रोड ट्रिप प्लेलिस्टः रोड ट्रिपसाठी भन्नाट हिंदी गाण्यांची यादी खास

Mayank Kumar

Last updated: Jun 27, 2017

तुमच्या बॅगा भरा आणि टाका गाडीच्या डिक्कीत, गाडीच्या खिडकीच्या काचा खेचा खाली, सुरक्षेसाठी असलेला बेल्ट बांधा आणि तुमच्या जीवलगांसह निघा एका आगळ्यावेगळ्या रोड सफारीला. या सफारीत तुमच्या सोबतीला सादर आहे भन्नाट हिंदी गाण्यांची (होय, खरचं) लिस्ट, ज्यामुळे तुमचा प्रवास संगीतमय होईल. मग वाट कसली बघता, दाबा ‘प्ले’ बटन!

दिल चाहता है, टायटल ट्रॅक

दिल चाहता है, कभी न बीतें चमकीले दिन

दिल चाहता है, हम न रहें कभी यारों के बिन

दिन दिन भर हों, प्यारी बातें

झूमें शामें, गाएं रातें

मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा जहां

हमको राहों में यूंही मिलती रहें खुशियां

दिल चाहता है, कभी न बीतें चमकीले दिन

दिल चाहता है, हम न रहें कभी यारों के बिन

जेव्हा तुम्ही खिडकीजवळ बसलेले असाल आणि वार्‍याची झुळुक जेव्हा चेहर्‍याला स्पर्श करते, तेव्हाचा अनुभव, व्वा!!! तुमची सुट्टी सार्थकी लागण्याची सुरुवात झाली हो!

ओ हमदम सुनियो रे, साथिया

साथिया सिनेमाचे हे गाणे, ज्याची ट्यून अतिशय गोड सुमधुर आहे, जी तुम्ही ड्रायव्हिंग करतेवेळी कधीही गुणगुणू शकता.

ख्वाबों के परिंदे, जिंदगी न मिलेगी दोबारा

डे, खुले आसमां में ख्वाबों के परिंदे

डे, दिल के जहां में ख्वाबों के परिंदे

क्या पता, जाएंगे कहां

खुले हैं जो पल, कहे ये नज़र

लगता है अब हैं जागे हम

फिकरें जो थीं, पीछे रह गई

निकले उनसे आगे हम

हवा में बह रही है जिंदगी

ये हमसे कह रही है जिंदगी

अब तो, जो भी हो सो हो

जावेद अख्तर यांचे या गीताचे बोल, खरचं आपल्यात असलेल्या एका प्रवाशास जागे करते आणि त्यामुळेच या गाण्याने आपल्या प्रत्येकाच्या मनात घर केले आहे.

सूरज डूबा है, रॉय

एक फास्ट-बीट असलेले गाणे, जे तुमच्यामध्ये उत्साह निर्माण करते! रॉय सिनेमाचे सूरज डूबा है हे गाणे डान्स नंबर म्हणून रोड ट्रिप प्लेलिस्टमध्ये समाविष्ट होऊन तुम्हाला गाडीमध्येच थिरकायला भाग पाडेल. आणि रोड ट्रिपला जाताना थोडी मस्ती तर हवीचं ना, नाही का! 

आओ मिलो चलो, जब वी मेट

हम जो चलने लगे

चलने लगे हैं ये रास्ते

मंजि से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते

आओ खो जाएं हम

हो जाएं हम यूं लापता

आओ मीलों चलें

जाना कहां, ना हो पता

रोड ट्रिपवरचं चित्रीत झालेलं गाणं, रोड ट्रिपच्या प्लेलिस्टमध्ये नसेल तर मग काही मजाच नाही यार! इम्तियाज अलींच्या जब वी मेटमधील या गाण्यात गीत आणि आदित्य (करीना कपूर आणि शाहिद कपूर) यांचा रतलाम ते भटिंडा व्हाया रोड असा प्रवास चित्रीत आहे.

बुल्लेया, ऐ दिल है मुश्किल

पायांची हालचाल आपोआप नाचण्याच्या प्रकारात बदलणार्‍या या गाण्याने गाडी चालवणार्‍या तुमच्या मित्रालाही डुलकी घेण्यापासून रोखून मजा करायला भाग पाडते. ड्रम आणि इलेक्ट्रॉनिक गिटार यांच्या मिक्स्ड साउंडने तुम्हाला रॉकस्टारसारखा अनुभव नाही दिला तर नवलच! 

फिर से उड चला - रॉकस्टार

किसी मं पर मैं रुका नहीं

कभी खुद से भी मैं मिला नहीं

यह गिला तो है मैं खफा नहीं

शहर एक से गांव एक से

लोग एक से नाम एक ओ ओ

ओ ओ ...

फिर से उ चला

सूर्यास्ताची वेळ आहे, गाडीत मागच्या सीटवर बसलात आणि या रोड ट्रिपदरम्यान तुम्ही विचारमग्न आणि टेंशनमध्ये असाल तर फिर से उड चला (पुन्हा एकदा इम्तियाज अलीच्या रॉकस्टारमधून) प्ले करा, तुमचा मूड बदलणारचं!  

मनमर्जियां आणि जिंदा हूं, लुटेरा

आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी, खोलवर विचारांची ही गाणी प्रत्येकवेळेस ऐकण्यापासून आपण स्वतःला रोखू शकत नाही. त्यामुळे तुमच्या रोड ट्रिप प्लेलिस्टमध्ये ही गाणी आत्ताच समाविष्ट करा!

रूबरू, रंग दे बसंती

धुंआ छंटा खुला गगन मिला

नई डगर नया सफर मेरा

जो बन सकते तू हमसफर मेरा

र मिला रा

रूबरू..

बस गीताचे बोलच पुरेसे आहेत ना!

सोचा है आणि टायटल ट्रॅक, रॉक ऑन!!

या सिनेमाची गाणी रोड ट्रिपसाठीच बनवलेली आहेत, यात काही प्रश्नच नाही! खासकरून या दोन गाण्यांनी तर तुम्ही गाडीच्या खिडकीच्या काचा खाली करून, डोकं बाहेर काढून जोरात गाण्यास सुरू कराल. आणि गाडीला जर सनरूफ असेल तर, दुधात साखरचं!

पश्मीना, फितूर

पश्मीना धागों के संग

कोई आज बुने ख्वाब ऐसे कैसे

वादी में गूंजे कहीं नए सा

ये रवाब ऐसे कैसे

पश्मीना ..

अमित त्रिवेदींचे संगीत आणि स्वानंद किरकिरेंचे गीत, तुमच्या रोड सफारीसाठी एक आदर्श सोबती आहे, यात तीळमात्र शंका नाही!

सफरनामा, तमाशा

इम्तियाज अलींच्या सिनेमातील शेवटचे गाणे, पक्का! खोलवर भाव असणार्‍या ‘जिसे ढूंढा जमाने में, मुझ ही में था मेरे सारे जवाबों का सफरनामा’ हे गाणे तुमच्या हृदयाच्या तारा छेडल्याशिवाय राहणार नाही.

व्रूम! रोड ट्रिप गाण्यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आमच्याकडून काही राहिले तर नाही? आत्ताच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा!