लहानग्यांच्या मौजमस्तीसाठीची श्रीलंकेमधील 5 रिसॉर्ट्स

Mikhil Rialch

Last updated: Jun 28, 2017

Want To Go ? 
   

लोकप्रिय पर्यटन स्थळाच्या स्वरूपात श्रीलंकेची प्रतिष्ठा वर्षागणिक वाढतच आहे, ज्यामध्ये त्याच्या प्राचीन समुद्रकिनाऱ्यांचा, आधुनिक सुविधांना आत्मसात केलेल्या समृद्ध संस्कृतीचा आणि अगत्यशील व शांतचित्त नागरिकांचा लक्षणीय सहभाग दिसून येतो. भारत व श्रीलंका यातील अंतर जास्त नसल्याने आणि एक किफायतशीर पर्यटन स्थळ असल्याने त्याचे आकर्षण आणखीनच वृद्धिंगत होत आहे.

श्रीलंकेत असाल तेव्हा मुलांना आवडतील अशा 5 रिसॉर्टची माहिती येथे देत आहोत.

सिनामोन ग्रँड हाँटेल

Cinnamon-Grand-hotels-in-sri-lanka

सिनामोन ग्रँड हॉटेल मुलांसोबत आलेल्या कुटुंबांना विस्तृत श्रेणीच्या मनोरंजनात्मक सुविधा प्रस्तुत करत आहे. हॉटेलमध्ये दोन भव्य आउटडोअर स्विमिंग पूल व एक स्कॉश व टेनिस कोर्ट आहे जे लहान मुलांना व्यस्त ठेवतात. याव्यतिरिक्त येथे पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी लाउंजेस, खेळ व क्रीडा क्षेत्र व एक इन-हाउस स्पा आहे आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी आपल्या वाहतूक सुविधेची व्यवस्था करण्यास स्वागतकक्ष तत्पर आहे. दी लगून आणि दी टाप्रोबेन रेस्टॉरंट यासारखे 24 तास सेवा प्रदान करणारे रेस्टॉरंट स्थानिक व आंतरराष्ट्रीय पदार्थ सादर करतात तर दी लंडन ग्रील आणि इको आपल्याला क्षेत्रीय युरोपियन चवीचा नजराणा पेश करतात. हॉटेलचे मध्यवर्ती स्थान म्हणजे पर्यटकांसाठी आणखी फायदेशीर आहे. हे हॉटेल श्रीलंका राष्ट्रीय संग्रहालय, कोलंबो टाउनहॉल आणि दी क्रेस्टकॅट बोलव्हर्ड शॉपिंग मॉल यापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. तसेच आपल्याला खरेदी करण्यासाठी फार दूर जाण्याची गरजच भासत नाही कारण सिनामोन ग्रँडच्या परिसरातच विशाल शॉपिंग आर्केड आहे.

स्थान: 77 गॅले रोड, कोल्लूपिटिया, 00100 कोलंबो, श्रीलंका

प्रत्येकी रात्रीची किंमत: रू. 10,000 प्रति रात्र

Book Your Stay at Cinnamon Grand Hotel

सिनामोन लेकसाइड

Cinnamon-Lakeside-hotels-in-sri-lanka

कोलंबोमधील सर्वोत्कृष्ट पंचतारांकीत मालमत्तेच्या स्वरूपात सर्वदूर प्रसिद्ध असलेले सिनामोन लेकसाइड आपल्या सर्व 346 खोल्यांद्वारे लक्झरी रचना, आरामदायकता आणि चांगल्या चवीद्वारे अत्युच्च गुणवत्तेचा सुरेख संगम सादर करते. कोलंबो शहरातील सर्वात मोठ्या स्विमिंग पूलने सुसज्ज असलेले सिनामोन लेकसाइडमध्ये मनोरंजनाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत जसे की तीन क्ले टेनिस कोर्ट व दोन वातानुकूलित स्कॉश कोर्ट जेथे लहान मुले आपल्या रॅकेटचे कौशल्य आजमावू शकतील. मुलांकरीता खेळण्याची जागा, व्हिडिओ आणि बोर्ड गेम, निसर्ग पदयात्रा आणि वन्यजीव भ्रमण, पूलसाइड बार्बेक्यू आणि रिसॉर्टच्या देखरेखीत महासागराचे आतून निरीक्षण करण्याचा अनुभव घेण्याकरीता मुलांसाठी अॅक्वा लाउंज यासारख्या इतर बऱ्याच बहुमूल्य सुविधा हॉटेल सादर करीत आहे. इतर आकर्षणांमध्ये सामिल आहे जेवणाच्या नऊ प्रकारांची भव्यदिव्य मालिका, एक इनडोअर स्पा, प्रवास व स्थळदर्शन सेवा व संध्याकाळच्या जेवणासाठी नेत्रदीपक टेरेस. सिनामोन लेकसाइडचे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती जागी असल्याने प्रवासाचा वेळ वाचवू बघणाऱ्या कुटुंबांचे हे एक अतिशय आवडते हॉटेल आहे.

स्थान: 115, सर चित्तमपालम ए, गार्डिनर मवाथा, फोर्ट, 00100 कोलंबो, श्रीलंका

प्रत्येकी रात्रीची किंमत: रु. 10,000 प्रति रात्र

Book Your Stay at Cinnamon Lakeside

सेंटरा सेसँड्स रिसॉर्ट आणि स्पा      

Centara-Ceysands-Resort-&-Spa-hotels-in-sri-lanka

अतिशय लोकप्रिय बेंटोटा बीचपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले समुद्रकिनाऱ्यावरील पंचतारांकीत रिसॉर्ट सेंटरा सेसँड्स रिसॉर्ट आणि स्पा हे लहान मुले असलेल्या कुटुंबासाठी एक परिपूर्ण अशी निवड आहे. सुविधांच्या संदर्भात, हे हॉटेल विशिष्ट मुलांकरीता असलेल्या पुलसहित स्विमिंग पूल, स्पा, जाकुझी, हेल्थ क्लब आणि किड्स क्लब या सुविधा सादर करीत आहे. इथल्या 156 खोल्या पाहुण्यांच्या सोयीसाठी रचनात्मक डिझाइन्स आणि अत्याधुनिक सुविधांनी सजलेल्या आहेत. इन-हाउस भोजनकक्षाच्या परिसरामध्ये विशेषत: लहान मुले आपल्या डोळ्यांदेखत खाद्यपदार्थ बनतानाचा बघण्याचा आनंद घेऊ शकतात व सोबतच रेस्टॉरंटमधील अनेक पाककृतींचा आस्वादही घेऊ शकतात.

स्थान: अलुथगामा, 00500 बेंटोटा, श्रीलंका

प्रत्येकी रात्रीची किंमत: रु. 14,000 प्रति रात्र

Book Your Stay at Centara Ceysands Resort & Spa

अनंतारा कालुतारा रिसॉर्ट

Anantara-Kalutara-Resort-hotels-in-sri-lanka

उष्णकटिबंधीय स्वर्ग ज्यालाच रिसॉर्ट असेच संबोधले जाते त्या ऐतिहासिक नगर कालुतारा येथे वसलेले हे हॉटेल सर्वोत्तम सेवा व सुविधांनी सुसज्जित आहे ज्याद्वारे येथे येणाऱ्या पाहुण्यांना आदरातिथ्याचा अविस्मरणीय असा अनुभव घेता येतो. विशेषत: लहान मुलांसाठी येथे स्विमिंग पूल, किड्स अॅडव्हेंचर क्लब्स, वॉटर स्पोर्टचे उपक्रम आहेत व सोबतच अद्ययावत ग्रंथालय, पाककलेचे अभ्यासवर्ग व नियोजित सहली इत्यादी आकर्षणेही आहेत. निवास व आदरातिथ्याच्या अत्युच्च दर्जामुळे अनंतारा कालुतारा रिसॉर्टमधील वास्तव्य आदर्शवत बनलेले आहे.

स्थान: सेंट सेबॅस्टिअन रोड, कालुतारा 12000, श्रीलंका

प्रत्येकी रात्रीची किंमत: रु. 15,000 प्रति रात्र

Book Your Stay at Anantara Kalutara

शांग्री ला हम्बनटोटा रिसॉर्ट आणि स्पा

Shangri-La-Hambantota-Resort-&-Spa-hotels-in-sri-lanka

श्रीलंकेच्या प्राचीन दक्षिणी समुद्रकिनाऱ्यावर स्थित शांग्रीला हम्बनटोटा रिसॉर्ट आणि स्पा हे वन्यजीवनाने समृद्ध हम्बनटोटा क्षेत्रामध्ये वसलेले आहे. निसर्गाच्या पुढ्यात वसलेल्या शांग्री ला हम्बनटोटा रिसॉर्ट आणि स्पामध्ये 300 खोल्या आणि 21 लक्झरी सूट्ससमवेत आपल्या लहानग्यांकरीता बरेच काही आहे. रिसॉर्ट कुल झोन किड्स क्लबचे घर आहे ज्यामध्ये साहसी खेळ व आउटडोअर वॉटर पार्कपासून ड्रोन उडवण्याकरीता क्षेत्र, मुलांचा स्विमिंग पूल आणि चाइल्डकेअर सुविधांसह सर्वकाही आहे जेणेकरून पालकांना आपल्या बहुमूल्य सुट्टीचा पुरेपूर आनंद उपभोगता येईल. तसेच बरेच रेस्टॉरंट व कॅफे पाहुण्यांसाठी आंतरराष्ट्रीय व तसेच प्रादेशिक पाककृती सादर करण्यास उत्सुक आहेत.

स्थान: सिट्रकला इस्टेट चित्रकला, अंबलनटोटा, हम्बनटोटा, श्रीलंका

प्रत्येकी रात्रीची किंमत: रु. 13,000 प्रति रात्र

तर श्रीलंकेच्या आपल्या पुढील सुट्टीसाठी आपण यापैकी कुठल्या उत्कृष्ट रिसॉर्ट्सची निवड करणार आहात?

More Travel Inspiration For Colombo