अशा 5 हॉटेलांतील चेक-इन, ज्यामुळे तुमच्या फेसबुक मित्रांना तुमचा हेवा वाटेल/वाटणार नाही!

Ankita Sharma Sukhwani

Last updated: Jun 29, 2017

Author Recommends

See

Madikeri: Abbey Falls, Raja's Seat and Bylakuppe (a Tibetan settlement)
Wayanad: Meenmutty Waterfalls, Pookot Lake, a perfect spot for picnics

Do

Udaipur:Visit City Palace and look out for the world’s largest private collection of crystals
Wayanad: Visit the 300-year-old Varambetta Mosque, old Jain temples and the Pallikunnu Church in Kalpetta

Shop

Upaipur: Camel leather bags and bandhini dupattas at the Bada Bazaar
Goa: At Ingo’s Saturday Night Bazaar for junk jewellery and t-shirts

Filmy

Darjeeling: The song sequence of Kasto Mazza from the Vidya Balan, Sanjay Dutt and Saif Ali Khan starrer Pareneeta was shot on Darjeeling’s toy train.
Udaipur: A song sequence in "Hum Saath Saath Hain" featuring Saif Ali Khan and Karisma Kapoor was shot in Saheliyon Ki Bar

Click

Darjeeling: A selfie with views of the Himalayan expanse at a height of 2,134 metres as a backdrop from the Darjeeling Ropeway

Want To Go ? 
   

रोज तेच तेच जीवन जगण्यात कंटाळा आलाय ना? काहीतरी हटके जीवन जगायचे आहे? चला तर मग, अशा हॉटेलांची सैर करुयात जे ‘पृथ्वीवरील स्वर्गा’पेक्षा कमी नाहीत व ज्यामुळे तुमच्या मित्रांना तुमचा हेवा वाटेल. आणि बरं का, याठिकाणी आल्यावर तुम्ही आपसूकच फेसबुकवर अपडेट कराल!

1. ताज लेक पॅलेस, उदयपुर, राजस्थान

दोन शतकांहून जुने असलेले ताज लेक पॅलेस पिचोला सरोवराच्या मध्यभागी आहे आणि हे जगातील सर्वात रोमँटिक हॉटेलांपैकी एक आहे. तुम्ही सरदार घाटला एका बोटीद्वारा येऊ शकता, जेथे गुलाबाच्या पाकळ्यांनी तुमचे स्वागत होईल आणि एका तारांकित छत्रीसह तुम्हाला या पॅलेसमध्ये सन्मानाने आत नेले जाईल.

taj lake palace udaipur

चमकदार वाइन आणि व्यक्तिगत पातळीवर बनविल्या जाणाऱ्या मेन्यूपासून समर्पित अशा बटलरपर्यंत सर्व सुविधा ताज लेक पॅलेसच्या शालीनतेस दर्शवितात. गणगौर या 150 वर्षे जुन्या बोटीवर भोजनाचा स्वाद घ्या किंवा मेवार टेरेसवर रमणीय असा कॅण्डल लाईट डिनरचा आनंद लुटा. या पॅलेसच्या इतिहासाला समजून घेण्यासाठी एक फेरफटका मारा, पण जेम्स बाँडच्या ऑक्टोपसी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या स्थानावर एक सेल्फी काढण्यास विसरू नका बरं! तसेच, पिचोला सरोवराच्या स्तब्ध पाण्यावर हॉटेलच्या जीवा बोट स्पामध्ये स्वतःला पुनरुज्जीवित देखील करू शकता. हे हॉटेल आदरातिथ्याने पावलोपावली तुम्हाला तुम्ही एक शाही व्यक्ती असल्याचे प्रकर्षाने जाणीव करून देईल.

मूल्य: प्रति रात्र रु. 35,500 पासून सुरुवात.

Read more: Have You Gone Glamping at These Wildlife Resorts in India Yet?

Book Your Stay at Taj Lake Palace, UdaipurBook Your Stay at Taj Lake Palace, Udaipur

2. ग्लेनबर्न टी इस्टेट आणि बुटीक हॉटेल, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल 

दोन नागमोडी वळणाच्या नद्यांच्या सानिध्यात, सुमारे 1000 एकरच्या प्रशस्त खासगी वनराईत वसलेले ग्लेनबर्न खरोखरच सुट्यांचा एक खास अनुभव प्रदान करते. आजूबाजूला चहाचे मळे आणि मध्यभागी वसलेल्या ग्लेनबर्न टी इस्टेट आणि बुटीक हॉटेलची सुरुवात एका स्कॉटिश टी कंपनीने सन 1859 मध्ये केली आहे.

Glenburn Darjeeling

इथे वास्तव्य करीत असताना, तुमच्या आवडीचा चहा कसा बनविला जातो हे शिकण्यासाठी टी एक्स्पीरियन्स घेणे अनिवार्य आहे, फावल्या वेळेत दुपारी मासे पकडण्यासाठी जा किंवा मस्तपैकी रपेट मारा किंवा एखादी भन्नाट पाककृतीही शिकून घ्या. जेव्हा एकदम निवांत वेळ घालवायचा असेल तर एक कप कॉफी हातात घेऊन मावळत्या सूर्याचा निखळ आनंद घ्या, शेकोटीसमोर एक उबदार सायंकाळ घालवा किंवा वाचनाची आवड असल्यास इथल्या भव्य ग्रंथसंपदेतून एखाद्या पुस्तकाचा आनंद लुटा.

मूल्य: प्रति रात्र रु. 36,500 (प्रवास, जेवण, लाँड्री व निसर्गात फेरफटका)

Book Your Stay at Glenburn Tea Estate & Boutique HotelBook Your Stay at Glenburn Tea Estate & Boutique Hotel

3. हिल फोर्ट केसरोली, अलवर, राजस्थान

भारतातील सर्वात जुना किल्ला, हिल फोर्ट केसरोली त्याच्या प्रतिष्ठेप्रमाणेच आलिशान आहे. राजपुतांद्वारा चौदाव्या शतकात बांधला गेलेला हा किल्ला अलवरच्या राजघराण्याचा एक हिस्सा बनण्यापूर्वी त्याच्या जीवनकाळात अनेकदा जिंकला गेला. भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज हॉटेल समजले जाणारे, हिल फोर्ट केसरोली भारताच्या गतकाळाच्या भव्य इतिहासाला जाणून घेण्याची संधी निश्चितच देते.

Hill-Fort-Kesroli-Alwar-Rajasthan

येथील महाल अत्याधुनिक रिसॉर्टच्या सुविधांसह शाही सौंदर्याने रचलेले आहेत. मोहरीच्या शेतांमधून फिरताना रमणीय सूर्यास्ताचा अनुभव घ्या, तुमच्या कुटुंबासह उंटाची सवारी करा किंवा सायंकाळी शेकोटीच्या भोवती लोकनृत्याचा आनंद लुटा.

मूल्य: प्रति रात्र रु. 4,000 पासून सुरुवात.

Read more: A Spa-cation at These Luxury Resorts Will Leave You Oh-So Rejuvenated!

Book Your Stay at Hill Fort KesroliBook Your Stay at Hill Fort Kesroli

4. ताज समूहाचे विवांता, मडिकेरी, कर्नाटक

ताज समूहाचे विवांता 180 एकर वर्षावनाच्या मध्यभागी वसलेले आहे आणि हे कुर्गचे सर्वात मौल्यवान मालमत्तेंपैकी एक आहे. येथे प्रवेश करताच, क्षितिजापर्यंत पसरलेल्या एका अंतहीन पर्वतराजीच्या परीदृश्याने तुमचे स्वागत होते. येथे आल्यावर तुमच्या टेन्शनला मारा गोळी आणि येथील पूलामध्ये पोहोण्याचा आनंद घ्या, मातीची भांडी बनवण्याचा किंवा पाककृती शिकण्याचा प्रयत्न करा किंवा येथेच असलेल्या स्पामध्ये मसाज करवून घेत स्वतःला आरामदायी बनवा आणि तुमचा वेळ मजेत घालवा.

Hill-Fort-Kesroli-Alwar-Rajasthan

साहसी वृत्तीच्या लोकांसाठी हे रिसॉर्ट ऑफ-रोड बाईकिंग, झिपलाईनिंग, हायकिंग आणि गोल्फ यासारख्या गोष्टी उपलब्ध करून देते. तसेच, या हॉटेलात तीन रेस्टॉरंट्स आणि तणावमुक्त होण्यासाठी पूलसाईड बार देखील आहे.

मूल्य: प्रति रात्र रु. 13,500 पासून सुरुवात.

Book Your Stay at Vivanta by Taj, MadikeriBook Your Stay at Vivanta by Taj, Madikeri

5. वायथिरी ट्रीहाउस रिसॉर्ट, वायनाड, केरळ

वायथिरी ट्रीहाउस रिसॉर्ट, एका उष्णकटिबंधीय घनदाट वर्षावनात स्थित, जंगलातील एकदम मध्यभागातील एक उत्कृष्ट हॉटेल आहे. जमिनीपासून 80 फूट उंचावरील एका सुंदर अशा ट्रीहाऊसमध्ये राहताना जंगलातील मोहक अशा ध्वनींचा अभूतपूर्व अनुभव घ्या. या इकोफ्रेंडली रिसॉर्टमध्ये, ऊर्जेच्या स्रोतासाठी ट्रीहाऊस सौर ऊर्जेचा वापर करतात आणि येथे सभोवतालच्या पर्वतराजीतील नैसर्गिक झऱ्यामधल्या पाण्याचा वापर सुंदर आहे.

Vythiri-Treehouse-Resort-Wayanad-Kerala

जर तुम्हाला उंचवट्याची भीती वाटत असेल, तुम्ही प्रवाहाजवळच्या एखाद्या कॉटेजमध्ये मुक्काम करू शकता. याठिकाणी तुम्ही जवळच्या पाण्यात मासेमारीची आपली इच्छा पूर्ण करू शकता किंवा कॅफेकडे येण्यासाठी रोज ब्रिजवरून कसरत करण्याची मजा अनुभवू शकता. अगदी जवळून अद्भुत निसर्गाची मजा लुटण्याचा तुमचा अनुभव सोशल मीडियावर मित्रांसह शेअर करण्यास नक्कीच पात्र असेल!

मूल्य: रु. 18,000 प्रति रात्रपासून सुरुवात (नाश्ता, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासह)

Read more: 4 Treehouse Resorts in India for a Relaxing Stay Amidst Nature

Book Your Stay at Vythiri ResortBook Your Stay at Vythiri Resort