दुबई आपल्या चमचमत्या शॉपिंग मॉल्स, अत्याधुनिक लक्झरी पर्यटन आकर्षणे आणि अर्थातच हार व बांगड्यांनी लखलखत्या सोने व आभूषणांच्या बाजारांकरिता प्रसिद्ध आहे. परंतु यामुळे आपल्याला दडपण घेण्याची गरज नाही. जर आपण आपल्या मर्यादित बजेटमध्ये दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेत असाल आणि या गोष्टींवर पैसा खर्च करताना बचत करण्याचा सुद्धा विचार करीत असाल तर आमच्या 10 मजेदार गोष्टींच्या या यादीवर एक नजर फिरवा. संपूर्ण नि:शुल्क आणि मस्तीने भरलेल्या या गोष्टींमुळे आपली मुळीच निराशा होणार नाही.
झाबील पार्कवरच्या पिकलेल्या फळांच्या आणि हस्तकलेच्या बाजारामध्ये ताजी फळे आणि हस्तकलेच्या वस्तू खरेदी करण्यासोबत स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा फडशा पाडण्याची कल्पना तर चांगलीच आहे, सोबतच तेथील वातावरणामध्ये आणि वस्तूंची सजावट बघत आपण संपूर्ण दिवस सुद्धा घालवू शकता. स्थानिक संगीतकारांद्वारे संगीताचे कार्यक्रम सादर केले जातात जे आपण अगदी मोफत बघू शकता.
ठिकाण: अल कोझ
दुबईचा वारसा आणि संस्कृतीचा नमुना बघण्यासाठी अल शिंदघाकडे प्रयाण करा. प्रवेश नि:शुल्क असलेल्या या ठिकाणी स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या पारंपारिक कलाकृतींचे प्रदर्शन भरवलेले असते. मातीच्या भांड्यापासून विणलेल्या वस्त्रांपर्यंतच्या हस्तकलेच्या वस्तूंचा समावेश असलेले हे प्रदर्शन म्हणजे कलाप्रेमींकरिता पर्वणीच आहे.
ठिकाण: अल शिंदघा परिसर, दुबई खाडीच्या मुखाजवळ
बदायूंच्या सांस्कृतिक वारशाचा उंट हा अविभाज्य भाग आहे आणि वाळवंटाच्या जहाजाविषयी जाणून घेण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे उंट संग्रहालय आहे. इथे फेरफटका मारताना आपल्याला युएईमधील उंटांच्या इतिहासाबद्दल, अरब आणि उंटांमधील नात्याबद्दल, उंटांच्या शर्यतीच्या खेळाबद्दल आणि इतकेच नव्हे तर उंटांच्या शरीररचनेविषयी तपशीलवार माहिती मिळेल.
ठिकाण: अल शिंदघा हेरिटेज व्हिलेज
जर आपण योग किंवा फिटनेस प्रेमी असाल आणि मोफत सराव करायचा असेल तर दुबईमधील पाच जागांवर फ्रेंड्स ऑफ योगा संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या एक तासाच्या मोफत सत्राला हजेरी लावू शकता.
ठिकाण: बुरदुबई क्रीक, डेरा क्रीक, जेएलटी पार्क, झाबील पार्क आणि इंटरनेट सिटी
जर आपल्याला नवीन ज्ञान मिळवण्याचा छंद असेल किंवा आपण भाषाप्रेमी असाल, तर आपण एटन इन्स्टिट्यूटमध्ये मोफत परिचयात्मक अभ्यासक्रमाकरिता व सोबतच मनोरंजनात्मक सांस्कृतिक संध्येकरिता सुद्धा नोंदणी करू शकता. प्रत्येक महिन्यात काय चालले आहे हे माहित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचे मोफत अॅप डाउनलोड करणे आणि नि:शुल्क कार्यक्रमांची माहिती घेणे.
ठिकाण: नॉलेज व्हिलेज
रविवारी संध्याकाळी ताऱ्यांच्या छायेत सिनेमा बघण्याची संधी कुणाला सोडावीशी वाटेल? पूर्णपणे नि:शुल्क असलेले हे सिनेमे रात्री खुल्या आकाशाखाली दाखवले जातात व लोकांना बसण्यासाठी रंगीत बीन बॅग्स ठेवलेल्या असतात.
ठिकाण: वाफी कॉम्प्लेक्स येथील पिरॅमिड रूफटॉप्स कॉम्प्लेक्स
दुबई मॉलच्या कोलोसल दुबई ॲक्वेरिअममधील मत्स्यालयात प्रवेश करण्याचे शुल्क जरी 70 दिरहॅम असले तरी सुद्धा आपण सागरी जीवनाचे विलक्षण दृश्य जगातील सर्वात मोठ्या ॲक्रिलिक पॅनलवर मोफत बघू शकता.
ठिकाण: दुबई ॲक्वेरिअमच्या बाहेर
येथील नृत्य करणारे फवारे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत आणि मजेची गोष्ट म्हणजे हे सुंदर दृश्य बघण्याकरिता आपल्याला काहीच पैसे खर्च करावे लागत नाही. दुबई मॉलवर जा आणि या फवाऱ्यांना संगीताच्या तालावर नृत्य करताना बघा.
ठिकाण: दुबई मॉलच्या बाहेर
दुबईच्या डेरा भागातील जुन्या काळचा पारंपारिक बाजार चोखंदळ खरेदीदारांसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. आपण सोन्याचे आभूषण आणि महाग मसाल्यांच्या खरेदीवर पैसे खर्च करू शकता किंवा या गजबजलेल्या बाजारातून नुसतीच भटकंती करू शकता. येथे आपल्याला फ्रॅन्कीसेन्स आणि पश्मिना शॉलपासून तर सोन्याच्या दागिन्यापर्यंत असंख्य प्रकारच्या वस्तू बघायला मिळतील.
ठिकाण: डेरा बाजार
जर आपल्याला कुस्ती किंवा पहलवानीचा दांडगा खेळ बघणे आवडत असेल, डेरा बाजारच्या मागे असणाऱ्या सँडलॉट येथे जा, तेथे आपल्याला भारत, पाकिस्तान व बांगलादेशमधील कुस्तीपटू आपल्या सन्मानार्थ कुस्ती लढताना दिसतील.
ठिकाण: डेरा
सोने खरेदी करायचे आहे ना? मग आमच्या या यादीचा लाभ घ्या आणि पैशांची बचत करून सोने खरेदी करा.
Book Your Flight from New Delhi To Dubai
Planning a Family Vacay in Dubai? Spruce Up Your Itinerary with These Experiences!
Jyotsana Shekhawat | Feb 15, 2024
5 Theme Parks in Dubai that Are More than a Roller Coaster Ride!
Jyotsana Shekhawat | Feb 15, 2024
Doorway to Unique Experiences: 7 Museums in Dubai to Add to Your Bucket-list!
Jyotsana Shekhawat | Feb 15, 2024
5 Reasons to Visit Dubai During the Holy Month of Ramadan
Jyotsana Shekhawat | Jan 25, 2024
Dubai: The Home of Luxury Experiences
Deah Gulwani | Feb 5, 2024
Snow, Shopping & Carnivals: Top Winter Activities in Dubai
Jyotsana Shekhawat | Dec 5, 2023
Attend the Dubai Shopping Festival this Winter!
Jyotsana Shekhawat | Dec 5, 2023
Top 5 Things to Do in Dubai During Your Stopover
Sayani Chawla | Jun 12, 2023
Unveiled: A Line-up of Exciting Events in Abu Dhabi!
Surangama Banerjee | Jul 3, 2025
5 Off-the-grid Places You Need to Visit with the Oppo Reno14
Tanya Sharma | Jul 2, 2025
Why Oppo Reno14 is the Perfect Travel Companion
Tanya Sharma | Jul 2, 2025
Experience the Wild Heart of Northern Australia: Darwin, Litchfield, and Katherine!
Swechchha Roy | Jun 10, 2025
Experience the Soul-Stirring Treasures of Kakadu National Park
Swechchha Roy | May 26, 2025
Drive, Chip and Putt in UAE’s Capital—Abu Dhabi!
Surangama Banerjee | May 1, 2025
Discover the Spiritual Heart of Australia—Uluru!
Niharika Mathur | May 1, 2025
Embark on a Spicy & Saucy Adventure Through Queensland’s Tastiest Corners!
Surangama Banerjee | Apr 10, 2025