खास हनिमूनसाठी असलेली युरोपमधील खास हॉटेल्स

Chandana Banerjee

Last updated: Jun 27, 2017

Want To Go ? 
   

वेनिसमधील रोमँटिक गोंडोला राईडवर जा, स्वित्झर्लंडमध्ये राज-सिमरनसारख्या जोडीप्रमाणे आनंद घ्या, लंडन आयवरील तुमच्या खासगी कॅप्स्यूलमधून लंडनची क्षितिजरेखा न्याहाळा किंवा प्रागमधील एका ऑपेरामधून मोझार्टप्रमाणे ऐटीत उतरा. तुमच्या प्राणप्रियसोबत आनंद घेण्यासाठी युरोपमध्ये खूप काही आहे. आणि दुधात साखर म्हणजे, आम्ही तुमच्या खास व्यक्तीबरोबर तुमच्या सुट्या आणखी मोहक बनविण्यासाठी काही खास हॉटेल्स निवडली आहेत.   

हॉटेल नेरुडा, प्रॉग 

hotel-neruda-prague

प्राचीन आकर्षकता आणि आधुनिक सुंदरता यांचे मिलन झाल्यास तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्याचे उत्तर आहे प्रॉगमधील हॉटेल नेरुडा, जे आकर्षक, समकालीन आणि त्याहूनही अधिक असे आहे. आरामदायक आणि आजकालच्या पर्यटकासाठी गरजेच्या असलेल्या सर्व सुविधांनी सुसज्ज असे हे स्थान नेरुडा, प्रॉग कॅसलपासून काही पावलांच्या अंतरावर आहे. स्वादिष्ट असा मोफत नाश्ता, जोडप्यांसाठी थक्क करायला लावणारे स्वागत, सोना बाथ,  व्हर्लपूल आणि मसाज यासारख्या सुविधा, आणि त्यांच्या विशेष अशा गरमा-गरम चॉकलेटचा आस्वाद घेण्याची आणि घरगुती बनावटीचे चवदार पदार्थ चाखण्याची असीम संधी असलेले हॉटेल नेरुडा तुमच्या हनिमूनच्या काळातील निवासाला अविस्मरणीय बनवेल.

मूल्य: प्रति रात्र रु. 3,580 पासून सुरुवात

स्थान: नेरुडोवा 44, 118 00 प्रॉग 1, चेक रिपब्लिक

Book Your Stay at Hotel Neruda

दी टायटॅनिक शुसी, बर्लिन 

Titanic-Chaussee-Berlin

 

टायटन हॉटेल्स हे हॉटेल विश्वातील असाधारण आणि अलिशान मालमत्ता असलेली हॉटेल्सपैकी एक आहे. जर तुम्ही बर्लिनमध्ये हनिमून साजरा करत असल्यास, तर शहराच्या मध्यभागी आणि मुख्य ट्रेन स्टेशनच्या एकदम जवळ असलेल्या टायटॅनिक शुसीमध्ये मुक्काम करणे तुम्हाला निश्चितच आवडेल. हॅम्बर्गर बानहूफ या आधुनिक कला वस्तुसंग्रहालयापासून थोड्या अंतरावर आणि सुंदर वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध असलेल्या हॅकेशेर मार्क्ट या गजबजलेल्या परिसराच्या कोपऱ्यावर असलेले हे हॉटेल धुंद अशा पार्ट्या आणि उत्कृष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध असून, तुमच्या हनिमूनच्या प्रवासात भरपूर मौजमजा करण्यासाठी हे अगदी समर्पक आहे. म्हणजेच, तुम्ही टायटॅनिक शुसीमध्ये आरामदायक सुट्टी घालवू शकता. स्वास्थ्य आणि तंदुरुस्तीसाठी स्पोर्ट्स आणि स्पामध्ये जाऊन पाहा; त्यांच्या स्वतःच्या रेस्टॉरंटमधील भूमध्यसमुद्री पदार्थांचे नमुने चाखा; किंवा सुंदर व प्रशस्त खोल्यांमध्ये आपल्या लाडक्या व्यक्तीसोबत वेळ व्यतीत करा.  

मूल्य: प्रति रात्र रु. 12,804 पासून सुरुवात

स्थान: शुसीस्ट्रासा 30, 10115 बर्लिन, जर्मनी  

Book Your Stay at Titanic Chaussee

स्प्लेंडिड वेनिस, स्टार हॉटेल्स, वेनिस  

Splendid-Venice-Star-Hotels-Venice

वेनिसचा मतितार्थ आणि आलिशानता यांचा संगम असलेले स्प्लेंडिड वेनिस तुमच्या हनिमूनसाठी अत्यंत सुखमय ठरणारे एक ठिकाण आहे. शहराच्या विलक्षण सौंदर्याचे दर्शन करविणाऱ्या, 165 खोल्या असलेले आणि स्वतःचेच रेस्टॉरंट असलेले हे हॉटेल इटालियन लज्जतदार भोजनासाठी सुप्रसिद्ध आहे. सोबत, नजीकच असलेले गोंडोला ड्रिफ्ट आणि नयनरम्य देखावा असलेले आणि रियाल्टो ब्रिज व सॅन मार्को स्क्वेअरपासून केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले हे हॉटेल प्रेमी जोडप्यांसाठी एकदम समर्पक आहे. हनिमूनसाठी हे हॉटेल तर तुम्ही बुक करालच पण बुक करताना जोडप्यांसाठी असलेल्या खास ऑफर्सकडे अवश्य लक्ष द्या.

मूल्य: प्रति रात्र रु. 10,443 पासून सुरुवात

स्थान: सॅन मार्को मर्सरी, 760, 30124 वेनेझिया, इटालिया  

Book Your Stay at Splendid Venice

दी मे फेअर हॉटेल, लंडन 

The-May-Fair-Hotel-London

फारशा दिखाऊपणाशिवाय भव्यता आणि ऐश्वर्य यांचा संगम असणारे एकमेव हॉटेल म्हणजे दी मे फेअर. लंडनच्या मध्यभागी वसलेले हे सुप्रसिद्ध बुटिक हॉटेल, तुमच्या हनिमूनसाठी वाजवी दर आणि वैभवशाली निवासाची इच्छा पूर्ण करण्यास एकदम सक्षम आहे. सायंकाळी थोडे धुंद होण्यासाठी मे फेअर बारच्या दिशेत पावले वळवा, जेथे तुमच्यासाठी लंडनमधील सर्वोत्कृष्ट मिक्सोलॉजिस्ट्स द्वारा बनविलेली चवदार पेये हजर असतील. तसेच, तुम्ही खासगी भोजन कक्षात एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटू शकता आणि मे फेअर स्पामध्ये स्वतःला पुनरुज्जीवित करू शकता.

मूल्य: प्रति रात्र रु. 18,607 पासून सुरुवात

स्थान: स्ट्रॅटॉन स्ट्रीट, लंडन, W1J 8LT, युनायटेड किंगडम  

Book Your Stay at May Fair Hotel

मेलिया अतेनस, अथेन्स

Melia-Atenas

हे ‘ऑलिम्पस ऑफ द मॉर्टल्स’ 9व्या मजल्यावर स्थित एक अत्याधुनिक हॉटेल आहे, ज्यातून अथेन्समधील अॅक्रोपॉलिस आणि लायकाबेटस ही नयनरम्य पर्वते नजरेस येतात. जर तुम्हाला अतिविशेष असा ग्रीक हनिमून साजरा करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही जागा एकदम योग्य असेल. अत्यंत जवळ नॅशनल आर्कियालॉजिकल म्युझियम आणि ग्रीक पार्लमेंट असलेले मेलिया अतेनसमध्ये एका आरामदायक निवासासाठी जरुरी असलेल्या सर्व सुविधांनी युक्त सुरेख खोल्या आहेत, सोबत बाष्पस्नानासह एक हेल्थ क्लब, टेरेसवर स्विमिंग पूल आणि बहुविध पदार्थांनी सुसज्ज रेस्टॉरंट आपल्या सेवेस हजर आहे. जर तुम्हाला या शहरामध्ये काही वेळ घालवायचा असेल, तर या हॉटेलमध्ये शहरातील काही उत्तम कार्यक्रमांसाठी तिकिटे बुक करण्याची किंवा अथेन्समधील इतर रेस्टॉरंटमध्ये तुमच्यासाठी आरक्षणाची सुविधा आहे.

मूल्य: प्रति रात्र रु. 5,307 पासून सुरुवात

स्थान: 14 चाल्कोकोंडिली आणि 28 ऑक्टोबर एव्ह, अथेन्स

Book Your Stay at Melia Atenas

​एच10 हॉटेल्स, बार्सिलोना

H10-Hotels-Barcelona

हे हॉटेल बार्सिलोनाच्या एकदम मध्यभागी वसलेले आहे, जे तुम्ही तुमच्या जीवनसाथीसह एखाद्या उत्तम स्थानी भेट देण्यासाठी एकदम आदर्श निवड आहे. 9व्या मजल्यावर स्थित असलेले हे हॉटेल एका हॉटेलमध्ये बदललेल्या 19व्या शतकातील इमारतीमध्ये वसलेले आहे. ही इमारत आधुनिक वास्तुशिल्प आणि सद्यकालीन आकर्षक अंतर्गत कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. एच10 हे गोथिक क्वार्टर, पॅसिग डी ग्रेशिया आणि प्लासा कॅटालुनियाच्या जवळ असल्याने शहरातील सौंदर्य निहाळण्यासाठी एकदम उचित स्थान आहे. आणखी काय हवे, जर सोबत असतील आरामदायी खोल्या, शहराचे सुरेख दर्शन आणि सायंकाळी मनोरंजनासाठी पुरेसा साठा असलेले बार यांची सोय!   

मूल्य: प्रति रात्र रु. 5,308 पासून सुरुवात

स्थान: रोन्डा युनिव्हर्सिटॅट, 21, ई-08007-बार्सिलोना सेंटर-बार्सिलोना

Book Your Stay at H10 Hotel

मग, युरोपमधील काही सर्वोत्कृष्ट हॉटेलांची यादी हातात असल्याने, तुमच्या हनिमूनसाठी प्लॅन करण्यास व तुमच्या खास व्यक्तीसोबत वेळेचा आनंद लुटण्यास तुम्ही सज्ज असाल, नाही का!

More Travel Inspiration For Prague