भूतानमध्ये सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेण्याकरीता आपल्याकरीता सर्व माहिती

MakeMyTrip Blog

Last updated: Dec 6, 2017

Author Recommends

See

Thimpu: Takin, the national animal of Bhutan at the Motithang Takin Preserve
Punakha: The ‘one hundred pillar hall’ at Punakha Dzong with its exquisite murals
Bumthang: Membartsho or the 'Burning Lake', one of the biggest pilgrimage spots of Bhutan

Do

Paro: Go for the Snowman Trek, one of the most challenging and adventurous treks in the world

Eat

Binge on pancakes, noodles, rice and ema datsi at Phuenzi Diner

Click

Punakha: Visit Chimi Lhakhang to click pictures of baby monks in training
Phuntsholing: Get yourself clicked at the ornate border gate between Bhutan and India
Trongsa: Click the magnificent Black Mountains from the Trongsa Dzong

Trivia

Did you know the first foreign tourists were allowed into Bhutan in 1974?

Want To Go ? 
   

हिमालयाच्या कुशीत वसलेले भूतान प्राचीन काळापासून गूढता आणि दंतकथांच्या आवरणात वेढलेले आहे. हा असा देश आहे जेथे यश सकल राष्ट्रीय आनंदामध्ये मोजले जाते आणि जेथे बौद्ध जीवनशैलीचा संगम आधुनिकतेसोबत होतो. भूतान हे हिमालयाचे नयनरम्य दृश्य, शांतताप्रिय बौद्ध मठ आणि आनंदाने जगणाऱ्या लोकांचे घर आहे.

आपण एका ताजेतवाने करणाऱ्या हॉलिडे ट्रिपचा विचार करीत आहात का? मग खालील कारणांकरीता आपण अवश्य भूतानला जायलायच हवे.

भूतानच का निवडायचे?

dzong-bhutan

भूतान या शेवटच्या महान हिमालयीन राज्याला शब्दश: ‘शेवटचे शांग्रिला’ असे सुद्धा म्हटले जाते. येथे चित्तथरारक हिमालयीन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्या, जेथे बर्फाच्छादित पर्वतांचा सुंदररित्या हिरव्यागार गवताळी मैदानामध्ये व प्राचीन जंगलामध्ये संगम होतो. निसर्गरम्य भूदृश्य स्वच्छ, शुद्ध हवा प्रदान करते. त्यामुळे ही मुळीच आश्चर्याची बाब नाही की भूतान हा जगातील पहिला व एकमेव कार्बन नकारात्मक देश आहे, म्हणजेच तो जेवढ्या कार्बनचे उत्सर्जन करतो प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त कार्बनचे शोषण करतो!

भूतानमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रवाशाकरीता काही ना काही आहेच, मात्र येथे भारतीयांकरीता एक आनंदाची बाब आहे! व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा व रॉयल्टी शुल्क माफ (भूतानमध्ये इतर देशाच्या नागरिकांना किमान 250 डॉलरची रक्कम दैनिक खर्च म्हणून अदा करावी लागते) असल्यामुळे हे एक किफायतशीर सुट्टीचे ठिकाण आहे. आपण भारतीय खाद्यपदार्थांची लज्जत चाखत आणि सहजपणे भारतीय मुद्रेमध्ये व्यवहार करू शकत असल्याने आपल्याला अगदी घरच्यासारखेच वाटेल. भूतानचे लोक आपले अगदी अगत्याने स्वागत करतात, त्यापैकी बहुतांश लोकांना हिंदी बोलता व समजता येते! प्राचीन व आधुनिक संस्कृतीचा संगम असलेले भूतान अत्यंत विलक्षण असेच आहे.

भूतानमध्ये काय करावे?

भूतानमध्ये बघण्याकरीता आणि भटकंती करण्याकरीता बरेच काही आहे. अवश्य भेट द्यावे असे एक ठिकाण म्हणजे तक्तसंग पलफूग मठ, जे टायगर्स नेस्ट मॉनेस्ट्री या नावाने प्रसिद्ध आहे. पॅरो व्हॅलीच्या उंच कड्यावर 900 मीटर उंचीवर वसलेल्या या मठाच्या भेटीला फडफडत्या प्रार्थना ध्वजांच्या पलिकडील आजूबाजूच्या जंगलाच्या व दरीच्या विस्तीर्ण दृश्याची जोड लाभते.

ही जागा निसर्ग व वनजीवनाच्या चाहत्यांकरीता पर्वणीच आहे, कारण जवळपास 70% जमीन निसर्गाकरीता संरक्षित म्हणून जपलेली आहे, त्यामुळे जवळच आपल्याला एखादे राष्ट्रीय उद्यान सापडेल ज्यामध्ये भूतानचा राष्ट्रीय पशू – टेकिन, बर्फाळी चित्ता, काळ्या मानेचे क्रौंच आणि इतकेच नव्हे तर वाघ सुद्धा नजरेस पडतील! साहसप्रेमी लांब रपेट मारणे किंवा ट्रेक व तसेच रॉक क्लायंबिंग, कायाकिंग, मासेमारी आणि इतर बऱ्याच गोष्टींचा सुद्धा आनंद घेऊ शकतात. मग वेळ येते आकर्षक भूतानी पाककलेची. आपली भूक तेव्हा आणखीनच प्रज्वलित होईल जेव्हा आपल्याला माहित होईल की येथे मिरची फक्त फोडणी देण्याकरीता नाही तर मुख्य पदार्थ म्हणूनही वापरली जाते.

भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी कोणता आहे?

bhutan-a-safe

भूतानला वर्षभर भेट देता येते मात्र सर्वोत्तम कालावधी आहे एक तर वसंत ऋतू (एप्रिल ते जुलै) किंवा शरद ऋतू (सप्टेंबर ते नोव्हेंबर). त्सेचस उत्सवामुळे (नृत्याचा महोत्सव) या महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होते. ट्रेकर्स किंवा ज्या व्यक्तींना फक्त भटकंती करायची आहे त्यांनी फूलांनी बहरलेल्या पर्वतांचे दृश्य डोळ्यात साठवण्याकरीता मार्च ते मे दरम्यान प्रवास करावा किंवा पर्वतांच्या सर्वोत्तम दृश्यांकरीता सप्टेंबर आणि नोव्हेंबर दरम्यान प्रवास करावा. इतकेच नव्हे तर जुलै आणि ऑगस्ट दरम्यानचा पावसाळा सुद्धा चांगला हंगाम आहे कारण की भूतानमधील पावसाच्या सरी तूफान नसतात आणि त्यामुळे आपल्या भटकंतीवर काहीच परिणाम होणार नाही.

मी भूतानकरीता सर्वोत्तम हॉलिडे पॅकेज कसे निवडावे?

विशिष्ट पॅकेज जे आपला प्रवासाचा उद्देश पूर्ण करतात ते उपलब्ध आहेत. आपण हनीमून/रोमँटिक पॅकेज, कुटुंबाकरीता पॅकेज किंवा हृदयाने तरुण असणाऱ्यांकरीता असलेल्या पॅकेजमधून निवड करू शकता. असे सुद्धा पॅकेज आहेत जे एकत्रित सेवा उपलब्ध करून देतात, सोबतच ज्यांना आपल्या पद्धतीने भूतानचे दर्शन करायचे आहे त्यांच्याकरीता कस्टमाइज पॅकेजेसचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. थेट विमान सेवेने जोडलेले पॅकेज सुद्धा उपलब्ध आहेत, विशेषत: मुंबई, बंगळुरू आणि अहमदाबाद. भूतानला जाताना आपण आपल्या विमान सेवेच्या कोणत्याही पर्यायांची निवड का केली असेना, हिमालयाच्या प्रसन्न पर्वतरांगांचे दृश्य बघण्यास मुळीच विसरू नका, ज्यामध्ये माउंट एव्हरेस्ट आणि माउंट कांचनजंगाच्या आभाळाला टेकलेल्या शिखरांचा समावेश होतो. भूतानमध्ये सर्व श्रेणींमध्ये निवासाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मग ते तुलनेने एकांत जागी असलेले विलक्षण हॉटेल असेल किंवा शहराच्या केंद्रभागी असलेले लक्झरियस हॉटेल असेल – प्रत्येक हॉटेलमधून या लँड ऑफ थंडरिंग ड्रॅगन चे आश्चर्यचकित करणारे दृश्य नजरेस पडते. 

Packages starting from INR 16,489*

Book Your Bhutan Holiday Package Here!

*Prices may vary