‘बच्चापार्टी’साठी खास अशी सिंगापूरमधील 10 हॉटेल्स

Chandana Banerjee

Last updated: Jun 15, 2017

Want To Go ? 
   

खरेदी करण्यासाठी भरपूर दुकाने, रोचक वस्तुसंग्रहालये, मनोरंजन उद्याने आणि निवडण्यासाठी खिशाला परवडण्याजोगी बरीच हॉटेल्स, यामुळे जर सिंगापूर मुलांसह कुटुंबांना सुट्यांसाठी एक आवडते ठिकाण बनत असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मग, जर तुम्ही सिंगापूरसाठी तिकिटे बुक केली असतील व राहण्यासाठी कोणते हॉटेल निवडायचे याचा विचार करत असाल, तर मुलांना आवडतील अशा या शहरातील सर्वोत्तम हॉटेल्सची यादी येथे देत आहोत.

ऑर्चर्ड हॉटेल

मॉल्सना भेटी देण्याच्या, म्युझियम किंवा तुमच्या मुलांसाठी मनोरंजन पार्कचा आनंद लुटायच्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, सिंगापूरच्या शॉपिंग आणि मनोरंजनयुक्त जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातील हे 4-स्टार ऑर्चर्ड हॉटेलमधील वास्तव्य एकदम समर्पक ठरेल. जर तुम्हाला काही खासगी वेळ आरामात, आशियाई शैलीच्या खोलीमध्ये घालवायचा असेल, तर अतिरिक्त पैसे देऊन एक बेबीसीटर बोलावू शकता. मग, तुमच्या छोट्या मुलांची काळजी घेतली जाईल आणि तुम्ही फिटनेस सेंटरमध्ये व्यायाम करू शकाल, तलावात एखादी डुबकी मारू शकाल किंवा अवतीभोवती सहज हिंडू शकाल. हे हॉटेल मुलांसाठी मोफत पॅक देऊ करते, ज्यात ड्रॉइंग बुक्स, क्रेयॉन्स आणि विशेष स्नानाची उपसाधने असतील जी मुलांना व्यस्त ठेवू शकतील. तसेच हे हॉटेल अशा लोकांना ज्यांना त्यांच्या मुलांना झोपण्याच्या पेहरावातच जेवण करण्याची सवय असते, अशांसाठी खोलीतच जेवणाची व्यवस्था करण्याचीही सुविधा देते.

मूल्य: प्रति रात्र रु. 10,512 पासून सुरुवात  

स्थान: 442 ऑर्चर्ड रोड, सिंगापूर, 238879, सिंगापूर

Book Your Stay at Orchard HotelBook Your Stay at Orchard Hotel

फ्युरामा रिव्हरफ्रंट

Furama-riverfront

खास करून तुम्ही जर मुलांसह प्रवास करत असाल, तर चायनाटाऊन आणि ऑर्चर्ड रोड यांच्या दरम्यान वसलेले फ्युरामा रिव्हरफ्रंट सिंगापूर हे हॉटेल अतिशय उत्तम निवड सिद्ध होईल. हॉटेलमध्ये नित्याच्या सर्व सुविधा असताना, यातील फॅमिली रुम आणि थीम रुम या जागेस अत्यंत रोचक बनवितात. बंक-बेड्स आणि एक्सबॉक्स कन्सोल अशा मुलांसाठी सुविधा, छोट्यांसह बसून चित्रपट पाहण्यासाठी किंवा पूलवर काही वेळ घालविण्यासाठी या रंगीत खोल्या सुट्यांचा आनंद द्विगुणीत करतील. मुलांसाठी खेळण्याची देखील जागा आहे, जेथे छोटी मुले कार्टून पाहू शकतील, कागदांवर चित्रे काढू शकतील किंवा खेळण्यांबरोबर खेळू शकतील आणि तुम्ही शांतपणे तिथेच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण करू शकाल.

मूल्य: प्रति रात्र रु. 8,136 पासून सुरुवात  

स्थान: 405 हॅवलॉक रोड, सिंगापूर, 169633

Book Your Stay at Furama RiverfrontBook Your Stay at Furama Riverfront

पेराक हॉटेल

कुशलतेने सुशोभित केलेले पेराक हॉटेल हे सिंगापूरमधील एक सर्वात किफायती हॉटेल समजले जाते. ते लिटल इंडियामधील पुनःस्थापित अशा सुंदर जागेमध्ये वसलेले आहे. पाहुण्यांसाठी 35 आकर्षक खोल्या असलेल्या या हॉटेलात 5 वर्षाखालील मुलांसाठी मुळीच शुल्क घेतले जात नाही आणि हे हॉटेल सिंगापूरमधील एका सर्वात मोठ्या, बगीस जंक्शन या मॉलपासून केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. तसेच मुस्तफा सेंटर आणि सिटी स्क्वेअर मॉल यांचे सानिध्यही यातील रहिवाशांना मनोरंजन आणि खरेदीचा आनंद देते.

मूल्य: प्रति रात्र रु. 3,711 पासून सुरुवात  

स्थान: 12 पेराक रोड, सिंगापूर, 208133

Book Your Stay at Perak HotelBook Your Stay at Perak Hotel

हॉटेल 81 डिकसन 

hotel-81-dickson

खिसा जपणाऱ्यांसाठी एका किफायतशीर किमतीत आरामदायक वास्तव्यासाठी सुपरिचित असलेले लिटल इंडियामधील हॉटेल 81 डिकसन मुस्तफा सेंटर आणि सिटी स्क्वेअर मॉलपासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. ही दोन्ही खरेदीची ठिकाणे सर्व वयोगटातील लोकांसाठी खरेदीच्या आनंदाची खात्री देतात. इतर लोकप्रिय आकर्षणांमधील सिंगापूर नॅशनल म्युझियम, गार्डन्स बाय द बे, कॅम्पाँग ग्लॅम आणि सनटेक सिटी मॉल या गोष्टी या हॉटेलपासून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर आहेत. हाय-स्पीड वाय-फाय आणि गरम पेये बनविण्याच्या सुविधांनी सुसज्ज असलेले हॉटेल 81 डिकसन, पूर्ण वातानुकूलित असल्याने तुमच्या वास्तव्यातील आरामात खंड पडणार नाही याची सुनिश्चिती करते.

मूल्य: प्रति रात्र रु. 3,337 पासून सुरुवात  

स्थान: 3 डिकसन रोड, सिंगापूर 209530

Book Your Stay at Hotel 81 DicksonBook Your Stay at Hotel 81 Dickson

दी फुलरटन हॉटेल

तुमच्या सिंगापूरच्या सुट्यांमध्ये आणखी एक अनुभव जोडायचा असल्यास, अवर्णनीय अशा फुलरटन हॉटेलमध्ये वास्तव्य निश्चित करा. एक राष्ट्रीय स्मारक असलेली फुलरटन इमारत 1928 मध्ये बांधली गेली होती आणि एके काळी ती सिंगापूरचे जनरल पोस्ट ऑफिस, एक्स्चेंज रेफरन्स लायब्ररी आणि एक्स्चेंज रुम होती. आज या भव्य इमारतीत 400 खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल उभे आहे. हे हॉटेल अत्यंत मध्यवर्ती जागेत असून, रॅफल्स प्लेस एमआरटी स्टेशन आणि ऑर्चर्ड रोडपासून 2-3 किलोमीटर अंतरावरच आहे. फुलरटन हेरिटेज ट्रेल, मेरीटाईम टूर आणि मॉन्युमेंट टूर तुमच्या छोट्यांना व्यस्त ठेवण्यासाठी उपलब्ध असलेले काही उपक्रम आहेत.

मूल्य: प्रति रात्र रु. 15,416 पासून सुरुवात  

स्थान: 1 फुलरटन स्क्वेअर, सिंगापूर 049178

Book Your Stay at The Fullerton HotelBook Your Stay at The Fullerton Hotel

V हॉटेल लवेंडर

 v-hotel-lavender

कॅलाँग क्षेत्रातील जेलीको रोडवर असलेले हे सुरेख हॉटेल, लवेंडर मेट्रो स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. अलाईव्ह म्युझियम या हॉटेलपासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. एमआरटीही अतिशय नजीक असल्यामुळे सिंगापूरमध्ये एका जागेपासून दुसऱ्या जागी जाण्यासाठी तुम्हाला अधिक धडपड करण्याची गरज नाही आणि तुमच्या मुलांना शहरामधून घेऊन जाण्यासाठी एक मोठी सुविधा ठरेल. आणि जर तुमच्या मुलांना मौजमजा करावयाची असेल, बारा इंचाचा पिझ्झा व गाणी आहेत, एक अंतर्गत कॅफे आहे आणि तुमच्या अल्पाहाराचा आनंद वाढविण्यासाठी स्वादिष्ट पिझ्झांचा खजिना आहे. उत्कृष्ट चॅनेल्ससह LED TV आणि अत्यंत आरामदायक खोल्या असलेल्या आणि हाय-स्पीड वाय-फायने सुसज्ज अशा या V हॉटेल लवेंडरमध्ये मिनी-रेफ्रिजरेटर देखील पुरविला आहे, ज्यात तुम्ही मुलांच्या आवडीचे पदार्थ ठेवू शकता.

मूल्य: प्रति रात्र रु. 5,866 पासून सुरुवात  

स्थान: 70 जेलीको रोड, सिंगापूर 208767

Book Your Stay at V Hotel LavenderBook Your Stay at V Hotel Lavender

पॅन पॅसिफिक ऑर्चर्ड हॉटेल

सहेतुक ऑर्चर्ड रोडवर उभारलेले हे हॉटेल ऑर्चर्ड हे एमआरटी स्टेशनपासून केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर आहे, ज्यामुळे ईऑन ऑर्चर्ड, व्हीलॉक प्लेस, पॅलाइस रिनेसन्स आणि सिंगापूर बोटॅनिक गार्डन्स यांच्यासारख्या शॉपिंग आणि मनोरंजक स्थळांना तुम्ही अत्यंत आरामात भेटी देऊ शकता. मुलांना आवडणारे हे हॉटेल त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी भरपूर उपक्रम सादर करते तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी अनुभवी आयाही उपलब्ध करून देते. ड्रॉइंगची पुस्तके आणि क्रेयॉन्स, मुलांसाठी काही आवश्यक गोष्टी आणि मुलांसाठी खोलीतच डायनिंग मेनू यांच्यासारख्या भरपूर मोफत सुविधा मुलांना वेडंच लावतील आणि सर्वांचे वास्तव्य मजेदार बनवतील.

मूल्य: प्रति रात्र रु. 17,039 पासून सुरुवात  

स्थान: 10 क्लेमोर रोड, सिंगापूर 229540

Book Your Stay at Pan Pacific Orchard HotelBook Your Stay at Pan Pacific Orchard Hotel

रमाडा हॉटेल

ramada-hotel

सिंगापूरच्या बॅलेस्टीयर/नोव्हेना जिल्ह्यात वसलेले आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कुशलतेने रचलेले रमाडा हॉटेल नोव्हेना एमआरटी स्टेशनपासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. नोव्हेना एमआरटी स्टेशन आणि तसेच, ऑर्चर्ड रोडला नेण्याची आणि तिथून आणण्याची मोफत सोय असलेले हे हॉटेल तुम्हाला मुलांसोबत राहण्यासाठी एकदम समर्पक आहे. हॉटेलपासून एका उडीच्या अंतरावरील झोंगशॅन मॉल खरेदीचे आणि मनोरंजनाचे द्वारच आहे. मुलांबरोबर फिरण्यासाठी इतर गोष्टींमध्ये सिंगापूर बोटॅनिक गार्डन्स असून ते रमाडा हॉटेलपासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. जर तुम्हाला तुमच्या खोलीतच राहायचे असेल, तर 384 खोल्यांपैकी प्रशस्त खिडकी असलेली कोणतीही एक खोली निवडा आणि शहराचे विहंगम दृश्य बघत अतुलनीय अनुभव घ्या. हॉटेलच्या परिसरातील स्विमिंग पूल, अत्यंत जवळ असलेले झोंगशॅन पार्कमधील आशियाई रेस्टॉरंट आणि इथे असलेली हाय-स्पीड वाय-फायची सुविधा येथील वास्तव्य अविस्मरणीय बनवतील.  

मूल्य: प्रति रात्र 7,694 पासून सुरुवात  

स्थान: 16 एएच हूड रोड, सिंगापूर 329982

Book Your Stay at Ramada HotelBook Your Stay at Ramada Hotel

हॉटेल बॉस 

hotel-boss

व्हिक्टोरिया स्ट्रीटवर उभारलेले हे आधुनिक हॉटेल लव्हेंडर एमआरटी स्टेशनपासून केवळ 450 मीटर अंतरावर आहे. अतिशय जवळ असलेल्या सिटी स्क्वेअर मॉल आणि चर्च ऑफ अवर लेडी ऑफ लॉर्ड्स याठिकाणी तुम्ही अधिक न फिरता मुलांसह धम्माल करू शकता. या हॉटेलमधील असलेल्या अत्यंत रेखीवपणाने रचलेल्या 1,500 खोल्या अत्याधुनिक सुखसोयींनी सज्ज आहेत आणि उन्हात मौज करण्यासाठी हॉटेलच्या परिसरात पोहण्याच्या तलावाच्या सोयीबरोबरच, छोट्या मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी खास अशी छानशी जागा देखील उपलब्ध करून दिली आहे.

मूल्य: प्रति रात्र रु. 4,756 पासून सुरुवात  

स्थान: 500 जालान सुलतान, सिंगापूर 199020

Book Your Stay at Hotel BossBook Your Stay at Hotel Boss

डेज हॉटेल

Days-Hotel

झोंगशॅन पार्कचे विहंगम दृश्य नजरेस पडणारे आणि उत्कृष्ट आदरातिथ्य असलेल्या डेज हॉटेलमधील आटोपशीर रेखीव खोल्यांमधील वास्तव्य नजीकच्या अनेक गोष्टींना भेटी देण्यासाठी अत्यंत सोयीस्कर ठरते. बॅलेस्टीयर रोड,  ससानारामसी बौद्ध मंदिर आणि स्क्वेअर 2 स्क्वेअर मॉल काही मिनिटांच्या अंतरावर आहेत, तर यातील आरामदायक वास्तव्यात नजीकच्या अनेक मनोरंजक गोष्टींना भेट देण्याची योजना केली जाऊ शकते. शहरात विनाकटकट फिरण्यासाठी, तुम्ही नोव्हेना एमआरटी स्टेशन आणि ऑर्चर्ड रोडसाठी मोफत शटल सेवेचा लाभ घेऊ शकता.

मूल्य: प्रति रात्र रु. 5,138 पासून सुरुवात  

स्थान: 1 जालान राजा, सिंगापूर 329133

Book Your Stay at Days HotelBook Your Stay at Days Hotel