क्षेत्रामध्ये मुलांसाठी विशेष मेन्यू इत्यादींपर्यंत दी वेस्टीन दुबई पाहुण्यांना दुबई फिरण्याची संधी देण्यासाठी मुलांना आरामदायक वातावरणामध्ये व्यस्त ठेवण्याची काळजी घेते.
किंमत: रु. 17,000 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: अल सूफोह रोड, दुबई
Book Your Stay at Westin Dubai Seyahi Beach ResortBook Your Stay at Westin Dubai Seyahi Beach Resort
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले पार्क रेगिस क्रिस कीन हॉटेल हे दुबई संग्रहालय, बुरजुमान शॉपिंग मॉल, दुबई मॉल आणि दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर सारख्या स्थळांना भेट देण्यासाठी उपयुक्त ठिकाण आहे. रूफटॉप पूल, स्टीम, सौना, जॅकुझी व फिटनेस सेंटर याद्वारे पाहुण्यांच्या पुन्हा जोमाने नवचैतन्य जागवण्याच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी हॉटेल संपूर्णपणे सुसज्जित आहे. मुले मनोरंजनाच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात – जेव्हा दिवसभराच्या भ्रमंतीने त्यांना थकल्यासारखे होत असेल तेव्हा ते टेनिस व स्कॉश खेळापासून जॅकुझीचा आनंद लुटू शकतात.
एक आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट, एक कॉफी लाउंज व पूल टेबलसह एका बार समवेत पार्क रेगिस क्रिस कीन हॉटेल पाककलेच्या आघाडीवर बाजी मारते. शेवटी, हॉटेलचा क्लब सेवन नाईटक्लब म्हणजे आपल्याला लॉबीच्या बाहेर न पडताही धम्माल मौजमस्ती करण्याची हमखास जागा आहे.
किंमत: रु. 7,500 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: शेख खलिफा बिन झायेद स्ट्रिट, अल करामा, बुर दुबई, बुरजुमान सेंटरसमोर, दुबई
Book Your Stay at Park Regis Kris Kin HotelBook Your Stay at Park Regis Kris Kin Hotel
मॅजेस्टीक हॉटेल टॉवर दुबई वास्तव्याचा अनुभव व सुविधांच्या बाबतीत आपल्या नावाच्या भव्यतेच्या अनुरूपच आहे. मुलांना आउटडोअर स्विमिंग पूलमध्ये पाणी उडवण्यात मजा येईल तर त्याचवेळी आपण सन टेरेस, सौना आणि स्टीम सेंटरचा आनंद घेऊ शकाल. हे हॉटेल पाहुण्यांना जेवणाचे विविध प्रकारचे पर्याय सादर करीत असते जसे की इलिआ, एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रीक रेस्टॉरंट आणि तिरक्वाझ जे आपल्या उत्कृष्ट ब्रेकफास्ट बफेटसाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारा आवडणाऱ्यांसाठी एक विशेष उपहार आहे - मॅजेस्टीक हॉटेल टॉवर दुबई हे दुबईमधील अधिकांश धमाल समुद्रकिनाऱ्यांसाठी मोफत शटल बस सेवा सादर करीत आहे.
ठिकाण: प्लॉट नं. 317-106, मनखूल रोड, अल मनखूल, बुरदुबई - दुबई
किंमत: रु. 6,000 प्रति रात्रपासून सुरुवात
Book Your Stay at Majestic Hotel Tower DubaiBook Your Stay at Majestic Hotel Tower Dubai
पोर्ट रशिद जिल्ह्यामध्ये वसलेले व जुमेराह बीच, दुबई वस्तूसंग्रहालय व हेरिटेज व्हिलेज यासारख्या प्रसिद्ध ठिकाणांपर्यंत उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करणारे हिल्टन गार्डन इन दुबई अल मिना ही वास्तव्यासाठी एक लोकप्रिय निवड आहे. खाण्यापिण्यासाठी तीन विलक्षण निवडींमध्ये गार्डन ग्रील अँड बार, दी पॅव्हेलिअन पँट्री व दी गार्डन बार सामिल आहे ज्यामध्ये पाहुणे आपल्या मर्जीनुसार यथेच्छ ताव मारू शकतात. रूफटॉप स्विमिंगपूलाच्या परिसरातून दुबईच्या स्कायलाइनचा हेवा वाटण्याजोगा परिसर न्याहाळता येतो ज्यामध्ये बुर्ज खलिफाही सामिल आहे ज्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. मुले हवा तितका वेळ पूलमध्ये घालवू शकतात व आपण स्कायलाइनचे निरीक्षण करू शकता. इतर मनोरंजनात्मक सुविधांमध्ये सामिल आहे फिटनेस सेंटर व मनोरंजनाची ठिकाणे. हे सर्व खूपच किफायतशीर दरात उपलब्ध आहे ज्यामुळे हिल्टन गार्डन इन दुबई अल मिना हे कुटुंबासह येणार्या पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
ठिकाण: अल मिना रोड, दुबई
किंमत: रु. 5,168 प्रति रात्रपासून सुरुवात
Book Your Stay at Hilton Garden Al Mina DubaiBook Your Stay at Hilton Garden Al Mina Dubai
जुमेराह बीच हॉटेलच्या बाबतीत सर्वात प्रकर्षाने आढळणारी पहिली बाब म्हणजे त्याची नेत्रदीपक वास्तुकला. एका कॉर्पोरेट मुख्यालय व एका अंतरिक्ष स्टेशनच्या मधला बिंदू म्हणजे जुमेराह बीच हॉटेल आहे जे लगेच भुवया उंचावायला लावते. आत प्रवेश करा आणि आपल्याला आढळेल की किंमतीचा टॅग त्याला साजेसाच आहे. मनोरंजनात्मक सुविधांची विस्तीर्ण श्रृंखला, आरामदायक वास्तव्य, सेवा व सान्निध्य या बाबी खात्री देतात की येथे सर्वात कल्पनारम्य इच्छांची सुद्धा काळजी घेण्यात आली आहे. मग ते खासगी शुभ्र समुद्रकिनाऱ्यावर मौजमस्ती करणे असेल, टेनिस व स्कॉश कोर्टवर धम्माल करणे असेल किंवा किड्स क्लबमध्ये भिंतीवर चढताना किंवा वॉटर प्ले एरियात वेळ घालवणे असेल, येथे आपल्या मुलांसाठी बरेच काही आहे. तसेच हॉटेलमध्ये एक युथ अॅक्टिव्हिटी सेंटरही आहे जेथे संगीत, विशेष डीजे नाइट्स सारख्या छंदांना चालना मिळू शकते. हॉटेलमधील जेवणाचे 17 पर्याय आपल्या वास्तव्याच्या अनुभवामध्ये आणखीनच भर टाकतात.
ठिकाण: जुमेराह बीच
किंमत: रु. 21,000 प्रति रात्रपासून सुरुवात
Book Your Stay at Jumeirah Beach HotelBook Your Stay at Jumeirah Beach Hotel
Planning a Family Vacay in Dubai? Spruce Up Your Itinerary with These Experiences!
Jyotsana Shekhawat | Feb 15, 2024
5 Theme Parks in Dubai that Are More than a Roller Coaster Ride!
Jyotsana Shekhawat | Feb 15, 2024
Doorway to Unique Experiences: 7 Museums in Dubai to Add to Your Bucket-list!
Jyotsana Shekhawat | Feb 15, 2024
5 Reasons to Visit Dubai During the Holy Month of Ramadan
Jyotsana Shekhawat | Jan 25, 2024
Dubai: The Home of Luxury Experiences
Deah Gulwani | Feb 5, 2024
Snow, Shopping & Carnivals: Top Winter Activities in Dubai
Jyotsana Shekhawat | Dec 5, 2023
Attend the Dubai Shopping Festival this Winter!
Jyotsana Shekhawat | Dec 5, 2023
Top 5 Things to Do in Dubai During Your Stopover
Sayani Chawla | Jun 12, 2023
Encounter MP’s Wildlife Wonders at These Wow Jungle Resorts!
Surangama Banerjee | Mar 3, 2020
Experience Seekers Alert! These 7 Dreamy CGH Earth Resorts Are for You
Surangama Banerjee | Dec 26, 2019
Luxury Hotels in New South Wales that Offer the Best Window Views
Namrata Dhingra | Oct 17, 2019
Your Guide to Enjoying the Best Daycation in Delhi NCR!
Devika Khosla | Mar 17, 2020
Live the Luxe Life with an Experiential Stay at the Postcard Hotels!
Tabassum Varma | Aug 9, 2019
Pick These Unconventional Properties, to Holiday in Goa the Postcard Way!
Sunny Mishra | Aug 21, 2019
Whispering Palms Beach Resort Goa: A Dreamy Beachfront Stay
Surangama Banerjee | May 6, 2019
Top Hotels in Navi Mumbai for a Splendid Stay
Tabassum Varma | Apr 30, 2019