महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी तोडणे आणि पॅराग्लायडिंगः साक्षात माझ्या परीकथेतील विकेंड

Protima Tiwary

Last updated: Jan 5, 2018

विकेंडला कुटुंबियांसोबत महाबळेश्वरला कारने सहलीला जाणे ही मागील वर्षापासूनची माझ्या आठवणीतील खास सहल ठरलेली आहे. तो योजनाबद्धरित्या आखलेला विकेंड होता व आम्ही त्याचा पूरेपूर आनंदही घेतला होता! कुटुंबियांसोबत शेतामध्ये स्ट्रॉबेरी तोडण्यापासून तर सह्याद्रीच्या डोंगररांगांवर पॅराग्लायडिंग करणे हा एक रोमांचक कौटुंबिक अनुभव होता!

पक्ष्यांसारखी भरारी

मुंबईहून 5 तासांचे ड्रायव्हिंग केल्यानंतर आम्ही पहिला दिवस मस्त विश्रांती घेत घालवला. दुसरा दिवस फक्त थरार अनुभवण्याकरताच राखून ठेवलेला होता, ज्यामध्ये आम्ही कामशेत येथे पॅराग्लायडिंगची मोहीम फत्ते केली. या मोहीमेकरिता आम्हाला हॉटेलहून नेण्यात आले आणि आमच्या प्रशिक्षकांच्या भेटीचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला मला थोडी भीती वाटत होती, कारण की गरूडांच्या साक्षीने चोहीबाजू पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांवरून उंच आकाशात उडणे म्हणजे रोमांचकतेचा कळसच आहे. मला खरंच घाबरल्यासारखे झाले होते, मात्र व्यावसायिक प्रशिक्षकांनी मला शांत होण्यास मदत केली. वर उडतानाचे पहिले काही सेकंद खरंच थरारक होते मात्र नंतरच्या 10 मिनिटांचा कालावधी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कालावधींपैकी एक होता!

strawberry

मुख्य आकर्षणः शेतामध्ये स्ट्रॉबेरी तोडणे

सकाळी नाष्टा केल्यानंतर आम्ही सरळ शेतांकडे कूच केले कारण की शेतातील ताजीतवानी सकाळ कुणाला आवडणार नाही? सूर्यप्रकाश उबदार होता, हवेमध्ये काहीसा थंडावा होता आणि आमच्या चहूकडे स्ट्रॉबेरीचे शेत पसरलेले होते. रसदार स्ट्रॉबेरी कशा निवडायच्या व तोडायच्या हे आम्ही शिकलो, आम्ही वेचलेल्या फळांपासून बनवलेले आईसक्रीम खाल्ले आणि आठवण म्हणून काही जॅमच्या बाटल्याही सोबत घेतल्या.
निसर्गाच्या खजिन्याची लयलूट करीता आनंदाने घालवलेला हा विकेंड म्हणजे एक अविस्मरणीय सहल ठरली आहे. या अनुभवात्मक पॅकेजकरिता मेकमायट्रिपचे पुन्हा एकदा धन्यवाद ज्यामुळे ही कौटुंबिक सहल आनंदाने साजरी करता आली.

Read more: Hotels in Mahabaleshwar for a Stress-free Vacation

माझे मेकमायट्रिप पॅकेज: महाबळेश्वर - शेतामध्ये स्ट्रॉबेरी वेचणे (ऑनलाईन)​

मूल्य: रु. 37,999 पासून सुरू * ​

Book Your Mahabaleshwar Holiday Here!

*किंमत बदलूही शकते​

More Travel Inspiration For Mahabaleshwar