एक दिवस खास चांदनी चौकात

Mikhil Rialch

Last updated: Jun 16, 2017

Want To Go ? 
   

जर आपल्याला कधी नियोजित अनागोंदी बघण्याची इच्छा झाली तर चांदनी चौकाकडे जाणारी मेट्रो पकडा. अरुंद गल्ल्यांमध्ये दुकानदार, फेरीवाले आणि पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील मात्र या गल्ल्याही आधीच दुकानांनी फुगलेल्या असतात. त्यांच्या डोक्यावर टेलिफोन व विजेच्या भयानक गुंतागुंती असलेल्या तारा लटकलेल्या असतात आणि या व्यस्त बाजाराच्या हवेत रोखठोकपणा मुरलेला असतो. अशी अनागोंदी पाचवीला पुजलेला चांदनी चौक एक अध्ययनाचा विषय आहे. त्यामुळेच कदाचित पर्यटक याला आपल्या भारतीय यात्राचा एक भाग बनवत असतील, यासारखे विलक्षण ठिकाण दुसरीकडे नाहीच.

स्ट्रीट फूडच्या प्रसिद्ध गल्ल्यांपासून तर प्रत्येक वाटेवर इतिसाला साद घालणारा दिल्लीचा सर्वात जुना भाग म्हणजे चांदनी चौक हा गुरगावच्या काँक्रीटच्या जंगलामध्ये व दिल्ली शहराच्या मध्यभागी सुनियोजित पद्धतीने वसलेल्या इमारतींच्या पार्श्वभूमीवर एका ताज्यातवान्या झोक्यासारखा आहे. हा भाग सुनियोजितपणे बंधने झुगारतो व तसे करतानाच एक जादू पसरवतो ज्यावर खिन्नतेची एक झाकही आहे.

एका अत्यंत वेगवान आणि शहरी दुनियेमध्ये चांदनी चौक ही आपल्यावर ताबा मिळवणारी गोष्ट आहे. चांदनी चौकात एक दिवस कसा घालवायचा हे आम्ही येथे सांगत आहोत.

 

एक खाद्योत्सव

delhi-chandni-chowk-food

जर भारतामध्ये स्ट्रीट फूडची राजधानी दिल्ली असेल तर नि:संशयपणे चांदनी चौक त्याचा शिरोमणी आहे. मग ते करीममधील कबाब असो, नटराज स्वीट्सची चाट व दही भल्ले असो, खेमचंद आदेश कुमारकडील दौलत की चाट असो किंवा जुन्या प्रसिद्ध जलेबी वालामधील गुंडाळलेले मिष्ठान्न असो – स्ट्रीट फूडमधील उत्कृष्ट पदार्थ जे शतकांपासून परिपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे येथे आपली वाट बघत आहे. येथे प्रसिद्ध असलेले सर्वकाही एका दिवसात चाखणे अशक्य आहे. जर आपण पराठे वाली गल्लीमध्ये विविध प्रकारचे पराठे चाखून बघणार असाल तर इतर काही चाखण्याविषयी विसरूनच जा. आमचा सल्ला: सर्वकाही थोडसे चाखून बघा आणि स्वत:ला बजावत रहा की आणखी बरेच काही चाखायचे आहे.

 

खरेदीचा समारंभ

delhi-shopping-chandni-chowk

या बाजारामध्ये उसळणाऱ्या गर्दीविषयी जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येईल की चांदनी चौकमध्ये विलक्षण खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इतरही बरेच काही आहे. लहानशी दुकाने आणि स्टॉल, आपल्या कॉलेजच्या वसतीगृहाच्या खोलीपेक्षाही लहान, येथे कपड्यांपासून गालिच्यापर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स, स्मृतीचिन्हे आणि कलाकृती, घरगुती वस्तू, हस्तकलेच्या व इतर बऱ्याच प्रकारच्या वस्तू विकताना आपल्याला दिसून येतील. घासाघीस होईल हे अपेक्षितच असते त्यामुळे या खेळामधील आपले सर्वोत्तम कौशल्य आजमावून बघा आणि काहीतरी विशेष वस्तू घेऊन घरी या.

 

कॅमेरा कार्निवल

अधिकांश लोकांना हे माहित नसेल परंतु चांदनी चौक हे आशियातील कॅमेरा साहित्याचे सर्वात मोठे केंद्र आहे. जर आपण एस्प्लानेड रोडपासून फोटो मार्केटकडे गेलात तर आपल्याला शेकडो स्टॉल कॅमेरा बॅग, ट्रायपॉड, बॅटरी चार्जर, लेन्सेस, फिल्टर आणि अल्बम विकताना दिसतील. या स्टोअरपैकी सर्वात जुन्या प्रीतम स्टुडिओला भेट द्या. या ऐतिहासिक स्टुडिओमध्ये जाणेसुद्धा थोडेसे धाडसी कार्य आहे, जेथे वेगाने बदलणाऱ्या जगात फारसे काही बदललेले नाही. आपल्याला आपल्या कॅमेऱ्याच्या सुट्या भागांची माहिती अवश्य असली पाहिजे कारण की येथे बनावट वस्तूसुद्धा मिळू शकतात. मात्र, अधिकांश जुने स्टोअर्स अस्सल वस्तू निर्धारित किंमतीमध्ये विकतात.

 

इतिहासात हरखून जा

red-fort-chandni-chowk

दिल्लीविषयी एक बाब प्रसिद्ध आहे की येथील स्मारके, ऐतिहासिक आणि प्रख्यात सांस्कृतिक स्थळे म्हणजे फार पूर्वी निघून गेलेल्या काळाचे जाहीरनामे आहेत. नेहमीच्या ठराविक स्थळांव्यतिरिक्त अधिकांश दिल्लीकरांनासुद्धा यापैकी बऱ्याच स्मरणिकांविषयी माहित नसेल ज्यावर आता आधुनिकतेची झुल पसरलेली आहे. जामा मशिद आणि बरीच ऐतिहासिक दुकाने ज्यांची मूळे थेट मुघल काळापर्यंत पोहोचतात त्यांच्याव्यतिरिक्त चांदनी चौकात बऱ्याच धार्मिक इमारती आणि हवेल्या आहे ज्या काळवंडलेल्या आणि पछाडलेल्या दिसतात आणि आपण त्यांना बघावे अशी विनवणी करीत असतात. श्री दिगंबर जैन लाल मंदिर किंवा शीख गुरूद्वारा सीस गंज साहिब यापासून सुरू करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण थोडसे धाडस करून बेगम समरू, मिर्झा गालिब आणि झीनत महाल या हवेल्या बघू शकता. खजांची हवेलीला भेट देण्यास मुळीच विसरू नका जेथे शाह जहानचे अधिकांश लेखापाल राहायचे. ही हवेली लाल किल्यासोबत एका लांब भूमिगत बोगद्याने जोडलेली आहे, जो कदाचित बादशहाच्या लेखापालांना राजवाड्यामध्ये सुरक्षितरित्या पैसे स्थानांतरित करण्याकरीता बांधलेला होता.

येथे करण्यासारखे बरेच काही आहे व एकाच दिवसात जास्तीत जास्त चांदनी चौक बघणे सुद्धा कठीण आहे. मात्र सुरवात करणाऱ्यांकरीता इतकेसे पुरेसे आहे. तर मग मेट्रो पकडा व उतरा चांदनी चौकला आणि आपण आपला दिवस तेथे कसा घालवला ते आम्हाला अवश्य सांगा.

More Blogs For Food & Shopping