फायदेशीर हॉटेल बुकिंगसाठीच्या महत्त्वाच्या 5 टिप्स

Mikhil Rialch

Last updated: Jun 16, 2017

प्रथम हे लक्षात घ्या की चुकीच्या हॉटेल बुकिंगमुळे आपल्या सुट्ट्या वाया घालवणे कसे टाळावे यापेक्षाही अधिक काही गोष्टी या लेखामध्ये सांगितलेल्या आहेत. जर या लेखाचे फक्त दोन शब्दात वर्णन करायचे झाले तर मी म्हणेन की हा लेख ‘कृतीशील असण्याविषयी’ आहे. अनुभवाअंती असे आढळून आले आहे की हॉटेल बुकिंगच्या संदर्भात आपण काय केले यापेक्षा आपण काय केले नाही ही बाब आपली पश्चातापाची यादी वाढवते.

लांब कंटाळवाणी फ्लाईट किंवा अवघडलेल्या कार प्रवासाच्या उलट हॉटेलमधील वास्तव्य ही अशी बाब आहे जी आपल्या वास्तव्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला सहन करावी लागते. बऱ्याचशा अविस्मरणीय होऊ शकणाऱ्या सहली हॉटेलच्या वाईट अनुभवांमुळे बिघडलेल्या आहेत. खरच सांगतो की आपल्या पुढील सुट्ट्यांच्या वेळेस असे काही घडणे आपल्याला अपेक्षित नसेलच. त्यामुळे, हॉटेल बुकिंगमधून जास्तीत जास्त फायदे मिळवण्याच्या या 5 टिप्सबद्दल जाणून घेऊया.

ठिकाण, ठिकाण, ठिकाण

hotel-booking-tips

लक्षात ठेवा, जेव्हा गोष्ट ठिकाण निवडण्याची असते तेव्हा आपण काळजी घ्यायलाच हवी. आपल्या सहलीदरम्यान आपल्या प्रवासाच्या योजनेची जर आपल्याला उत्तम कल्पना असेल तर आपला मुक्काम कुठे असावा हे ठरवण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत मिळते. नकाशावर काही वेळ घालवा – यामुळे बराच फायदाही होतो आणि प्रवासाच्या मार्गाचे नियोजन करण्यामध्ये मजासुद्धा येते.

मात्र आपण भेट देणार असलेल्या लोकप्रिय ठिकाणांच्या अगदी सान्निध्यात असलेले हॉटेल आपण बुक केल्यानंतर पुढे काय? असे गृहित धरूया की आपण अगदीच अनोळखी जागी जाणार आहात किंवा अशा देशामध्ये जेथे आपली भाषा किंवा इंग्रजीसुद्धा फारशी कुणी बोलत नसेल. कदाचित टॅक्सी ड्रायव्हरला आपले हॉटेल कुठे आहे ते माहिती असेल किंवा कदाचित नसेलही. त्यामुळे धोका पत्करू नका. हॉटेलचा नकाशा आपल्याजवळ असणे केव्हाही उत्तमच, विशेषत: जर हॉटेलतर्फे आपल्याला पिक-अप सेवा उपलब्ध नसेल तर.

सर्वप्रथम सुरक्षा महत्वाची

रिसेप्शनवर पेमेंट करण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेले आहेत. अशा सर्व बुकिंग वेबसाईट, क्रेडिट कार्ड ही साधनेच आता हॉटेल बुक करण्याचे पर्याय झालेले आहेत. तसे बघता ही सर्व प्रक्रिया सुविधाजनक आणि कटकटींपासून मुक्त आहे परंतु आपले प्रवासी स्वाईप करण्याच्या बाबतीत साशंक असण्याचेही कारणे आहेतच.

इंटरनेटवरील भरमसाठ वेबसाईट्समुळे कुठली प्रामाणिक आहे आणि कुठली आपली फसवणूक करण्याची संधी शोधत आहे हे कुणीच सांगू शकणार नाही. जर आपल्याला अशी एखादी ऑफर मिळाली जी अतिशय आकर्षक भासत असते परंतु ती तशी नसते. पेमेंटच्या सुरक्षित व्यवहारांकरीता आपण वेबसाईट तपासून बघण्याची काळजी घ्या, त्यासाठी साधारणपणे वेबसाईटची मार्किंग बघून खात्री करता येईल. अधिकांश प्रतिष्ठित बँका व क्रेडिट कंपन्या ग्राहकांचे व्यवहार प्रमाणीकृत करण्यासाठी एनक्रिप्टेड सॉफ्टवेअरचा वापर करतात. शंका असल्यास संबंधित हॉटेलला कॉल करा आणि ज्या व्हेंडरद्वारे आपण बुकिंग करीत आहात तो वैध असल्याची खात्री करून घ्या. आपल्या बँकेचा तपशील सुरक्षित राखण्यासाठी अतिरिक्त काळजी घेण्यात काहीच हरकत नाही.

वेळच सर्वकाही आहे

hotel-booking-tips

सणासुदीच्या हंगामात आणि प्रादेशिक उत्सवांदरम्यान हॉटेलमध्ये खोल्या बुक करण्याची गर्दी जास्त असते, याचा परिणाम म्हणजे संधीचा फायदा घेऊन नफा वाढवण्यासाठी हॉटेल आपले दर वाढवतात. यातील खोच म्हणजे बुकिंग केव्हा करायची याबद्दल जर आपण चाणाक्ष असलात तर बहुधा हॉटेलच्या प्री-बुकिंगमध्ये आपल्याला उत्तम डील मिळू शकते. अनेक रिवार्ड प्रोग्राम्स सुद्धा आहेत जे आपल्या डीलला आणखीनच लाभदायक बनवतात.

नेहमी हंगामी ऑफर्सच्या शोधात राहा आणि आपल्या निर्णयक्षमतेचा त्वरित वापर करा कारण की या ऑफर्स लवकरच संपत असतात. बरीच हॉटेल्स पूर्व-निर्धारित दरांवर त्यांच्यासोबत बुकिंग करण्यासाठी आपल्याला मोफत ब्रेकफास्ट किंवा मोफत वाय-फाय सुविधा ऑफर करतात. त्यांच्या उताविळेपणाचा फायदा घ्या आणि स्वत:करीता उत्कृष्ट डील मिळवा.

नेहमी जे सूक्ष्म अक्षरांमध्ये लिहलेले आहे ते वाचा

hotel-booking-tips

आपण अशा एखाद्या हॉटेलची बुकिंग केली आहे का जे लॉयल्टी बोनस ऑफर करीत आहे? जर आपण थर्ड-पार्टी वेबसाईटद्वारे बुकिंग केली असेल तरी ते लागू आहे का? आपण अदा केलेल्या खोली भाड्यामध्ये मोफत ब्रेकफास्ट किंवा मोफत पिक-अप सेवा सामिल आहे का? हॉटेलचे कॅन्सलेशन धोरण काय आहे?

आपल्या काही “अटीं”साठी हॉटेल सूक्ष्म फाँट का वापरतात यामागे कारण आहे. ही वस्तुस्थिती आहे की आपण जे करणार आहात त्याबद्दल जर आपल्याला पुरेशी माहिती नसेल तर आपली मदत कुणीच करू शकणार नाही. हॉटेलच्या डीलविषयी माहिती मिळवण्याचा एक खात्रीशीर मार्ग म्हणजे ग्राहकांच्या प्रतिक्रिया तपासणे हा आहे. बरेचशे ग्राहक त्यांना मिळालेल्या मोफत सुविधांचे वर्णन करतात किंवा त्यांना हॉटेलमध्ये आलेल्या वाईट अनुभवांबद्दल लिहतात ज्यामुळे आपल्यासाठी काय परिस्थिती उत्पन्न होणार आहे याची आपल्याला कल्पना मिळू शकते.

थोडक्यात सांगायचे तर आपले संशोधन चोख करा.

विचारण्यास अजिबात संकोच करू नका

आपल्यापैकी बरेचजण मान्य करतील की आपण बरेच प्रश्न विचारण्याबाबत किंचित धास्तावलेले असतो.

मात्र जेव्हा एक चांगले हॉटेल बुक करण्याची गोष्ट असते तेव्हा हवे ते विचारणे (किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये मागणे) हाच एकमात्र सर्वोत्तम उपाय आहे. अधिकांश हॉटेल्सना ग्राहकांनी पुन्हा त्यांच्याकडे यायला हवे असते आणि आपल्याला हे माहित झाल्यावर आश्चर्य वाटेल की आपल्या पुढील भेटीच्या वेळी आपण त्यांचीच निवड करण्याकरीता ते कुठपर्यंत जायला तयार असतात. रिसेप्शन मॅनेजर सोबत फक्त विनम्रतेने बोलले तरीसुद्धा मोठा फरक पडतो, मग ते रेस्टॉरंटमध्ये सवलत मिळवणे असो किंवा स्पा ला एक मोफत भेट देणे असो. याला असे समजा की न विचारल्याने आपला तसाही काही फायदा होणार नाहीच आहे, सोबतच काही कर्मचाऱ्यांनाही आपण आपले मित्र बनवू शकता!

आशा आहे की या टीप्स लक्षात ठेवून आपण आपल्याला हवी तशी हॉटेल डील आपल्या पदरात पाडून घेऊ शकाल. एक ग्रेट हॉटेल बुकिंग कसे करावे याविषयी जर आपल्याजवळ आणखी काही नामी सल्ले असतील तर आम्हाला अवश्य कळवा.